Breaking News

कृषिसंपदा

आनंदोत्सवाची पेरणी : वनगाव-पोहरीच्या शेतकऱ्यांनी केले प्रकल्पाचे जलपूजन

विश्व भारत ऑनलाईन : दऱ्याखोऱ्यात वास्तव्य करून उदरनिर्वाह करायचा. आपल्याला निसर्गाने भरघोस दिलंय, याचीही प्रचिती तेथील शेतकऱ्यांना नव्हती. तरीही, मनात जिद्द बाळगून परिसरातील ७०० हेक्टर जमीन ओलिताखाली आणून ५ गावांमधील पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न शेतकऱ्यांनीच सोडविला. इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांनीच पुढाकार घेऊन जलपूजनही केले. दिवाळीचे औचित्य साधून औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील वनगाव-पोहरी येथील शेतकऱ्यांनी ही किमया साधली. वनगाव पोहरीचे सरपंच एकनाथ …

Read More »

शेतकरी सुखावला : अखेर पावसाने घेतली माघार

विश्व भारत ऑनलाईन : जून ते सप्टेंबर पाऊस चांगलाच बरसला. शेतकऱ्यांचे तर अतोनात नुकसान केले. परतीच्या पावसानेही शेतकऱ्यांवर दया मया दाखविली नाही. मागच्या चार महिन्यांपासून राज्यात मान्सूनने धुमाकूळ घातलाय. परतीच्या पावसानेही राज्यातील विविध भागात पाऊस सुरू होता. मात्र, आता मान्सूनचा परतीचा प्रवास थांबणार, अशी माहिती हवामान खात्याने दिली होती. कालपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. …

Read More »

भाजीपाला महागणार : 42 लाख शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका

विश्व भारत ऑनलाईन : परतीच्या पावसाने सर्वत्र दाणादान उडवली. याचा फटका सुमारे ४२ लाख शेतकऱ्यांना बसला आहे. आतापर्यंत ३० लाख शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. तर,उर्वरित ठिकाणी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. भाजीपाला महागणार मुसळधार पावसामुळे भाजी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक घटली आहे. भाज्यांची आवक पूर्ववत होताच दर कमी होतील. काही …

Read More »

शेतकरी चिंतेत : संत्रा,मोसंबी,लिंबूवर ग्रीनिंग रोगाचा प्रादुर्भाव

विश्व भारत ऑनलाईन : संत्रा, मोसंबी, लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ग्रीनिंग जातीच्या रोगाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. अकोला कृषी विद्यापीठाने यावर आवाहन केले आहे. ग्रीनिंग हा सार्वत्रिक म्हणजे जिथे फळबाग लागवड केली जातेय, त्या भागात हा रोग आढळून येतो.अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील अचलपूर सारख्या भागात या …

Read More »

मान्सून २४ पर्यंत! विदर्भातून माघार, मराठवाड्यात येलो अलर्ट

विश्व भारत ऑनलाईन : उत्तर महाराष्ट्र व विदर्भातून मान्सून माघारी गेला. मात्र, तरीही कोकण व मध्य महाराष्ट्रात त्याचा मुक्काम 24 ऑक्टोबरपर्यंत वाढला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूरसह एकूण नऊ जिल्ह्यांत 18 ते 20 ऑक्टोबरदरम्यान ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मान्सूनच्या परतीचा प्रवास रविवारी उत्तर भारतातील बिलासपूर, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, प. बंगाल या राज्यांतून झाला. महाराष्ट्रात विदर्भातून तो रविवारी परतीला निघाला. …

Read More »

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : खरीप ई-पीक पाहणीसाठी आज शेवटची संधी

विश्व भारत ऑनलाईन : खरीप हंगामातील ई-पीक पाहणी करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.शेतकऱ्यांना विहीर, बोअरवेल लावण्यासाठी तलाठी कार्यालयाचे हेलपाटे खाण्याची आवश्यकता नाही. शासनस्तरावर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाकडे जाण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. पीक विमा योजना, नुकसानभरपाई पंचनामा, शासकीय मदत किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी ई-पीक पाहणी ॲप महत्त्वाचे ठरत आहे. याचसोबत आता या ॲपमध्ये शेतकरी आपल्या शेतातील विहीर, …

Read More »

817 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, 260 मदतीपासून दूर

विश्व भारत ऑनलाईन : जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत झालेल्या ८१७ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये ३७९ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत, तर २६० प्रकरणे ही अपात्र ठरविण्यात आली आहेत. १७८ प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे. याच कालावधीत सर्वाधिक २३२ शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत. त्याखालोखाल यवतमाळ जिल्ह्यात २१८, बुलढाणा जिल्ह्यात १८५, अकोल्यात १०१ तर वाशीम जिल्ह्यात ८१ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली …

Read More »

नागपूर : परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान

विश्व भारत ऑनलाईन : परतीच्या प्रवासाला निघालेल्या मॉन्सूनने नागपूर जिल्ह्यात मोठा फटका बसला. सोमवार रात्री पाऊस आला. त्यानंतर मंगळवार सकाळपासून चांगलाच बरसत आहे.काही भागांत अल्प, तर काही भागात अतिवृष्टीसारखा पाऊस होत आहे. नागपूर शहर, उमरेड, मौदा, काटोल परिसरातील काही भागात पाऊस कमी-जास्त प्रमाणात आहे.या परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे.

Read More »

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे : बियाणे खरेदीत फसवणूक, खूणचिट्ठी तपासा

विश्व भारत ऑनलाईन : अलीकडे बऱ्याच शेतकऱ्यांची बोगस बियाण्याच्या नावावर फसवणूक झालेली आहे. शेतकर्‍यांनी खरेदीसाठी घाई केल्यास आणि पुरेसे बियाणे बाजारात उपलब्ध नसल्यास शुद्ध बियाणे मिळवताना फसवणूक होऊ शकते. त्यामुळे बियाणे खरेदी करताना शेतकर्‍यांनी शक्यतो कृषी विद्यापीठे किंवा त्यांच्याशी संलग्न असणारी संशोधन केंद्र यांचेकडे बियाणे उपलब्ध असल्यास तेथूनच खरेदी करावी. तसेच बियाणे महामंडळाचे किंवा इतर कंपन्यांचे बियाणे खरेदी करावयाचे असल्यास …

Read More »

विदर्भ, मराठवाड्यात चार दिवस तूरळक पाऊस

विश्व भारत ऑनलाईन : राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाची हजेरी कायम असेल. मोसमी पावसाचा राज्यातील परतीचा प्रवास यंदाही नियोजित सर्वसाधारण वेळेपेक्षा उशिराने होऊ शकतो.दरम्यान, शुक्रवारी (७ ऑक्टोबर) मुंबई, ठाणे परिसरात पावसाने जोरदार तडाखा दिला, पश्चिम महाराष्ट्रातही अनेक भागांत पाऊस झाला. शुक्रवारी मुंबई, ठाणे परिसरात जोरदार पावसाची हजेरी होती. कोकणात रत्नागिरीसह विविध भागांत, तर मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा आणि विदर्भातही …

Read More »