राज्य

निवडणूक,अतिवृष्टीवर आज मंत्रिमंडळ बैठक

मुंबई : शिंदे- फडणवीस सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी 10 वाजता बैठक होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाची बैठक होऊ शकली नाही. आज सकाळच्या सत्रात ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्याच्या नवीन पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने हाहाकार माजवला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर, जमिनीला भेगा पडणे, …

Read More »

‘पीडब्लूडी’त बदल्या पारदर्शक करा, अन्यथा कोर्टात याचिका-मोहन कारेमोरे

नागपूर : शासकीय बदल्या म्हटलं की, आर्थिक व्यवहार आलाच. त्यातच सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्लूडी) बदल्यांचा विषय समोर आल्यास सर्वांच्या भूवया उंचावतात. यंदा बदल्यांमध्ये पारदर्शकता न ठेवल्यास न्यायालयात याचिका दाखल करणार, असा इशारा अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी दिला आहे. एकाच ठिकाणी ठाण मांडून ‘पीडब्लूडी’मध्ये बऱ्याच वर्षांपासून एक अधिकारी एकाच पदावर वर्षांनवर्षे कार्यरत आहेत. तर काही अधिकारी …

Read More »

जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी बेमुदत आंदोलनाच्या तयारीत

विश्व भारत ऑनलाईन : राज्य शासनाच्या सेवेत सन २००५ नंतर रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी 21 सप्टेंबरला राज्यव्यापी रॅलीचे आयोजन केले आहे. तसेच सरकारने वेळीच लक्ष न दिल्यास 17 लाख कर्मचारी बेमुदत आंदोलनाच्या तयारीत आहेत.राजस्थान आणि छत्तीसगढ सरकारने त्यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर महाविकास …

Read More »

राज्यात ‘मुख्यमंत्री किसान योजना’

विश्व भारत ऑनलाईन : राज्यात ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही योजना असेल. या योजनेअंतर्गंत प्रत्येक वर्षी राज्यातील शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. कृषी विभागाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. येत्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत …

Read More »

रेल्वेत नवरात्र, दिवाळीसाठी वेटिंग

विश्व भारत ऑनलाईन : श्रावणपासून उत्सवांची लगबग सुरु झालीय.गणपती, नवरात्र, दिवाळीपर्यंत रेल्वे प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ होते. त्यात यंदा पुणे, मुंबई मार्गावरील अनेक गाड्या रेल्वेच्या विविध कामासाठी रद्द करण्यात आल्या. यामुळे सध्या सुरु गाड्यांमध्ये पंधरा ते वीस दिवसांचे वेटिंग आहे. नवरात्र आणि दिवाळीसाठी प्रवाशांना महिनाभर तिकीट मिळत नसल्याचे दिसत आहे.प्रवाशांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागणार आहे. जादा गाड्यांची मागणी मध्य …

Read More »

‘लम्पी’चे थैमान,75 हजार गायी दगावल्या

मोहन कारेमोरे नागपूर : लम्पी या रोगाचा देशात १५ राज्यांमधील १७५ जिल्ह्यांत प्रादुर्भाव झाला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार देशभरात आतापर्यंत १५ लाखांपेक्षा अधिक गायी तसेच जनावरांना याची लागण झाली असून आतापर्यंत ७५ हजार गायी दगावल्या आहेत. प्रत्यक्षात याचा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. मात्र देशात ५७ हजार गायी मृत्युमुखी पडल्याचे केंद्र सरकारने सांगितले. राज्यात लम्पी आजाराच्या प्रादुर्भावाने मृत झालेल्या जनावरांसाठी शेतकरी, …

Read More »

गणपती बाप्पा मोरया,आज जडअंतकरणाने निरोप

नागपूर : कोरोनानंतर निर्बंधांविना गणेश उत्सव साजरा होत आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह असून आज शुक्रवारी (९ सप्टेंबर) राज्यात ७० हजार सार्वजनिक गणेश मंडळांमार्फत विसर्जन होणार आहेत.यासाठी लाखो गणेशभक्त मिरवणुकीत सहभागी होतील. मुंबईत १ लाख, नागपुरात 20 हजार घरगुती बाप्पांना निरोप दिला जाईल. सर्वत्र पावसाचा इशारा; राज्यात पोलिसांचा बंदोबस्त राज्यासह मुंबईत ९ व १० सप्टेंबर २०२२ रोजी जोरदार पावसाची शक्यता …

Read More »

अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना मदत, खात्यात पैसे होणार जमा

मुंबई : जून ते ऑगस्टपर्यंत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी तब्बल ३ हजार ५०१ कोटीच्या मदतीची घोषणा सरकारने गुरुवारी केली. त्यानुसार या मदतीचे वाटप तातडीने सुरू करून बाधितांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश मदत आणि पुनर्वसन विभागाने दिले. आकडेवारी अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील एकूण २३ लाख ८१ हजार ९२० हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून २५ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना …

Read More »

नियोजित थांब्यावर बस थांबवा, अन्यथा कारवाई

मुंबई : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ व ‘गाव तिथे एसटी’ अशी संकल्पना राबवून महामंडळ प्रवाशांच्या सेवेला व सुविधेला प्राधान्य देत आहे. तरीही, थांबा निश्चित असतानाही बस न थांबविणाऱ्या चालक-वाहकांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसे संकेत महामंडळाने दिले आहेत. कर्मचाऱ्यांकडून प्रवासी हित जोपासत नसल्याचे आढळून आल्यास एसटी महामंडळाने आता कठोर पवित्रा घेतला आहे. तशा सूचना महामंडळाने सर्व आगार कार्यालयाला दिल्या आहेत. प्रवासी रस्त्यावर …

Read More »

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोहन कारेमोरे यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत चर्चा

मुंबई : शेतकऱ्यांचे विविध प्रश्न तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी मंगळवारी मंत्रालयात चर्चा केली. शेतकऱ्यांना शासकीय कार्यालयाचे उंबरडे झिझवावे लागते. विविध ठिकाणी विशेष करून मराठवाडा,विदर्भात मागील काही दिवसात शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. तर, काही ठिकाणी शेतकऱ्यांनी शासकीय यंत्रणेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व घटना …

Read More »