Breaking News

जनता कर्फ्यूच्या अफवेला उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी दिला पूर्णविराम

वर्धा: शहरात व आजूबाजूच्या परिसरात गेल्या 3 दिवसांपासून  7 दिवसाच्या जनता कर्फ्युबाबत चर्चा  सुरू आहे ,या अफवांबद्दल एसडीओ सुरेश बगळे यांनी मंगळवार दि,1 ला  स्पष्टीकरण दिले की, शहरात व परिसरात बुधवारपासून जनता कर्फ्यू लागू करण्याबाबत प्रशासनाचा कुठलाही विचार नाही. बुधवार दि, 2 पासून जनता कर्फ्यु लागू होत असल्याबाबत पोष्ट केवळ सोशल मीडियावर पसरविल्या जात आहे.आणी ह्या पूर्णपणे अफवा आहे.अशी माहिती …

Read More »

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : महाराष्ट्रात जिल्हांतर्गत वाहतुकीसाठी ई पासची गरज नाही

राज्य सरकारनं अनलॉक-4 च्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. केंद्राच्या सूचनेनंतर राज्य सरकारनं राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. सरकारन ई पास रद्द केला आहे. कोरोना व्हायरच्या महासंकटात 1 जूनपासून हळूहळू अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. Unlock चा चौथा टप्पा 1 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पहिल्या तीन टप्प्यांपेक्षा अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात आणखी नियम शिथिल करण्यात आले आहेत. मुंबईत विमानांची उड्डाण आणि लँडिंगची …

Read More »

वर्धा जिल्हा भाजपा व हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने बालाजी मंदीर, भवानी मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर, अष्टभुजा मंदिर सहीत इतरही मंदीरात घंटानाद आंदोलन

  महाराष्ट्रातील सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे भाविकांसाठी उघडी करावीत – खासदार रामदास तडस वर्धा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून बंद असलेली राज्यातली मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मिशन बिगेन अंतर्गत लॉकडाऊनच्या अटी शिथिल झाल्यानंतर अनेक राज्यातील प्रमुख देवस्थानं भाविकांसाठी खुली करण्यात आली. मात्र राज्यात अद्यापही मंदिर अथवा धार्मिक स्थळं उघडण्याची परवानगी सरकारने दिलेली नाही. त्यामुळे राज्यातील मंदिरं उघडण्याची …

Read More »

पुलाचे बांधकाम पुरहानी दुरुस्ती कार्यक्रमातुन करण्याच्या अधिका-यांना खासदार रामदास तडस यांच्या सुचना

देवळी ते दिघी बोपापूर जाणा-या रस्तावरील यशोदा नदीवरील पुलाची खासदार रामदास तडस यांनी केली पाहणी. देवळी- देवळी ते दिघी बोपापूर जाणा-या यशोदा नदीवरील पुलावर मोठया प्रमाणात भेगा पडल्याने दिघी बोपापूर जाणा-या वाहतुकीची मोठया प्रमाणात खोळबंलेली होती. शेतीचे दिवस असल्याने शेतकरी वर्गाला शेतीसाहितय, आकस्मीत रुग्णांना उपचार करण्यासाठी, तसेच कामानिमीत्य इतर ठिकाणी जाण्यायेण्याचा पुलामुळे वाहतुक खोळबंल्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. …

Read More »

नौटंकी बंद करा…. माजी आमदार अमर काळे यांचा आमदार दादाराव केचे यांचेवर आरोप…

वर्धा :आर्वी :- तालुक्यातील शेतकरी सोयाबीन या पिकांवर आलेल्या रोगांमुळे त्रस्त असताना आर्वी मतदार संघातील आमदार दादाराव केेचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी जिल्ह्यात घेतलेल्या आढावा सभेला उपस्थित न राहता भूमिपूजन करण्यात व्यस्त होते असा आरोप  माजी आमदार अमर काळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला… सविस्तर वृत्त असे की दिनांक 28/08/2020 ला महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी पिकांवर आलेल्या …

Read More »

८ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

वर्धा :- देवळी तालुक्यातील खर्डा येथे रविवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास ८ वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. पीडित चिमुकली तिची सायकल आणण्यासाठी जात असताना आरोपी किरण शहारकर याने तिची वाट अडवून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. चिमुकली रडू लागल्याने नराधमाने तिला वीस रुपये देऊन कोणाला काही सांगायचे नाही असे …

Read More »

वर्धा ब्रेकिंग :- वर्धा,देवळी,सेलू,हिंगणघाट 29, 30 ,ऑगस्ट रोजी संचारबंदी लागू

वर्धा:प्रतिनिधी:-   वर्धा,सेलू आणि देवळी तहसीलमधील कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे एसडीओ सुरेश बगळे यांनी शुक्रवारी 28 ऑगस्ट रोजी आदेश जारी केले आहे.या आदेशामध्ये दि.29 आणि 30 ऑगस्ट रोजी संचार बंदी जाहीर केली आहे.या आदेशानुसार संचारबंदीच्या काळामध्ये भाजीपाला , चिकन / मटन विक्री दुकाने , बेकरी कपडा मार्केट , किराणा हार्डवेअर / ऑटोमोबाईल सराफा बाजार , सलून , इलेक्ट्रीकल व ईलेक्ट्रॉनिक्स …

Read More »

वर्धा जिल्ह्यात आज 65 कोरोनाबाधित रुग्णांंची नोंद,तर एकाचा मृत्यू तर कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे 594 व्यक्तींना देण्यात आली सुट्टी

वर्धा प्रतिनिधी :- आज गुरुवार 27 ऑगस्ट रोजी प्राप्त कोरोना चाचणी अहवाल 147 आले असून आज 65 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहे.तसेच आज कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज रुग्णालयातून 594  व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे.तसेच आज आयसोलेशन मध्ये  एकूण 541 व्यक्ती आहे.तसेच आज 747 स्त्राव नमुने चाचणी करिता पाठवण्यात आले असल्याची माहिती आहे.आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी 15096 स्त्राव नमुने पाठवण्यात आले असून त्यापैकी …

Read More »