वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- भारतीय जनता युवा मोर्चा वर्धा शहर तर्फे स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहर अध्यक्ष मोहित उमाटे यांच्या उपस्थितीत मेणबत्त्या पेटवून हातरस पीडित मुलीला शोक व्यक्त करित श्रद्धांजली देण्यात आली व या घटनेचा निषेध करण्यात आला.
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये घडलेली घटना स्वीकारता येत नाही, संपूर्ण देशात आंध्रप्रदेश आणि तेलंगणासारखा दिशा कायदा लागू करावा अशी प्रतिकीया युवती शहर अध्यक्ष नुपूर सुरपाटने यांनी दिली.
यावेळी सरचिटणीस चेतन गुजर,अश्रफ शेख ,वअंकित परियाल सारग नेवरे युवराज ठाकुर मयूर तिवारी कार्तिक दुबे प्रफुल उचके संकेत सावरकर सुमित कोलते आदी उपस्थित होते.