Breaking News

पर्यावरण

लम्पीचा धोका कोंबडे, वाघांनाही? खरं काय आहे?

विश्व भारत ऑनलाईन : लम्पी रोगाचा प्रसार होऊ लागल्यापासून विविध अफवा उडू लागल्या आहेत. कोंबड्यांमध्ये हा रोग पसरतो आहे, वाघांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, अशा अनेक चर्चा सुरू आहेत. मात्र, आजघडीला असा कोणताही धोका नसल्याचे पशुवैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे. सध्या केवळ गोवंशावर हा रोग दिसून येतो आहे. म्हशी किंवा बकऱ्यांमध्ये तसेच श्वानांमध्येही याची कोणतीच लक्षणे अद्याप आढळलेली नाही. तरी, …

Read More »

भंडारा : वाघाने घेतला दुसरा बळी

  विश्व भारत ऑनलाईन : आठवड्याभरापूर्वी मासेमारी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला वाघाने ठार केल्याच्या घटना ताजी असतानाच पुन्हा त्याच वाघाने पिकांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर हल्ला करुन ठार केले आहे. लाखांदूर तालुक्यातील कन्हाळगाव शिवारात घडलेल्या या घटनेमुळे मानव-वन्यजीव संघर्षाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. तेजराम बकाराम कार ( वय ४५, रा. कन्हाळगाव, ता. लाखांदूर) असे वाघाच्या हल्ल्यात मूत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव …

Read More »

मृत्यूचा सापळा : 44 वन्यप्राणी ठार.. वाचा सविस्तर

  विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्ह्यातील पेंच ते खवासा हा राष्ट्रीय महामार्ग ४४ वन्यप्राण्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच या महामार्गावर महाराष्ट्राच्या बाजूने भरधाव वाहनाच्या धडकेत एका बिबटय़ाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा मध्यप्रदेशातील खवासा सीमेजवळ वाहनाच्या धडकेत मादी बिबट मृत्युमुखी पडला आहे. हा परिसर ‘ग्रीन कॉरिडॉर’ म्हणून ओळखला जात असून वन्यजीवांच्या सुरक्षित हालचालीसाठी तो बांधण्यात आला …

Read More »

वन कर्मचाऱ्यावर चंदन तस्करांचा गोळीबार

विश्व भारत ऑनलाईन : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावजवळील पाटणा जंगलात चंदनाच्या वृक्षांची कत्तल करणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली. तस्करांनी वन कर्मचाऱ्यांच्या अंगावर कुऱ्हाड मारुन फेकत गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केला व तेथून पळ काढला. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटणा जंगलात चंदनाची झाडे तोडणाऱ्या टोळीला हटकणाऱ्या वन विभागाच्या …

Read More »

महाविद्यालयीन विद्यार्थी अडकले वन्यप्राण्यांच्या तस्करीत…. वाचा

विश्व भारत ऑनलाईन नाशिक : मुलांचे सध्याचे असलेले महागडे शोक मध्यमवर्गीय आई वडील  पूर्ण करू शकत नाही. मात्र मुल हे शोक पूर्ण करण्यासाठी गुन्हेगारी कडे वळू लगले आहेत. सायबर गुन्हेगारीत झटपट पैसे मिळत असल्याने तरुण मुल ऑनलाईन (Online) गुन्ह्याकडे मोठ्या प्रमाणात वळले आहे. आता तरुणांनी वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी (smuggling) करण्याचे सुद्धा सुरु केले असुन नाशिक मध्ये तीन महविद्यालयीन (College students) …

Read More »

चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला.. कुठे घडली घटना?

विश्व भारत ऑनलाईन : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीलगतच्या आयुध निर्माणी वसाहतीतील सेक्टर चारमध्ये घरात खेळणा-या एका चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात प्राची पंढरी नन्नावरे(वय 4)ही चिमुकली किरकोळ जखमी झाली. ताडोबा लगतच्या आयुध निर्माणी वसाहत परिसरातील जंगलात वाघ आणि बिबट्याचे वास्तव्य आहे. येथील हिंस्त्र वन्यप्राणी आता घराच्या दारावर पोहोचून हल्ला करीत असल्याने वसाहतीत दहशतीचे वातावरण आहे. या वसाहतीत यापूर्वी वाघ आणि …

Read More »

बिबट्याच्या भीतीने शाळेला दुपारनंतर सुटी.. वाचा

विश्व भारत ऑनलाईन : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील वारुळवाडी शिवारात लागोपाठ दोन दिवस बिबट्याचे दर्शन झाले. सोमवारी (दि. १९) सकाळी वारुळवाडी येथे बिबट्याला जेरबंद करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी (दि. २०) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नारायणगाव येथील रा. प. सबनीस शाळेच्या आवारामध्ये मुलींच्या वसतिगृहासमोर बिबट्या ठाण मांडून बसल्याचे आढळल्याने शालेय विद्यार्थी, तसेच नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. वनविभाग व रेस्क्यू …

Read More »

अवैध वाळू प्रकरण विधानसभेत : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार काढले, वाचा…

विश्व भारत ऑनलाईन : विधानसभेपर्यंत गाजलेल्या अवैध वाळू उपसा प्रकरणात परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने पहिल्यांदाच सर्वत्र चौकशीची थेट मागणी करण्यात आली होती.यांनतर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे असलेले गौण खनिजचे काम हे त्यांच्याकडून काढून घेत थेट जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी स्वतःकडे ठेवले आहेत. तसेच कुळ,इनाम जमिनी सुनावणीची प्रकरणे …

Read More »

महाराष्ट्रातही येणार चित्ता…पण कधी?वाचा…

विश्व भारत ऑनलाईन : नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या चित्त्यांना पुन्हा देशात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खास प्रयत्न केले. नामिबियाहून 8 चित्ते भारतात आले. या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले. यानंतर आता चित्ता मुंबईतही यावा अशी मागणी होत आहे. मुंबईतील राणीच्या बागेत… मुंबई महापालिकेने 2018 मध्ये राणीच्या बागेत परदेशातून वन्यजीव आणण्याची योजना आखली होती. त्यात चित्त्यासह पांढरा सिंह, …

Read More »

बिबट सफारी रद्द,अजित पवारांना धक्का…वाचा

विश्व भारत ऑनलाईन : बारामतीमधील प्रस्तावित असलेली बिबट सफारी अखेर शिंदे सरकारने रद्द केली आहे. ही बिबट सफारी आता जुन्नरला होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यामुळे विरोधी पक्षनेते आणि बारामतीचे आमदार अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचवेळी जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके आणि शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनावणे दोघेही खुश झाले आहेत. नेमके प्रकरण काय? …

Read More »