Breaking News

राजकारण

मनसेतर्फे शिवाजी महाराज जयंती साजरी

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रामटेक तालुक्यातील मनसर येथील वृद्धाश्रमात केक व मिठाई वितरित करण्यात आली. वृद्धाश्रमातील आबाळ-वृद्धांसमवेत रामटेक तालुका मनसे अध्यक्ष शेखर दुंडे यांचे अध्यक्षतेखाली शिव-जयंती उत्सव साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात राजसाहेब ठाकरे यांचे नेतृत्वातच महाराष्ट्रात पुन्हा रयतेचे राज्य निर्माण होईल,असा आशावाद वृद्धाश्रमातील आबाळ-वृद्धांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे कौतुक करीत सहभागी सर्वांना आशिर्वाद दिला. सदर प्रसंगी माजी …

Read More »

…तर भाजपचा नक्कीच काँग्रेस होईल! सत्तेचा अहंकार सोडा; फडणवीस यांचे पदाधिकाऱ्यांना खडेबोल

केंद्रात, राज्यात सत्ता असल्याने अहंकाराने वागू नका. हा अहंकार जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे नेत्यांनी कार्यकर्ते म्हणून काम करावे अन्यथा भाजपची काँग्रेससारखी स्थिती होईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. शिक्षक मतदारसंघात भाजप समर्थित उमेदवाराचा पराभव, माजी नगरसेवकांच्या विरोधातील असंतोष, कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्या नागपूर शहर कार्यकारिणीची बैठक झाली.बैठकीच्या समारोपाला फडणवीस …

Read More »

भाजप आमदाराची मंत्र्याविरोधात आयएएस अधिकाऱ्याकडे तक्रार

भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात सारं काही सुरळीत सुरु आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचा विचार करताय. या दोन्ही पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचं काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील हा प्रकार आहे. जिल्हा वार्षिक योजना 2022-2023 अंतर्गत निधी वाटपात मोठा असमतोल झाल्याची तक्रार भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नियोजन विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे. …

Read More »

पवार,अनिल देशमुख यांची गडकरींसोबत नागपुरात भेट

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात नागपुरात भेट झाली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यावेळी उपस्थित होते, हे विशेष. पवार विदर्भाच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, गडकरी यांची भेट घेण्याचे कोणतेही नियोजन पवारांच्या कार्यक्रमात नव्हते. शनिवारीच देशमुख यांना कोर्टाने नागपूरला जाण्याची परवानगी दिली होती. त्यांचे शनिवारी नागपुरात जंगी स्वागतही झाले. आज पवार यांच्यासोबत गडकरी यांची नागपूर …

Read More »

भगतसिंग कोश्यारी राजकारणात जाणार : रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

राष्ट्रपतींनी भगतसिंग कोश्यारी यांचा महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा स्वीकारला आहे. महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली, अशी घोषणा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्याकडून करण्यात आली आहे. कोश्यारी राजकारणात लवकरच सक्रिय होणार असल्याची चर्चा आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि लडाखचे नायब राज्यपाल राधा कृष्णन माथूर यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. …

Read More »

केदार करणार मध्यस्थी : पटोले-थोरात वाद, पटोलेंची भूमिका अयोग्य!

राज्यातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात वादाची ठिणगी पेटली आहे. हा वाद शांत करण्यासाठी 15 फेब्रुवारीला मुंबईत बैठक होणार आहे. यात विदर्भातील काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार यांची भूमिका महत्वाची असेल. चार भिंतीच्या आत हा वाद संपवायचा आहे. हायकमांडकडे न जाता राज्यातील वाद येथेच कसा मिटविता येईल, याकडे लक्ष केंद्रीत केले जाणार …

Read More »

बाळासाहेब थोरात भाजपात? भाजपच्या मोठ्या नेत्याचा दावा

नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर आमदार सत्यजीत तांबे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे.अशातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे वक्तव्य केले. सर्वांसाठी आमच्या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्यजीत तांबे यांच्यासह थोरातांना थेट ऑफरच दिली आहे. …

Read More »

बाळासाहेब थोरात काँग्रेस सोडणार?नाना पटोलेंची मनमानी

✍️मोहन कारेमोरे : नाशिक पदवीधरमधून सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यावरून सुरु झालेला वाद अजूनही संपलेला नाही. यावर काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात कधी बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. त्यावर आता थोरात बोलले असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचे मत हायकमांडला कळविले आहे.नाना पटोले यांची मनमानी थांबवा, अशा आशयाचे पत्र आहे.पक्षश्रेष्टी नाना पटोलेचा मनमानी कारभार कसा …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा ‘राजकीय गेम’ : काँग्रेसमध्येच षडयंत्र

✍️मोहन कारेमोरे : नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसने एबी फॉर्म दिलेला असतानाही पक्षाला टाळून अपक्ष अर्ज सत्यजित तांबे यांनी दाखल केला होता. तांबे यांची कृती राज्यात काँग्रेसचा धाक संपुष्टात आल्याचे लक्षण असून यासंदर्भात त्यांचे मामा ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी बाळगलेले कडकडीत मौन म्हणजे तांबे पिता-पुत्रांच्या भूमिकेला अप्रत्यक्षरीत्या दिलेले समर्थनच मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर विजयाची …

Read More »

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय वाढवा-खासदाराची मागणी

बऱ्याच वर्षांपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढविण्याचा मुद्दा चर्चेत आहे. आधी राज्य सरकारने जुनी पेन्शन आणि आता सेवानिवृत्त वयोमर्यादा वाढविण्याची मागणी चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बंडू धानोरकर यांनी केली आहे. केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ५८ वरून ६० वर्षे करण्यात यावी, अशी मागणी खासदार धानोरकर यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मागणीकडे किती लक्ष देतात, याकडे …

Read More »