Breaking News

नागपूर

नागपुरात 77, औरंगाबादमध्ये 75 विकास सोसायट्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत 11 जिल्ह्यातील 798 विकास संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय. शासनाच्या मागणीनुसार राज्य सहकारी बँकेने विकास संस्थांच्या सक्षमीकरणाचा एक भाग म्हणून सुमारे 3 कोटी रुपयांइतकी रक्कम संबंधित विकास संस्थांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. सहकारातील त्रिस्तरीय रचनेत राज्य सहकारी बँक ही शिखर संस्थेची भूमिका बजावत आहे. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी संस्थांचा समावेश होतो. कोणत्या …

Read More »

दुर्दैवी घटना : नागपुरच्या न्यायालयात लिपिकाला ‘हार्ट अटॅक’

नागपुरातून एक मोठी बातमी समोर येत आहे.नागपुरातील जिल्हा व सत्र न्यायालयातील सहाव्या माळ्यावरील न्यायालयात कर्तव्य बजावत असताना एका लिपिकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. ही घटना बुधवार, दुपारी 3-4 या वेळेत घडली. मृत्यू झालेल्या लिपिकाचे नाव गणवीर असून 50 वय असल्याचे कळते. गणवीर यांना डॉक्टरकडे नेले असता तेथे मृत घोषित करण्यात आले.

Read More »

नागपुरला येत असताना काँग्रेसच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका

काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी आमदार आणि इंटकचे प्रदेश अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांचे काल रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास निधन झाले. ते 75 वर्षाचे होते. ते नागपूर येथील बैठकीला जात होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दरम्यान काल त्यांना हदय विकाराचा धक्का आल्याने नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा मृत्यू झाला. काँग्रेस पक्षाशी निष्ठावान असे त्यांचे …

Read More »

नागपूरमध्ये नायलॉन मांजामुळे विद्यार्थ्यांचा कापला गळा

नागपुरात नायलॉन मांजामुळे घरासमोर रस्त्यावर खेळणाऱ्या चिमुकलीचा अलीकडेच गळा कापला होता.ही घटना ताजी असतानाच परत एकदा मांजामुळे एका युवकाचा गळा कापल्याची घटना समोर आली आहे. शहरातील राणी दुर्गावती चौक परिसरात सायकलने परत येत असताना हा प्रकार घडला. शाहनवाज हुसैन मलिक (वय 18) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्याला 16 टाके पडले आहेत. पोलिस …

Read More »

चित्रकला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. इंगळे यांची नागपूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी नियुक्ती

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेटवर राज्यपाल नियुक्त 10 सदस्यांच्या नियुक्त्या अलीकडेच करण्यात आल्या. महाराष्ट्राच्या कला क्षेत्रातून नागपूरच्या शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.किशोर इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपुरच्या चित्रकला महाविद्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदा सिनेट सदस्य होण्याचा बहुमान डॉ.इंगळे यांना मिळाला आहे. योगदान मोठे… डॉ. इंगळे यांचे कला क्षेत्रात मोठे योगदान असून त्यांचा अनेक पुरस्कारांनी सन्मानही करण्यात आला आहे. त्यांच्या …

Read More »

नागपुरात थंडीमुळे दोघांचा मृत्यू

नागपुरात थंडीचा जोर वाढला आहे. यात दोघांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. डिसेंबरपर्यंत थंडी कमी होती. अचानक थंडीचा पारा वाढला आहे. लोकं शेकोटीचा आधार घेत आहेत. मागील दोन दिवसापासून सूर्यदर्शन झालेले नाही. शनिवारी सूर्यदर्शन झाले. पण, थंड हवांचा जोर कायमच आहे. या थंडीत दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. येत्या काळात पुन्हा थंडी वाढू शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Read More »

नेत्याच्या मुलाच्या लग्नात 900 जणांना विषबाधा

औरंगाबाद शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या मुलाच्या लग्नात अंदाजे 900 जणांना विषबाधा झाल्याची माहिती आहे. लग्न समारंभाच्या जेवणातून विषबाधा झाल्याने 900 जणांची प्रकृती बिघडली आहे. या सर्वांनी औरंगाबादमधील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घ्यायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांचे पुत्र सय्यद जुबेरचा लग्नसोहळा बुधवारी 4 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी …

Read More »

गडकरींनी घटविले 56 किलो वजन : कोणते व्यायाम करतात?

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वजन कमी करून अनेकांना थक्क केले आहे. वजनच नव्हे तर एकूणच गडकरींच्या तब्येतीत सुधार दिसून येत आहे. करोनानंतर गडकरींनी आपल्या जीवनशैलीत केलेले काही बदल त्यांनी सांगितले.135 वरून 89 आणलेलं वजन आणि श्र्वसन संबंधित तक्रारी दूर करण्यासाठी योगा, प्राणायाम व व्यायामाची मदत झाल्याचे गडकरी सांगतात. पैसे हे जीवनाचं साधन आहे, ध्येय नाही, असं म्हणत गडकरींनी …

Read More »

विदर्भात दोन दिवस पाऊस : हवेत वाढला गारठा

राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. किमान तापमानात घट झाल्याने नागपुरात कमालीचा गारठा वाढलाय. विदर्भात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. उत्तर महाराष्ट्रासह, उत्तर मराठवाड्यात गारठा कायम आहे. उर्वरित राज्यातही किमान तापमानाचा पारा काहीसा घसरला आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या उत्तरेकडील भागात गारठा कायम असला तरी, नागपूर आणि परिसरात काल (मंगळवार) रात्रीपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे किमान …

Read More »

‘जलसंपदा’चे अभियंता गोडसे यांना निलंबित करा : कोट्यवधीचे बनावट वृक्षारोपण

औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत लघुपाटबंधारे विभागात 2019 ते 2022 मध्ये विविध कामे करण्यात आली. मात्र,या कालावधीत विविध प्रकल्प, सिंचन वसाहतीवर कोट्यवधीचे बनावट वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. यासाठी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे जबाबदार आहेस. या कामासाठी निविदा काढल्या मात्र वृक्षारोपण कागदावर दाखवून मलाई खाण्यात आली. इतकेच नाही तर एकाच खड्यात दोन झाडे लावण्याचा पराक्रमही गोडसे …

Read More »