Breaking News

नागपुरात खरंच 25 बालकांचा मृत्यू झाला का? ही बातमी तुमचे डोळे उघडेल… वाचा

नांदेड व छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. त्यातच आता नागपुरातील मेडिकल-मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतही २४ तासांत २५ मृत्यू झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर आल्याने खळबळ माजली होती. मात्र वस्तुस्थिती अशी नसून मेयो आणि मेडिकलमध्ये अत्यवस्थ आणि व्हेंटीलिटरवरील रूग्णांचे दिवसाला पाच ते सहा मृत्यू होत असल्याची माहिती मेयोचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सागर पांडे आणि मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. शरद कुचेवार यांनी दिली.

विदर्भासह तीन राज्यांतील रुग्णांचा भार

मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयांवर विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यातीलही अत्यवस्थ रुग्णांचा भार आहे. या रुग्णांसाठी मेडिकलला १ हजार ४०१ अधिकृत तर ट्रामा व अतिरिक्त मिळून एकूण सुमारे १,८०० खाटा आहेत. मेयो रुग्णालयात ८२२ खाटा आहेत. दोन्ही रुग्णालयांत रोज सुमारे दीड हजार रुग्ण दाखल होऊन उपचार घेतात. खासगी रुग्णालये त्यांच्याकडील रूग्णांना शेवटच्या क्षणी त्यांना मेडिकल-मेयोत हलवतात.

अनेकदा शेवटच्या क्षमी रुग्ण दाखल होतात

विष प्राशन, हृदयविकार, आत्महत्येचा प्रयत्न, खूनाचा प्रयत्न असे रूग्ण शेवटच्या क्षणी मेयो आणि मेडिकलला येतात. त्यांच्या जगण्याची शक्यताही तशीही कमी असते. पण, शर्थीच्या प्रयत्नानंतरही हे रूग्ण दगावतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या निरीक्षणा नुसार १ हजार खाटांमध्ये ६ ते ८ मृत्यू होणे काॅमन आहे असे डाॅ. पांडे यांनी सांगितले.

हाफकिनकडून खरेदीच नाही

मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयांमध्ये काही औषधे रुग्णांना बाहेरून आणायला लावल्या जात असल्या तरी राज्यातील इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांच्या तुलनेत येथे औषधांचा तीन महिने पुरेल एवढा साठा आहे. सर्पदंशासाठी आवश्यक इंजेक्शनसह इतर काही औषधांचाही वर्षभर पुरेल एवढा साठा असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

बहुतांश मृत्यू इतर रुग्णालयातून आलेल्या रुग्णांचे

संपूर्ण विदर्भातील मेडिकल काॅलेजेस आणि सरकारी दवाखान्यातून येथे अगदी मृत्यूच्या जवळ पोहोचलेले रूग्ण रेफर केले जातात. बहुतांश मृत्यू अशा रेफर केलेल्या रूग्णांचे असतात, अशी माहिती मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार यांनी दिली.

About विश्व भारत

Check Also

वादग्रस्त कृषिमंत्री कोकाटे यांनी दिला राजीनामा : धनंजय मुंडे नवे कृषिमंत्री, मुख्यमंत्री नाराज

सतत शेतकऱ्यांच्या विरोधात विधाने केल्याने वादग्रस्त ठरलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे आता विधान परिषदेत ऑनलाइन …

नागपूर मेट्रो स्टेशनला आग : प्रवासी..!

कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली नागपुरातील महामेट्रो स्थानके सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *