Breaking News

राज्य

भूसंपादन न करता तयार झाला रस्ता, शेतकऱ्यांची ओरड…. वाचा

  विश्व भारत ऑनलाईन : शेताच्या बाजूने रस्ता तयार करायचा असल्यास भूसंपादन प्रक्रिया केली जाते. मात्र, किरकोळ भूसंपादन करून रस्ता तयार केल्याची ओरड शेतकऱ्यांची आहे. सातारा जिल्ह्याला वेगवान करण्यासाठी अनेक राष्ट्रीय महामार्ग झाले. पुणे- बेंगलोर या 4 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाला तर आशियाई महामार्ग 47 म्हणून मान्यता देखील मिळाली. आता सातारा- लातूर हा महामार्ग रस्ते विकास महामंडळाने गेल्या तीन वर्षात तयार …

Read More »

नागपूर, औरंगाबाद, कोकणमध्ये शिक्षक ; तर नाशिक, अमरावतीत पदवीधर निवडणुकीची घोषणा

विश्व भारत ऑनलाईन : नाशिक, अमरावती विभागात पदवीधर तसेच औरंगाबाद, नागपूर आणि कोकण मतदारसंघांतील शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीचा बिगुल सोमवारी वाजला. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रपरिषदेत यासंदर्भात माहिती दिली. येत्या १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान अर्ज करता येईल, प्रारूप यादी २३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल. अर्ज उपलब्ध निवडणुकांसाठी पात्र शिक्षक तसेच पदवीधरांनी प्रत्येक वेळी नव्याने नोंदणी करणे आवश्यक असते. …

Read More »

‘शिवभोजन थाळी’त गैरव्यवहार : शिंदे-फडणवीस सरकारला संशय

  विश्व भारत ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकारच्या काळातील शिवभोजन थाळी ही योजना बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय शिंदे-फडणवीस सरकारला आहे. त्यामुळे ही योजना बंद होण्याची शक्यता आहे. ही योजना बंद झाल्यास गरजूंना मोठा फटका बसणार आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील जनतेला १० रूपयांमध्ये जेवण मिळत होते. कोरोना काळात किंमत 5 रूपये करण्यात आली …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे-मुकेश अंबानी भेट… नेमकं कारण काय?

विश्व भारत ऑनलाईन : राज्यातील महत्वाच्या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांची रात्री उशिरा भेट झाली असल्याची माहिती आहे. अंबानी यांनी शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. या भेटीवेळी मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि शिंदे गटाचे नेते किरण पावस्कर हेही उपस्थित होते. भेटीनंतर रात्री १२.१५ वाजता अंबानी कुटुंबीय …

Read More »

फडणवीसांची घोषणा : विदर्भ-मराठवाड्यासाठी ‘नागपूर – गोवा’ इकॉनोमिकल कॉरिडॉर

विश्व भारत ऑनलाईन : नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग प्रमाणे नागपूर-गोवा एक्सप्रेस मार्ग बनविण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. या माध्यमातून विदर्भ – मराठवाडा – पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा ‘इकॉनोमिकल कॉरिडॉर’ विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते आज नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कॉन्सिल विदर्भ (नरेडको) या संस्थेमार्फत आयोजित एका पुरस्कार सोहळा कार्यक्रमात …

Read More »

फडणवीस नागपूर, अमरावतीचे पालकमंत्री

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे: राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर, सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया, चंद्रकांत दादा पाटील- पुणे, विजयकुमार गावित- नंदुरबार, गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड, गुलाबराव पाटील – बुलढाणा, दादा भुसे- …

Read More »

चहाची तलब आणि अख्ख कुटुंब अपघातातून बचावले…

विश्व भारत ऑनलाईन : देव तारी त्याला कोण मारी आणि काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशा अनेक म्हणी तुम्ही ऐकल्या असतील. याचा प्रत्यय देणाऱ्या काही घटनाही बऱ्याचदा समोर येत असतात. अशीच एक घटना आता नाशिकमधून समोर आली आहे. या म्हणीचा प्रत्यय मालेगावपासून जवळ असलेल्या जळगावचोंडी या गावातील ग्रामस्थांना आला. याच चहा पिण्यासाठी गेल्याने एका कुटुंबावरील मोठं संकट टळलं. …

Read More »

शासकीय बदल्यांसाठी अ‍ॅप, ऑनलाईन प्रक्रिया… देवाण-घेवाणवर निर्बंध?

विश्व भारत ऑनलाईन : बदल्यांच्या निमित्ताने चालणाऱ्या देवाण-घेवाणीवर लगाम लागणार आहे. यापुढे आरोग्य विभागातील शिपाई ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वाच्या ऑनलाइन बदल्या करण्याचा निर्णय आयोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी नवरात्रोत्सवात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानात अठरा वर्षांवरील सुमारे तीन कोटी महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे. गोंधळ कमी होणार बदल्यांमधील गोंधळ, …

Read More »

जुनी पेन्शन देणाऱ्यालाच मतदान, संघटना आक्रमक

विश्व भारत ऑनलाईन : जुनी पेन्शन योजना तातडीने लागू करण्यासाठी राज्य कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्व संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य अशी रॅली काढण्यात आली .यावेळी भडकल गेट ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी ही रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचे रूपांतर नंतर छोट्या सभेत झाले. यावेळी ‘जे सरकार आम्हाला पेन्शन देईल त्यांनाच आम्ही मतदान करु’, असा इशारा यावेळी कर्मचारी संघटनांनी …

Read More »

लिपिकांची पदे भरणार ‘एमपीएससी’

विश्व भारत ऑनलाईन : राज्यातील सर्व विभागांतील वर्ग-तीन मधील लिपिकांची रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी)भरण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. विविध विभागाच्या भरती प्रक्रियेत संबंधित विभागाकडून लिपिकाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते. मात्र, आता आयोगामार्फत लिपिक भरती होणार. सध्या राज्यातील अ आणि ब गटातील अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही आयोगामार्फत केली जाते. आयोगाच्या कार्यक्षमतेचा विचार करून मुंबई प्रमाणेच …

Read More »