Breaking News

थंडीत मेथी अन् डिंकाच्या लाडूंना मागणी… विविध रोग करा दूर

Advertisements

हिवाळ्यातील थंडी वाढली की, अनेकांना मेथी आणि डिंकाच्या लाडूचे वेध लागतात. आरोग्यवर्धकतेसाठी हिवाळ्यात मेथी आणि डिंकाचे लाडू फायदेशीर आहे. त्यामुळे थंडी वाढली कि, अनेक घरात डिंकाचे लाडू करण्यासाठी महिलांची लगबग सुरू होते. मात्र इतर खाद्य पदार्थांप्रमाणेच डिंकाच्या लाडूसाठी लागणारा सुका मेवा देखील यंदा महाग झाला आहे. त्यामुळे डिंकाचा लाडू यंदा महाग होणार आहे.

Advertisements

मागील वर्षीच्या तुलनेत सुकामेव्याच्या दरात यंदा सुमारे १० टक्क्यांपर्यंतची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यापासून थंडीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे बाजारपेठेत सुकामेवा, डिंक आणि मेथीच्या मागणीत वाढ झाली आहे. परंतू जशी मागणी वाढू लागली तशी दरांतही वाढ होत आहे. दरम्यान अनेकांना डिंकाचे लाडू आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, त्यामुळे काही घरांमध्ये त्याला पर्याय म्हणून तीळाचे किंवा मेथीचे लाडूसुद्धा करतात. हिवाळ्यात घरी सुका मेवा व इतर आवश्यक साहित्य नेऊन डिंकाचे लाडू तयार केले जातात तसेच शहरातील काही दुकानांमध्ये डिंकाचे लाडू तयार करुन सुद्धा मिळतात.

Advertisements

आरोग्यदायी ऋतू

हिवाळा हा ऋतू आरोग्यासाठी उत्तम असतो. आयुर्वेदातही या ऋतूचे वेगळे महत्त्व आहे. आरोग्य चांगले राहावे यासाठी कॅलरीजयुक्त पदार्थ, गरम पदार्थ या ऋतूत मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात.

हिवाळ्यात डिंकाचे लाडू सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर डिंक उष्ण असतो. हिवाळ्यात शरीराला उष्णता मिळावी, म्हणून डिंक आणि सुका मेव्याचे लाडू शरीरासाठी उत्तम राहते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि आरोग्य चांगले राखण्यासाठी हिवाळ्यात डिंकाच्या लाडूचे सेवन फायदेशीर ठरते. डिंकाचे लाडू खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यासोबतच बद्धकोष्ठता दूर होण्यास तसेच हाडे मजबूत हाेण्यास मदत होते. त्याच्या सेवनामुळे सांधेदुखीवर आराम मिळतो. बाळंतीणीसाठी डिंकाचे लाडू उपयुक्त असतात. मात्र ते प्रमाणात सेवन करावेत, असे आहारतज्ज्ञ सांगतात.

तुपातही वाढ

सुकामेवा आणि लाडू तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या साजुक तूपाच्या मागणीतही वाढ झालेली आहे. दुधाचे दर वाढल्यामुळे तुपाच्या दरातही वाढ झाली आहे. ६०० ते ६५० रुपये किलो असा बाजारात दर आहे

Advertisements

About विश्व भारत

Check Also

काबुली चने खाने के अद्-भुत और बेहतरीन फायदे

काबुली चने खाने के अद्-भुत और बेहतरीन फायदे टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट भीगे हुए …

आरोग्य अधिकाऱ्यांने मागितली लाच

धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जळगावच्या तत्कालीन आरोग्य अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोग्य विभागासाठी भाडेतत्त्वावरील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *