Breaking News

पर्यावरण

चंद्रपुरात वाघांच्या बंदोबस्तासाठी तहसीलवर मोर्चा

चंद्रपूरच्या मुल तालुक्यातील जंगलव्याप्त गावामध्ये वाघांनी धुकाकूळ घातला आहे. अनेक शेतकऱ्यांचे जीव वाघाच्या हल्ल्यात गेले आहेत. वनविभाग वाघांच्या बंदोबस्तासाठी अपयशी ठरल्याने वाघांच्या हल्ल्यांत वाढ झाली आहे. त्यामुळे हजारो शेतकरी, शेतमजूर, नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेतृत्वात बुधवारी सकाळी राज्य शासनाविरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी दोघा व्यक्तींनी वाघांची वेशभूषा धारण करून जंगलभागातील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी वनविभागाला साकडे घातले. या गावातील नागरिक …

Read More »

विदर्भात दोन दिवस पाऊस : हवेत वाढला गारठा

राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. किमान तापमानात घट झाल्याने नागपुरात कमालीचा गारठा वाढलाय. विदर्भात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. उत्तर महाराष्ट्रासह, उत्तर मराठवाड्यात गारठा कायम आहे. उर्वरित राज्यातही किमान तापमानाचा पारा काहीसा घसरला आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या उत्तरेकडील भागात गारठा कायम असला तरी, नागपूर आणि परिसरात काल (मंगळवार) रात्रीपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे किमान …

Read More »

थंडीने होणार नववर्षाचे स्वागत : गारठा वाढेल

राज्यात कोकण वगळता इतरत्र गारठा वाढलाय. डिसेंबरअखेरीस असणारी थंडी यंदा मात्र जाणवत नसल्याचे दिसत आहे. सरासरीपेक्षा किमान तापमान २ ते ३ अंशांनी अधिक आहे. मात्र जानेवारीच्या सुरुवातीला पुन्हा एकदा थंडी वाढू शकते,असे अनुमान आहे. या काळात खूप तीव्र थंडी नसेल. सध्याच्या तुलनेत तापमानात घसरण होऊन थंडीची पुन्हा एकदा जाणीव होऊ शकेल. उत्तर भारतातील पश्चिमी प्रकोपामुळे २३ ते २७ डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रात …

Read More »

वाघ धोक्यात : नागपुरातील गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात पर्यटक बसला अपघात

नागपुरातील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयातील पर्यटनही आता व्याघ्र प्रकल्प पर्यटनाच्या वाटेवर आहेत. नुकताच येथे एका पर्यटक बसचा अपघात झाला. वाघांच्या पिंजरा परिसरात हा अपघात होऊन एका बसचा काच फुटल्याने पर्यटकांसाेबतच वन्यप्राण्यांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे लाखो रुपयाचे एक वाहन(बस) मात्र परिसरात उभेच आहे.गेल्या आठवड्यातच वाघांच्या पिंजरा परिसरात एकापाठोपाठ एक अशी तीन पर्यटक वाहने होती. त्यातील एका …

Read More »

नशीब बलवत्तर : महिला ओरडल्या आणि वाघ पळाला

संकट कधी, कोणत्या स्वरूपात येईल, हे सांगता येत नाही. मात्र,नशीब बलवत्तर असेल, तर संकटाला परतावेच लागते. असेच एक संकट वाघाच्या रूपाने चंद्रपूरात ( दि. २४) एका महिलेवर आले. वाघाने त्या महिलेच्या दिशेने उडी घेतली. मात्र, तिच्‍या जवळ असणार्‍या महिलांनी आरडाओरड केल्याने वाघाला धूम ठोकावी लागली. रीना हरीदास जांभूळे असे वाघाच्या हल्यातून बचावलेल्या महिलेचे नाव आहे. घटना कशी घडली? चिमूर तालुक्यातील …

Read More »

लोणारकडे दुर्लक्ष : विभागीय आयुक्त हाजीर हो…!-हायकोर्ट

बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या जतन, संवर्धन व विकासाबाबत कर्तव्य बजावण्यात उदासिनता दाखवल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अमरावतीच्या विभागीय आयुक्तांना २१ डिसेंबरला न्यायालयात समक्ष हजर राहण्याचा समन्स बजावला आहे. रामसर पाणथळ स्थळाचा दर्जा मिळालेल्या लोणार सरोवरात वैज्ञानिकदृष्ट्या संशोधनाला भरपूर वाव असून जगभरातून संशोधक व पर्यटक येथे मोठ्या संख्येने भेट देतात. या सरोवराच्या जतन, संवर्धन व विकासाबाबत दिरंगाई होत असल्याविषयीची …

Read More »

रानकुत्र्यांनी केली वाघाची शिकार : झुंजीत मृत्यूची शक्यता

चंद्रपूरातील नागभीड तालुक्यातील किटाळी गावालगतच्या जंगलात वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी वाघाचे आणि रानकुत्र्यांच्या पायाचे ठसे आढळले. त्यामुळे वाघाचा मृत्यू अन्य एखाद्या वाघासोबत किंवा रानकुत्र्यांसोबत झालेल्या झुंझित झाल्याची शक्यता वनखात्याने वर्तवली आहे. मृत वाघ अंदाजे २ ते २.५ वर्षांचा असून वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पोस्टमार्टमनंतर घटनास्थळीच वाघावर अंत्यसंस्कार करणार असल्याचे वनविभागाने सांगितले. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांत …

Read More »

स्वच्छ सर्वेक्षणाला दांडी : 11 वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस

करोडो खर्च करून विविध शहरे स्वच्छ करण्यासाठी मोदी सरकार पुढाकार घेत आहे. मात्र, अधिकारी उदासीन असल्याचे पाहायला मिळत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 च्या जनजागृती कार्यशाळेला आणि बैठकांना दांडी मारणार्‍या 7 उपायुक्त, 3 सहायक आयुक्त व एका क्षेत्रीय अधिकार्‍यांस पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी कारणा दाखवा नोटीस बजावली आहे.तीन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. …

Read More »

महाराष्‍ट्र गुजरातला देणार वाघ : बदल्‍यात कोल्‍हा अन् इमू मिळणार

मागील काही महिन्यांत महाराष्ट्रातील अनेक नियोजित उद्योग गुजरात राज्यात गेल्याचा आरोप झाला. त्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले. आता औरंगाबादेतील दोन वाघही गुजरातला जात आहेत. अहमदाबादच्या कमला नेहरू प्राणिसंग्रहालयाला दोन वाघ देण्याच्या आणि त्यांच्याकडून कोल्हा, इमू यासह इतर काही प्राणी स्वीकारण्याच्या प्रस्तावाला औरंगाबाद महापालिकेने मंजुरी दिली आहे. त्यानुसार येत्या पंधरा दिवसांत प्राण्यांचे हे हस्तांतरण होणार आहे. महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात तीनशेहून …

Read More »

शिकारीच्या शोधात बिबट्या पडला विहिरीत

पुण्यातील लोणी खुर्द (मापरवाडी ) परिसरात दत्तात्रेय शंकर घोगरे यांची शेतातील त्यांच्या घराजवळील विहिरीमध्ये शिकार करण्याच्या नादात बिबट्या विहिरीत पडला. या भागात अनेक दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत होते. आजही या शिवारात तीन ते चार बिबट्याची वास्तव आहे, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक दिवसांपासून परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्यामुळे नागरिकांमध्ये घबरटीचे वातावरण आहे. अनेक वेळा वन विभागास परिसरातील नागरिकांनी माहिती …

Read More »