Breaking News

कृषिसंपदा

अतिवृष्टीतून औरंगाबाद जिल्ह्याला वगळले,शेतकऱ्यांमध्ये रोष

विश्व भारत ऑनलाईन : जालना,परभणी,हिंगोली,नांदेड ,लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाईची रक्कम प्राप्त झाली आहे. मात्र, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्याला नुकसानभरपाईच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. विशेष औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, सोयगाव तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतजमीन वाहून गेली आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. असे असतानाही औरंगाबाद व बीड जिल्ह्याला …

Read More »

सोयगाव, कन्नडला पावसाने झोडपले : शेतकरी आर्थिक संकटात

विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडच्या पिशोर आणि सोयगावच्या तालुक्यातील बनोटी भागात ढगफुटीदृश्य मुसळधार पाऊस झाल्याने पुर्णा – नेवपुर, अंजना-पळशी, वाघदरा यासह परिसरातील छोटी पाझर तलाव ओसंडून वाहत आहेत. यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याची प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत. सोयगाव तालुक्यातील बनोटी, किन्ही, वडगाव, दस्तापूर, गोंदेगाव,उप्पलखेडा, मोहळाई भागात कापुस आणि अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अंजना -पळशी नदिपात्रातील …

Read More »

कांदा दसरा-दिवाळीत रडवणार… वाचा सविस्तर

विश्व भारत ऑनलाईन : कांद्याचे दर काही महिन्यापासून स्थिर असून, वाढत्या मागणीमुळे महिनाभरात कांदा दरात वाढ होण्याचे संकेत आहेत. दसरा-दिवाळीपर्यंत किरकोळ बाजारात एक किलो कांद्याचे दर ३५ ते ४० रुपयांपर्यंत होऊ शकतात. सध्या किरकोळ बाजारात एक किलो कांद्याचे दर प्रतवारीनुसार २० ते ३० रुपये किलो आहेत. मागणी आणि पाऊस  महाराष्ट्रातील कांद्याला दक्षिण आणि उत्तर भारतातून मागणी असते. कर्नाटकात झालेल्या मुसळधार …

Read More »

हिंदकेसरी ‘नाग्या’ बैलाच्या निधनाने हळहळ

विश्व भारत ऑनलाईन : कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीत बेळगावचा डंका पिटणाऱ्या नाग्या बैलाचे आज रविवारी निधन झाले. वडगाव येथील बैलगाडी शर्यतप्रेमी कै. परशराम मल्लाप्पा पाखरे यांच्या ‘नाग्या’ या बैलाचे वृद्धापकाळाने झालेल्या निधनावर हळहळ व्यक्त केली जात आहे. वडगाव स्मशानभूमीत त्याच्यावर आज ( दि. १८) सायंकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. १ लाख ६२ हजारांना खरेदी वडगाव येथील बैलगाडी …

Read More »

‘पीएम किसान सन्मान’चा हप्ता लवकरच… वाचा वृत्त सविस्तर

विश्व भारत ऑनलाईन : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी किसान सन्मान योजना सुरू केली आहे. योजनेनूसार आतापर्यंत ११ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून, सप्टेंबर अखेरपर्यंत १२ वा हप्ता जमा करण्यात येईल, अशी माहिती आहे. दिवाळीच्या तोंडावर या योजनेचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा डिसेंबर ते मार्च दरम्यान असतो. ऑक्टोबर महिन्यात …

Read More »

शेतकरी चिंतेत : संत्रा बागांवर काळ्या माशीचे संकट

विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड, कळमेश्वर, सावनेर तालुक्यातील संत्रा व मोसंबी बागेत सध्यस्थितीत काळया माशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत आहे. विदर्भातील हवामान या किडीच्या वाढीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे बागांचा ऱ्हास होत असल्याची माहीती प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वंडली येथील कीटकनाशक तज्ज्ञ प्रा.प्रवीण दरणे यांनी दिली. माशीमुळे फळाच्या गुणवत्तेवर व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. काटोल व नरखेड …

Read More »

शेतकऱ्यांनो सावधान!बोगस सात-बारा ओळखा

विश्व भारत ऑनलाईन : 7/12 उतारा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विषय आहे. मात्र, अलीकडच्या काळात बोगस सातबारा वापरून कर्ज उचलून जमिनीचा व्यवहार केल्याची प्रकरणं अनेकदा समोर येतात. बोगस सातबारा वापरून कर्ज घेतलं आणि नंतर संबंधितांवर गुन्हा दाखल झाल्याची प्रकरणंही महाराष्ट्रात घडली आहेत.2 महिन्यांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात अशीच घटना समोर आली.श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे बुद्रुक गावातील 7 जणांनी संगनमतानं शेतीचे बनावट सातबारा …

Read More »

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ई-पीक नोंदीसाठी मुदतवाढ

विश्व भारत ऑनलाईन : शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणीमार्फत नवीन सुविधायुक्त सोपे आणि सुलभ ॲप तयार करण्यात आले आहे. ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुलभ मोबाईल व्हर्जन-2 विकसित करण्यात आलं आहे. हे सुधारित मोबाईल ॲप 1 ऑगस्ट 2022 पासून शेतकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. आता ई-पीक करण्याची मुदत 15 …

Read More »

पावसाने पिकांचे नुकसान,’महसूल’ने करावा सर्व्हे

विश्व भारत ऑनलाईन : बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यामुळे १० सप्टेंबर रोजी उभ्या पिकांचे नुकसान झाले होते. महसूल विभागाने या परिसरातील नुकसानीचा तात्काळ सर्व्हे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या गावांना फटका तालुक्यातील शिवणी, सोनबर्डी, आलेवाडी, लाडणापूर, वसाळी, पिंगळी, करमोडा, चिचारी, सालवन , दयालनगर , हडियामाल, सोनाळा यासह इतर भागात विजेच्या …

Read More »

राज्यात ‘मुख्यमंत्री किसान योजना’

विश्व भारत ऑनलाईन : राज्यात ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही योजना असेल. या योजनेअंतर्गंत प्रत्येक वर्षी राज्यातील शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. कृषी विभागाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. येत्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत …

Read More »