Breaking News

देश

गेल्या २४ तासात देशात ९५ हजार ७३५ नवे करोनाबाधित रुग्ण

भारतातील रुग्णसंख्या ४४ लाखांच्या वर भारतातली करोनाबाधित रुग्णसंख्येने ४४ लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या २४ तासात देशात ९५ हजार ७३५ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ११७२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या ४४ लाख ६५ हजार ८६४ इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. यामध्ये ९ लाख १९ हजार १८ अ‍ॅक्टिव्ह …

Read More »

Golden Arrows: आकाशातील प्रभुत्व आणि अचूक हल्ले, राफेल विमानं भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात

पूर्व लडाखमध्ये भारत व चीन यांच्यात सीमेवरील तणाव वाढला असतानाच, अंबाला हवाई तळावर गुरुवारी राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा भारतीय हवाई दलात औपचारिकरीत्या समावेश केला जाणार आहे.राफेल’च्या समावेशाबरोबरच, पारंपरिक सर्वधर्म पूजा, राफेल आणि तेजस विमानांसह ‘सारंग हवाई कसरत चमूचे’ हवाई प्रदर्शन यांचा कार्यक्रमात समावेश असेल. हा कार्यक्रम हवाई दलाच्या इतिहासातील ‘अतिशय महत्त्वाचा मैलाचा दगड’ ठरेल, असे हवाई दलाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं …

Read More »

जनरल डब्यांसह संपूर्ण गाडी एसी करण्याची योजना

कमी खर्चात प्रवाशांना आणखी आरामदायी प्रवास उपलब्ध होणार भारतीय रेल्वेमध्ये आजवर वेळोवेळी प्रवाशांच्या आरामदायी प्रवासाच्या दृष्टीने अनेक बदल झाले आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा रेल्वे कात टाकणार असून आणखी एक महत्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार, आता कमी खर्चात नागरिकांना एसी डब्यातून प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. म्हणजेच रेल्वेने जनरल डब्यांसह सर्व डबे एसी करण्याची योजना आखली …

Read More »

मोठी झेप! DRDO कडून हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी, शत्रूला कळण्याआधीच होणार प्रहार

ओदिशामधील बालासोर येथील अब्दुल कलाम टेस्टिंग रेंजवर सोमवारी भारताने स्वबळावर विकसित केलेल्या हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी घेतली. या स्वदेशी टेक्नोलॉजीमुळे हवेत ध्वनिच्या वेगापेक्षा सहापट अधिक वेगाने (माच ६) लक्ष्याच्या दिशेने झेपावणारे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिका, रशिया आणि चीन नंतर हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे. हायपरसॉनिक टेस्ट डेमॉनस्ट्रेटर व्हेइकलची (HSTDV) ही …

Read More »

“अभिनंदन भारत!”; मुलाच्या अटकेनंतर रियाच्या वडिलांनी सोडलं मौन

शोविक चक्रवर्तीच्या अटकेनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे वडील व निवृत्त लेफ्टनंट कर्नल इंद्रजित चक्रवर्ती यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. “अभिनंदन भारत”, असं म्हणत त्यांनी या अटकेचा निषेध व्यक्त केला आहे. दंडाधिकारी न्यायालयाने शनिवारी शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. चित्रपटसृष्टीशी निगडित व्यक्तींना शोविक अमली पदार्थ पुरवत होता, असा संशय अमली पदार्थविरोधी पथकाला आहे. शोविकनंतर रियावरही अटकेची …

Read More »

अरुणाचल प्रदेशातील ५ नागरिकांचं चिनी सैन्याकडून अपहरण; आमदाराचा दावा

गेल्या अनेक दिवसांपासून भारत चीनदरम्यान तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत भारताच्या २० जवानांना हौतात्म्य आलं होतं. तर भारतीय जवानांनी प्रत्युत्तर देत चीनच्या ४० जवानांना ठार केलं होतं. त्यानंतर अद्यापही दोन्ही देशांमधील तणाव निवळलेला नाही. एकीकडे चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे चीनकडून मात्र कुरापती सुरूच आहेत. दरम्यान, अरुणाचल प्रदेशमधील ५ भारतीयांचं चिनी सैन्यानं अपहरण केल्याची माहिती आता समोर …

Read More »

तामिळनाडू : कुडलोरमधील फटाका कारखान्यात भीषण स्फोट, सात ठार

तीन जण जखमी, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता तामिळनाडूच्या कुडलोर जिल्ह्यातील एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घनटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले माहिती समोर आली आहे. स्थानिक प्रशासनाच्या मते या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कुडलोरचे पोलीस अधीक्षक एम श्री अभिनव  यांनी या बाबत माहिती दिली आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू …

Read More »

GDP आकडेवारी: मोदींनी अर्थव्यवस्था खिळखिळी केली, विदेशी प्रसारमाध्यमांची टीका

केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने सोमवारी जीडीपीचे आकडे जाहीर केल्यानंतर देशभरात चर्चेला उधाण आलं. उणे 23.9 या दरामुळे पंतप्रधान मोदींवर विदेशी प्रसारमाध्यमांनी जोरदार टीका केली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची 1996 नंतरची ही सगळ्यात ऐतिहासिक घसरण आहे असं मानलं जात आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि देशभरात लागू करण्यात आलेलं लॉकडाऊन यामुळे ही स्थिती उद्भवल्याचं सांगितलं जात आहे. जगातील वेगाने मोठं होऊ पाहणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा …

Read More »

पब्जीसह तब्बल ११८ऍप्सवर भारत सरकारने घातली बंदी !

नवी दिल्ली | भारत-चीन तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर भारत सरकारने टिकटाॅक, शेअरईट सारख्या तब्बल १०० ॲप्सवर भारतात बंदी घातली होती.त्यानंतर अनेकांनी आपली उपजिविकेचे साधन बंद झाल्याबद्दल निराशा व्यक्त केली तर काही जणांनी देशाची सुरक्षितता हे प्राधान्य असल्याचं मतं नोंदवलं.मात्र त्यानतंर आता सरकारने अजुन एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील सार्वभौमत्व आणि एकात्मता कायम राखण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलली जात असतानाच …

Read More »

PFचे पैसे काढताना ‘या’ अटी-नियमांकडे लक्ष द्या

नवी दिल्ली : प्रोविडेंट फंड अर्थात पीएफ ऑनलाईन पद्धतीने काढण्याचा सोपा मार्ग आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीकडून एक खास सुविधा देण्यात आली आहे. त्याद्वारे पीएफचे पैसे काढणं अधिक सोपं होणार आहे. आता ऑनलाईन आधार-आधारित सुविधेचा वापर करुन EPF खात्यातून पैसे काढता येऊ शकतात. पीएफचे पैसे काढण्यासाठी काही नियम-अटी लागू आहेत. पैसे काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करताना या नियम-अटींचं पालन करणं गरजेचं …

Read More »