Breaking News

मलनिस्सारण प्रकल्पाचे आमदार दादाराव केचे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

वर्धा : आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांच्या अथक प्रयत्नाने आर्वी नगर परिषदेकरीता महाराष्ट्र सुवर्ण जयंती (राज्यस्तर) महाअभियान योजने अंतर्गत ४७ कोटी ४३ लक्ष रूपयांचा मलनिस्सारण प्रकल्पाचे भूमिपूजन नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार दादाराव केचे यांच्या हस्ते संप्पन्न झाले.

या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यात होणार आहे. आर्वी नगरपरिषद क्षेत्रातील सांडपाणी मलनिस्सारण प्रकल्पात शुद्धीकरण करून लगतच्या नदीत सोडण्यात येणार आहे. या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना सिंचनासाठी होईल.

या प्रसंगी प्रशांत ठाकूर गटनेता आर्वी न. प. आर्वी, भारती देशमुख उपाध्यक्षा न. प., सुनिता वाघमारे पाणी पुरवठा सभापती न. प., नरसिंग सारसर नियोजन सभापती न. प., दिपा मोटवाणी बांधकाम सभापती न. प., गंगा चकोले आरोग्य सभापती न. प., सुमित्रा ऊईके महिला व बालकल्याण सभापती न. प., पल्लवी काळे नगर सेविका, अजय कट्टमवार नगर सेवक, उषा सोनटक्के नगर सेविका, हर्षल पांडे नगर सेवक यांची प्रमुख उपस्थितीत भुमिपुजन संपन्न झाले. तसेच विनय डोळे, नंदू वैद्य, राजाभाऊ गिरधर, प्रशांत वानखेडे, नारायण लोंढे, राजेश जैन, सुरज काने, शाम काळे, हेमंत काळे, रणजित घोडमारे, अब्बु हसन, मथुरेश पुरोहित, जितेंद्र ठाकरे, दुर्गेश नंदिनी पुरोहित, अश्विन शेंडे, प्रविण वानखेडे, कुणाल कोल्हे, स्वप्नील जाधव, रवी चांदुरकर, लवेश गलोले, नरेंद्र दाहीर, राजाभाऊ वानखेडे, शिरपूरकर, अमर धांदे योगेश कातोडे, देवराव गंधे, सारंग पचारे, मयुर कडू, भुयार, घाटोड, किटे, रेवतकर, विरूळकर, नेहारे, जहकर, पांढरे, घागरे, भगत, नागरे, इंगोले, दिनेश घसाड यांच्या सह परीसरातील नागरीकांची लक्षणीय उपस्थिती होती.

About Vishwbharat

Check Also

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा

वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *