Breaking News

कृषिसंपदा

गव्हापेक्षा चढा दर : ज्वारीला सोन्याचे दिवस

ताटातून गायब झालेल्या भाकरीला पुन्हा मागणी वाढू लागल्याने जुने ते सोने म्हणण्याची वेळ आली आहे.मागील अनेक वर्षांपासून ज्वारीचे पीक हद्दपार झाल्याने भल्याभल्यांच्या जीभेला पाणी सुटणाऱ्या हुरड्यालाही अनेकांना मुकावे लागत आहे. पूर्वी घराघरात दिसणारा हुरडा आता डोळ्यांनीही दिसेनासा झाला आहे, तर गरिबाची म्हणून ओळखली जाणारी त्यांच्या ताटात दिमाखात मिरवणारी भाकरी कालौघांत गरिबांच्याही ताटातून बाद झाली आहे. ती आता थेट हॉटेल, भोजनालयांमधील …

Read More »

सीताफळातील गोडवा हरवला : उत्पादन निम्म्यावर ; दर्जाही घसरला

पावसाचा विपरीत व एकत्रित परिणाम झाल्याने सीताफळ उत्पादन निम्म्यावर आले असून दर्जाही घसरला आहे. हंगामाच्या सुरुवातीपासून अखेरच्या टप्प्यापर्यंत चांगला दर मिळाला. पण अपेक्षित उत्पादनाअभावी शेतकऱ्यांची मात्र मोठी निराशा झाली. करोनामुळे मागील दोन हंगाम आणि पावसामुळे यंदाचा, म्हणजे सलग तीन हंगाम वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसते. माहितीनुसार, राज्यभरात सुमारे एक लाख हेक्टरवर सीताफळाच्या बागा आहेत. डोंगर-दऱ्या, नदी, ओढय़ांच्या काठावर, …

Read More »

शिकारीसाठी शेतात लावलेल्या वीज तारांना स्पर्श ; दोन तरुणांचा मृत्यू

शिकारीसाठी शेतामध्ये लावलेल्या वीज प्रवाहित लोखंडी तारांना स्पर्श झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात ही घटना घडली. देवरी शहरालगतच्या मोठा परसटोला परिसरात या घडलेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. आशिष कोसरे (२६), अनमोल गायकवाड (२२, दोघेही रा. परसटोला (देवरी)असे मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

Read More »

कापसाचा दर 15 हजार ? शेतकऱ्यांची अपेक्षा

पांढऱ्या सोन्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्याचं सोनं होण्याची आशा दिसत आहे. नगदी पीक असलेल्या कापसाला मागील वर्षाचा हंगाम संपताना 14 हजारांवर भाव मिळाला होता. यावर्षीही कापसाचं पीक शेतकऱ्यांसाठी नवा आशेचा किरण घेऊन आलं आहे. यावर्षी हरियाणा राज्यातील पालवाल जिल्ह्यात या हंगामातील नवीन कापसाची आवक सुरु झाली आहे. इथे कापसाला 10 हजार रुपयांचा दर मिळाला आहे. हरियाणा आणि पंजाबच्या इतर भागात सप्टेंबरपासून …

Read More »

पंचनाम्याचे पैसे मागणाऱ्या 3 अधिकाऱ्यांचे निलंबन

अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. हातातोंडाशी आलेली पिक पाण्यात वाहून गेली आहे. अशा या पेच प्रसंगात शेतकऱ्यांकडून पंचनाम्यासाठी पैसे मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अखेरीस या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांसह पैसे मागण्यासाठी आलेल्या 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यात हा प्रकार घडला होता. प्रकरण काय? अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील जेऊर हैबती, चिलेखनवाडी, देवसडे येथील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे …

Read More »

महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात पीक पंचनामे करण्यासाठी 400 रुपयांची मागणी : शिंदे गटाची तक्रार

विश्व भारत ऑनलाईन : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील जेऊर हैबती, चिलेखनवाडी, देवसडे येथील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. पिकांचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून एकरी ४०० रुपयांची मागणी होत आहे, अशी तक्रार शिवसेनेने (शिंदे गट) तहसीलदार यांच्याकडे केली आहे. कृषी विभागामार्फत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करण्याकरिता शासनाचे अधिकृत अधिकारी शेतात न जाता गावातील खासगी …

Read More »

शिंदे गटाचे आमदार नाराज, शेतकरी त्रस्त : कंत्राटदारांना मोबदला मिळेना, विकासकामे रेंगाळण्याची भीती

विश्व भारत ऑनलाईन : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदार मंत्रिमंडळाच्या प्रतीक्षेत आहेत. “मंत्रिमंडळाच्या विस्ताराला उशीर होत असल्यानं आमदारांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. ही अस्वस्थता आता उघडपणे बाहेर पडू लागली आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी सर्व आमदार गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत,” अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मुख्यमंत्री शिंदेंची दमछाक बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात वाद सुरु आहे. तरी, जळगाव जिल्ह्यात …

Read More »

विदर्भाचा संत्रा बांग्लादेश, नेपाळसाठी रवाना

विश्व भारत ऑनलाईन : विदर्भातील अर्थात नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील संत्रा जगप्रसिद्ध आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील संत्र्यावर प्रक्रिया (वॅक्सीनेशन) करण्यात येत आहे. संत्रा बांग्लादेश, नेपाळ येथे पाठविण्यात येत आहे. अशा प्रकारे संत्रा साठा वरुड येथे दिसत आहे. संत्रा व्यापारी तौसिफ़ पठाण यांनी खास ‘विश्व भारत’साठी पाठविलेला खालील व्हिडीओ. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 pic.twitter.com/O8E0ZQBua4 — मन (@amul00710) October 26, 2022

Read More »

काय सांगता, चोरट्यांनी चोरली डाळिंब बाग

विश्व भारत ऑनलाईन : सांगली जिल्ह्यातील आटपाडीतील बोंबेवाडी येथे चोरट्यांनी एका डाळिंब बागेवर डल्ला मारल्याची घटना उजेडात आली आहे. चार लाख किमतीचे तब्बल तीन टन डाळिंब रातो-रात चोरून नेले आहेत. आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये डाळिंब चोरीची फिर्याद दाखल झाली आहे. सांगली आटपाडी तालुक्यातील बोंबेवाडी या ठिकाणी यशवंत मेटकरी या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या डाळिंब बागेमध्ये डाळिंबाची चोरी झाल्याची घटना घडली आहे. विक्रीसाठी …

Read More »

एक-दोन गुंठे जमिनींची दस्त नोंदणी नाहीच : हायकोर्टाची तूर्तास स्थगिती

विश्व भारत ऑनलाईन : राज्यात तुकडेबंदी कायदा अस्तित्वात असूनही जमिनींचे तुकडे पाडून दस्त नोंदणी होत होती. ही वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर जमिनींचे तुकडे पाडून खरेदी-विक्री व्यवहारांची दस्त नोंदणी करायची असल्यास संबंधित क्षेत्राचे रेखांकन (ले-आऊट) करून जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेणे बंधनकारक करण्यात आले होते. या निर्णयाला औरंगाबाद उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने ही बंदी उठवली. त्यानंतर पुन्हा पुर्नविचार …

Read More »