Breaking News

पर्यावरण

लातूर : किल्लारी परिसरात पुन्हा भूकंप

लातूर जिल्ह्यातील किल्लारी व परिसरातील गावांना येथे आज शनिवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास भूकंपाचा सोम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची नोंद 2.4 अशी झाली आहे. रात्री लोक गाढ झोपेत असताना दोन वाजण्याच्या सुमारास भूगर्भातून मोठा आवाज आला व जमीन हादरली. यामुळे किल्लारी, किल्लारी वाडी, यळवट, शिरसल, मंगरुळ जुने किल्लारी, एकोंडी गावातील नागरिक घराबाहेर आले. घाबरून नागरिकांनी रात्र घराबाहेरच जागून काढली. …

Read More »

चंद्रपूरमध्ये पकडले 20 अजगर

चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील चांदापूरच्या शेतात तेरा फूट लांबीचा अजगर काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास पकडण्यात आला. यावर्षी मूल तालुक्यातून 20 अजगर पकडल्याची नोंद आहे. आत्तापर्यंत सापडलेला हा सर्वांत मोठा अजगर असल्याचे कळते. येथे सापडले अजगर बंडू कडूकर यांच्या शेतात धान कापणी सुरू आहे. धान कापणी करताना मजूरांना भला मोठा साप असल्याचे दिसून आले. त्यांनी काम बंद करून दिलीप पाल यांना याची …

Read More »

मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पाऊस : मराठवाडा, विदर्भ?

दिवसा ढगाळ वातावरण राहिल्यामुळे कमाल तापमानात वाढ,तर रात्रीच्या वेळी किमान तापमानात वाढ होत आहे. मात्र, 13 आणि 14 नोंव्हेबरला मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीस राज्यात असलेली थंडी आता कमी होऊ लागली असून, अनेक भागांत अंशत: ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यातच चार ते पाच दिवसांत दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता …

Read More »

गडचिरोलीत हत्तीचा हल्ला : एक ठार, पिकाचेही नुकसान

कोरची तालुक्यात हत्तींचा धुमाकूळ सुरुच आहे. शुक्रवारी रात्री हत्तीने एका (७० वर्षीय) वद्धास पायाखाली तुडवून ठार केली.ही घटना तलवारगड गावात घडली. धनसिंग टेकाम असे ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. या हत्तींनी गावातील काही घरे आणि धानपिकांचेही नुकसान केले. तलवारगड हे गाव दुर्गम व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असून, टिपागड डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. गावात ८ घरे आहेत. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास …

Read More »

विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला जीवदान

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील करंदी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला जीवदान मिळाले. शिरूर वन विभाग व प्राणीमित्रांना यश आले आहे. करंदी येथील कौडाळ मळा येथील अशोक पर्‍हाड हे शनिवारी (दि. 5) दुपारच्या सुमारास शेतात गेले असता त्यांना विहिरीमध्ये बिबट्याचा बछडा पडल्याचे दिसून आले. यासंदर्भात माहिती त्यांनी शिरूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना दिली. वनरक्षक बबन दहातोंडे, वनमजूर आनंदा हरगुडे, …

Read More »

बैल चारत असताना वाघाचा हल्ला : शेतकरी ठार

बैल चारत असताना वाघाने हल्ला करुन एका शेतकऱ्यास ठार केले. ही घटना गुरुवारी (दि.३) दुपारी दोन वाजताच्या सुमारास गडचिरोलीपासून ८ किलोमीटर अंतरावरील राजगाटा चेक गावानजीक घडली. सुधाकर भोयर (वय ५० रा.राजगाटा चेक) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सुधाकर भोयर हे आज बैल घेऊन शेतावर गेले होते. शेतालगतच्या जंगलात बैल चारत असताना अचानक भोयर यांच्यावर वाघाने हल्ला केला. यात ते …

Read More »

कर्मचाऱ्यांची बैठक सुरू असतानाच निघाला किंग कोब्रा

आरोग्य कर्मचाऱ्यांची बैठक सुरू होती. बैठक सुरू असतानाच अचानक आरोग्य केंद्रात चक्क कोब्रा साप निघाल्याने एकच गोंधळ उडाला. हा अंगावर काटा आणणारा प्रकार घडला बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला. आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणारी उपकेंद्रातील कर्मचारी यांची मासिक बैठकीचे आयोजन आज दुपारी करण्यात आले होते. बैठकीचे कामकाज सुरू असताना अचानक प्राथमिक आरोग्य केंद्रातील बैठक …

Read More »

सचिन तेंडुलकरच्या आवडत्या वाघिणने दिलाय 3 बछड्यांना जन्म

विश्व भारत ऑनलाईन : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र अभयारण्यातील दिमाखदार तोऱ्यात वावरत असलेली व पर्यटकांना भुरळ घालणारी झुनाबाई ही वाघीण १७ बछड्यांची आई बनली आहे. नुकतेच तिने पाचव्यांदा तीन बछड्यांना जन्म दिला आहे. देशभरातून ताडोबात येणारे पर्यटक झुनाबाईची झलक पाहण्यासाठी आतूर असतात. तिच्या वारंवार होणाऱ्या दर्शनाने पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा शुध्दा तिचा …

Read More »

अजगराची हत्या,वनविभाग सक्रिय

विश्व भारत ऑनलाईन : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात एका अजगराची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वनविभागाने गुन्हा दाखल करत संशयिताची चौकशी सुरु केलीय. तालुक्यातील मलंगगड परिसरात उसाटणे गाव आहे. या गावातील खोणी तळोजा महामार्गाच्या बाजूला आज सकाळी काही फोटो स्थानिक व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाले. अजगराचं डोकं ठेचून त्याची हत्या करण्यात आली होती. याबाबतची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी …

Read More »

हृदय श्वसनक्रिया बंद पडल्याने 4 वर्षीय वाघिणीचा मृत्यू

विश्व भारत ऑनलाईन : हृदयक्रिया बंद पडल्यानेच वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना हिंगणा परिक्षेत्रात घडल्याची माहिती समोर आली आहे.वाघांच्या वाढत्या मृत्यूमुळे वन विभाग चिंतेत असतानाच परत एका वाघिणीचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे नागपूर जिल्ह्यात वाघांची शिकार वा मृत्यूच्या घटना नव्या नाहीत. यापूर्वी २३ मार्च २०२१ रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागवाडी परिक्षेत्राच्या शेजारील एफडीसीएमच्या रिसाला परिक्षेत्रात एक वाघ कुजलेल्या स्थितीत आढळून …

Read More »