नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील व्यक्तींनी बीड नगरपालिकेची जागा शेत दाखवून तब्बल १६ हजार २२९ एकरचा पीक विमा उतरविल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. भारतीय पीक विमा कंपनीच्या चौकशीत वेगवेगळी प्रकरणे समोर येत असल्याने पीक विमा घोटाळ्याची व्याप्ती वाढत आहे. राज्यासह बीड जिल्ह्यात १ रुपया भरून पीक विमा योजनेचा पहिलाच प्रयोग खरीप हंगामात राबविण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील …
Read More »कामठी, मौदा, रामटेक, पारशिवनी तालुक्यातील पिकांचे नुकसान : पाऊस इतका झाला नसताना शेतात आणि घरात पाणी
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदी पात्रात सोडण्यात आल्याने वैनगंगा नदी काठावरील ब्रह्मपुरी तालुक्यातील गावांमध्ये पूर परिस्थिती उद्भवली असून अनेक गावाचा तालुक्याची संपर्क तुटला असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर नागपूर जिल्ह्यातील पेंच-तोतलाडोह धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने रामटेक, मौदा, कामठी, पारशिवनी तालुक्यातील गावांना धोका निर्माण झाला होता. मात्र, पाण्याची पातळी कमी होत आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. …
Read More »टमाटरचे भाव घसरल्याने शेतकरी संकटात : टमाटरवर फिरवला नांगर
वेळेला पैशापेक्षाही खूप महत्व आहे. हीच बाब टमाटरला लागू पडते. पंधरवडय़ापूर्वी प्रतिकिलो २०० रुपयांचा विक्रमी टप्पा ओलांडलेल्या टोमॅटोला आता कवडीमोल दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात टोमॅटो पिकावर नांगर फिरवला जाऊ लागला आहे. सुभाष खुरपे या शेतकऱ्याने अडीच एकरातील टोमॅटोची बाग जमीनदोस्त करीत संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. गेले दोन महिने टोमॅटो …
Read More »123 वर्षांतील सर्वात कोरडा ऑगस्ट : काही ठिकाणी टँकर सुरू, सप्टेंबरकडे लक्ष
जूनपाठोपाठ यंदाचा ऑगस्ट महिनादेखील गत १२३ वर्षांतील सर्वात कोरडा महिना ठरणार आहे. संपूर्ण देशात ऑगस्ट महिन्याच्या २३ दिवसांत फक्त ११५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याआधी सर्वात कमी पाऊस ऑगस्ट २००५ मध्ये १९०.१ मिलिमीटर इतक्या सर्वात कमी पावसाची नोंद होती. तो विक्रम २०२३ च्या ऑगस्ट मोडीत काढला आहे. गत दीडशे वर्षात सहावेळा भारतात अल निनो सक्रिय होता. त्यात पाचवेळा भारताला दुष्काळाचा …
Read More »प्रश्न दोन हजारचा : पीएम किसानचे काम ठप्प का?कारण वाचा…!
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. हे काम आता कृषी विभागामार्फत केले जाणार आहे. पीएम किसानची सर्व प्रक्रिया ऑनलाइन असून, कृषी विभागाला हे काम सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेला लॉगिन व पासवर्डच अद्याप न मिळाल्याने अनेक जिल्ह्यात पीएम किसानचे कामकाज ठप्प पडले आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. …
Read More »IAS सुनील केंद्रेकर यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार : केंद्रेकरांची ईडी चौकशी सुरु
शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी तत्कालीन औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील 10 लाख शेतकऱ्यांचे एक सर्वेक्षण केले होते. ज्यात एक लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार सुरु आहे, असा अहवाल सरकारकडे देण्यात आला. दरम्यान खळबळजनक अहवालाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटताना पाहायला मिळाले. तर यावरून आता राजकीय प्रतिकिया देखील येत आहे. या अहवालावरच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट …
Read More »पिक विम्यात झाली फसवेगिरी : भात, सोयाबीनची लागवड : ३१ एकर गायरान जमिनीवर दाखविले पिक
लातूर जिल्ह्यातल्या जेवरी शिवारात चक्क गायरान जमिनीवरच पिक विमा उतरवल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातल्या दोघांनी मिळून पिक नसलेल्या गायरान जमिनीवर हा विमा उतरवला आहे. उपजिल्हाधिकारी यांनी आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पिक विम्याच्या बाबतीत फसवेगिरी काही नवीन विषय नाही. मात्र शासनाने एक रुपयात पिक विम्याची योजना जाहीर केली. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा; याची …
Read More »नागपूर के खापरखेडा पावर प्लांट का वारेगांव एश डैम फूटने से किसानों मे हाहाकार!
नागपूर : खापरखेडा पावर प्लांट अंतर्गत मौजा वारेगांव परिसर मे स्थित राख बंधारा भारी वारिस के कारण धराशाई हो गया। नतीजा एश स्लेरी पानी की डैम से उफनती धार किसानों की खेती की फसल चौपट हो गई? अंभि। 15 से 20 दिन पूर्व फसलों की बुआई हूई थी ।जिसकी अंकुरित फसलें भी चौपट हो गई है? घटना की खबर मिलते …
Read More »राज्यात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा लाभ कधी मिळणार?वाचा
केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. पण, अजूनही या संबंधीचा शासन निर्णय न निघाल्याने शेतकऱ्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. साेमवारपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारला बोगस बियाणे, शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावरून धारेवर धरले. सर्व विषय बाजूला …
Read More »चंद्रपूर, गडचिरोलीतील 150 गावांचा संपर्क तुटला ; एकाचा मृत्यू : विदर्भात सर्वत्र पाऊस
विदर्भात पावसाने दमदार पुनरागमन केले असून चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांत पूरसदृश्य स्थिती आहे. गडचिरोली जिल्ह्यात पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने भामरागडसह १५० गावांचा संपर्क तुटला. १६ अंतर्गत मार्ग बंद झाले. चंद्रपूर जिल्ह्यात सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक वस्त्या तसेच दुकान, शाळा, कार्यालयांमध्ये पाणी शिरले. धानोरा तालुक्यात पवनी गावातील संजय उसेंडी (२८) या तरुणाचा शेतात काम …
Read More »