नाशिक : १२ जुलैला सप्तशृंगीगड घाटातील गणपती टप्प्यावरून तब्बल 400 फूट खोलदरीत बस कोसळली होती. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता. अनेक जण जखमी झाले होते. ही बस दरीत तशीच अडकून पडली होती, ही बस बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर आज दरीत पडलेली ही बस बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. दोन ते तीन दिवसांपासून ही बस काढण्याचा …
Read More »सोनिया गांधी आणि राहुल गांधी बचावले : विमानाचं इमर्जन्सी लँडिंग
काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे कालपासून कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरुत होते. विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी ते बंगळुरुला गेले होते. विरोधी पक्षांची बैठक आटोपून ते परत दिल्लीला निघाले होते. या दरम्यान भोपाळच्या राजा भोज विमानतळावर त्यांच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे. विमानात तांत्रिक बिघाड …
Read More »क्रिकेटच्या मैदानात हार्ट अटॅक : 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू
व्यायाम करताना, चालता चालता, खेळताना तरुण जागीच कोसळून मृत्यू झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. आता गुजरातमध्ये अवघ्या २० वर्षांच्या तरुणाचा क्रिकेटच्या मैदानातच मृत्यू झाल्याची घटना घडली. गुजरातच्या अरावली इथं तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अरावलीच्या मोडासा इथं गोवर्धन सोसायटीतील तीर्थ अपार्टमेंटमध्ये पर्व सोनी हा राहत होता. क्रिकेटच्या मैदानात खेळत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने तो खाली कोसळला आणि …
Read More »नागपुरात पाणीपुरी ठेल्यावर कारवाई : पाणीपुरी खाल्ल्यानं नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू
नागपुरात काही दिवसांपूर्वी पाणीपुरी खाल्ल्याने एक तरुणीचा जीव गेल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता जाग आली असून अन्न व औषध प्रशासन विभागाची नागपूरात पाणीपुरी विक्रेत्यांवर छापे टाकले आहेत. दूषित पाणीपुरी खाल्ल्यामुळे नागपुरात एका नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर एफडीए प्रशासन खडबडून जागं झालं. त्यांनी गेल्या दोन दिवसांत ५५ ठिकाणी पाणीपुरीच्या ठेल्यावर छापा टाकून कसून …
Read More »नामवंत डॉक्टरची आत्महत्या
चंद्रपूर शहरातील नामवंत नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. उमेश अग्रवाल यांनी जीवनाचा शेवट केला. स्वतः च्या क्लिनिकमध्येच त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हेवी डोसचे इंजेक्शन घेऊन डॉक्टरांनी जीवनयात्रा संपवली. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली. अग्रवालांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चंद्रपूर शहरातील वैद्यकीय क्षेत्रात डॉ. उमेश अग्रवाल हे मोठे नाव आहे. ४८ …
Read More »समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा अक्षरशः चुराडा : आणखी एक भीषण अपघात…पण?
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वीच महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला होता. यात बसने पेट घेतल्याने 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता समृद्धी महामार्गावर आणखी एका ट्रॅव्हल्सचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सावंगीजवळ समृद्धी महामार्गावर पुन्हा ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स आणि ट्रकच्या अपघातात …
Read More »म्हाडाच्या निकृष्ट संगणक प्रणालीचा फटका नागरिकांना : नव्याने निर्णय घेण्याची मागणी
म्हाडा लॉटरी 2023 च्या निकृष्ट संगणक प्रणालीचा भुर्दंड सामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. म्हाडाने निर्देशित केलेल्या मुंबईच्या घरांच्या अर्जासाठी 10 जुलै ही अंतिम तारीख आहे. असे असताना बऱ्याच नागरिकांनी अगोदर कागदपत्रे जमा करून म्हाडाकडून पडताळणी अजून झालेली नाही. त्यात विविध तालुक्यातील तहसीलदार यांच्या बदल्यामुळे आणि शालेय मुलांच्या प्रवेशाच्या कागदपत्रांच्या गडबडीमुळे नागरिकांना कागदपत्रे मिळण्यास उशीर झाला आहे. तसेच शनिवार, रविवार सुट्टी …
Read More »अमरनाथ यात्रा रोखली : पावसामुळे रस्त्यांना नदीचं रुप,19 नागरिकांचा मृत्यू
एकीकडे महाराष्ट्रात तळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता अजूनही उर्वरित महाराष्ट्रात म्हणावा तेवढा चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे बळीराजा टेन्शनमध्ये आहे. तर दुसरीकडे उत्तर भारतात पावसानं अक्षरश: थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. गावांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पवासामुळे आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर भारतात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन …
Read More »सिंचन घोटाळ्याची पंतप्रधान मोदीना अपूर्ण माहिती : महाराष्ट्रातील मंत्र्याची प्रतिक्रिया
सिंचन घोटाळ्याचे आरोप पूर्वी केले जात होते. सर्व चौकशा पूर्ण होऊन अजित पवार यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे. पंतप्रधानांना कदाचित पूर्ण माहिती दिली गेली नसेल. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीवर ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला. आगामी काळात त्यांना योग्य माहिती देऊ, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे. जिल्हा दूध उत्पादक संघाच्या बैठकीला मंत्री पाटील आले होते. …
Read More »काँग्रेसचे आमदार फुटणार! देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेसमध्येही फूट पडणार का? याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे अनेक राजकीय नेतेच याविषयी विधानं करत आहेत, पण काँग्रेसनं मात्र ही चर्चा तथ्यहीन असल्याचं सांगत ही केवळ अफवा असल्याचा दावा केला आहे, त्यामुळे काँग्रेस फूटीच्या चर्चेवरुन पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चेला पेव फुटल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेनेच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानंही भाजपशी हातमिळवणी करत सत्तेत …
Read More »
विश्वभारत News Website