Breaking News

नागपूर

नागपुरात प्रॉपर्टीवरून मित्राचा खून

प्रॉपर्टी डीलिंगच्या व्यवसायात असलेल्या दोन मित्रांमध्ये कमिशनच्या पैशावरून एकाचा खून करण्यात आला.ही घटना नागपूर येथील अग्रसेन चौकात घडली. परवेज शेख उर्फ पापा मिया शेख (वय ३०, रा. खरबी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संशयीत आरोपी प्रॉपर्टी डीलर परवेज याकुब खान (वय २८, रा. पारडी) याच्यासह त्याच्या चार सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परवेज खान व परवेज शेख या दोघांची …

Read More »

‘जलयुक्त शिवार’ची कामे तातडीने सुरू करा-जिल्हाधिकारी पांडेय

जलयुक्त शिवार अभियानाबाबत तालुकानिहाय समिती स्थापन करावी. याबाबतची कामे सात दिवसांत सुरू करावे, अशा सूचना औरंगाबाद जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिल्या. समन्वयाने शिवार फेरीच्या माध्यमातून गावाचा जलआराखडा तयार करून जलयुक्त शिवार अभियानाचा दुसऱ्या टप्प्याची कामे सुरू करा, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जलयुक्त शिवार अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. …

Read More »

शेतकरी वाऱ्यावर : न्यायाधिशाविना नागपूर महसूल न्यायाधिकरण

महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणात न्यायाधीस नसल्याने शेतकऱ्यांच्या प्रकरणावर परिणाम होत आहे. नागपूर येथील महसूल न्यायाधिकरणात दोन न्यायाधीस पाहिजेत. मात्र, एक न्यायाधीस एक पद रिक्त आहे. मागील एक वर्षांपासून एका देवस्थानचे प्रकरण थंडबसत्यात अडकून पडले आहे, असा दावा नागपूर हायकोर्टातील वकील मनोज मिश्रा यांनी केला आहे. तसेच कर्मचारी निव्वळ मोबाईलवर असतात. कामाचा ढिगारा असतानाही न्यायाधिकरणात कर्मचारी मनोरंजन करीत असतात. विदर्भातील बऱ्याच शेतकऱ्यांचे …

Read More »

नागपुरात हरविला विराट कोहलीचा मोबाईल

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीसाठी भारतीय क्रिकेट संघ नागपुरात आहे. या दोन्ही संघाची नागपुरात जोरदार तयारी सुरु असताना माजी कर्णधार विराट कोहलीच्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या या ट्वीटवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. आपला नवा कोरा फोन हरवला असून तो कोणाला सापडला का, असा प्रश्न कोहलीने ट्विटच्या माध्यमातून केला आहे. अर्थातच नागपुरात खळबळ माजली असली तरी हा फोन …

Read More »

नागपूर हायकोर्टातील चंदनाचे झाड पळविण्याचा प्रयत्न : दोघांना अटक

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ (हायकोर्ट)परिसरातील चंदनाचे झाड तोडून ते पळविण्याचा प्रयत्न दोन चोरट्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. चोरटे या प्रयत्नात अयशस्वी ठरले अन् पोलिसांनी त्यांना गजाआड केले. ही घटना शुक्रवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ परिसरात घडली. न्यायमूर्ती व वकिलांची वाहने या परिसरात पार्क करण्यात येतात. त्यामुळे नागपूर खंडपीठाचा परिसर बराच मोठा …

Read More »

बागेश्वर धाम महाराज अडचणीत : वादग्रस्त विधानानंतर नागपुरात कुणबी समाज आक्रमक

बागेश्वर धामचे वादग्रस्त पुजारी धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबाबत अलीकडेच आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.कुणबी समाजात याचे पडसाद उमटले असून असून धीरेंद्र महाराज यांच्याविरोधात नागपूर पोलिसात तक्रार करणार आहे. विशेष म्हणजे नागपूर पोलिसांनी या वादग्रस्त महाराजांना जादूटोणा कायद्याअंतर्गत क्लिनचीट दिली आहे. धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी एका प्रवचनात संत तुकाराम महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करीत त्यांचा अवमान केला. समाजाच्या …

Read More »

“जुनी पेन्शन वाढविणार भाजपचे टेन्शन”

जुनी पेन्शन न दिल्यास भाजपचे टेन्शन वाढू शकते, असे आजच्या पदवीधर शिक्षक निवडणूकीवरून दिसून आले. तसेच जेव्हा टीम म्हणून काम करतो, तेव्हा निकाल आपल्या बाजूनेच लागतात, असे मत काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले. नागपूर पदवीधर मतदारसंघात अभिजीत वंजारी आणि नागपूर शिक्षक मतदारसंघात सुधाकर अडबाले यांनी मिळवलेल्या विजयाने आमचे टीम वर्क स्पष्ट झाले आहे, असेही केदार म्हणाले आहेत. …

Read More »

नागपूरजवळ अंधश्रद्धेतून झाली वाघाची शिकार : 7 आरोपीना अटक

महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील पवनी बफर वन क्षेत्रात 12 जानेवारीला वाघाची शिकार झाली.या प्रकरणात 7 आरोपींना अटक करण्यात आली. सध्या सर्व आरोपी नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात आहे. आरोपींकडून मिळालेली माहिती पडताळण्याचे काम सुरू आहे. त्यावरून वाघाची शिकार अंधश्रद्धेतून झाल्याची शक्यता वनाधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. यातील अटक केलेल्या जितेंद्र वरखडे या आरोपीने गुन्ह्यात वापरलेले एक हत्यार दाखवले. त्याला वन विभागाने जप्त केले. ताब्यात …

Read More »

नागपुरात केंद्रीय मंत्र्याच्या नावे कोटींची मागितली खंडणी : चौघांना अटक

नागपुरातील एका मोठ्या कोळसा व्यापाऱ्याला चौघांनी थेट केंद्रीय कोळसा मंत्र्यांच्या नावावर तब्बल १ कोटी खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास बदनाम करण्याची धमकी दिली. प्रकरणी पोलिसांनी नागपुरातील तीन तोतया पत्रकारांसह चौघांना अटक केली आहे. पीयूष पुरोहित, राष्ट्रभान पोर्टलचा पत्रकार संजय बघेल, संजीत बघेल आणि वंश अग्रवाल ऊर्फ मयंक कुमार अशी आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलिस कोठडीचे आदेश …

Read More »

नागपुरातील भूमी अभिलेख विभाग भ्रष्टाचाराचा अड्डा : शेतकऱ्यांना अधिकारी देतात त्रास

नागपुरातील भूमी अभिलेख विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. या कार्यालयाने एका सत्तर वर्षीय वृद्धाला जिवंत असताना मृत्यू दाखल्याची मागणी केल्याचे प्रकरण ‘विश्व भारत’ने लावून धरले होते. या विभागाकडे शेतकरी मोठ्या आशेने बघतोय. शेत मोजणी करण्यासाठी अनेक अर्ज कार्यालयात येतात. पण, नागरिकांना नाहक त्रास देऊन प्राप्त अर्ज निकाली न काढण्याची किमया या विभागातील अधिकारी-कर्मचारी करतात. अशा भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर …

Read More »