Breaking News

मनपाच्या परिचारिकांना मिळणार सुट्यांचे वेतन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले आश्वासन

Advertisements
मनपाच्या परिचारिकांना मिळणार सुट्यांचे वेतन
महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले आश्वासन
परिचारिका दिनानिमित्त कौतुक सोहळा

चंद्रपूर, ता. १३ : चंद्रपूर शहरात कोरोनाचे संकट आल्यापासून रुग्णसेवा देण्यासाठी महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या परिचारिका रुग्णांना अहोरात्र सेवा देत आहेत. मागील वर्षभरापासून त्या कोणतीही सुटी न घेता सेवाकार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी आठवडाभरात सुट्यांचे वेतन दिले जाईल, असे आश्वासन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले.
आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस 12 मे हा संपूर्ण जगात परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर परिचारिका दिनानिमित्त चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या राणी हिराई सभागृहात बुधवारी (ता. १२) झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात कौतुक सोहळा घेण्यात आला. यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, उपायुक्त विशाल वाघ आदी उपस्थित होते.
या प्रसंगी महापौर राखी संजय कंचर्लावार म्हणाल्या, कोविड-१९ च्या पहिल्या लाटेपासून ते आतापर्यंत परिचारिका रुग्णसेवेत मेहनत घेत आहेत. आपले घर, कुटुंब यांची जबाबदारी सांभाळत, त्यांनी रुग्णसेवेलाच प्रथम प्राधान्य दिले आहे. आजही त्या डॉक्टर्स आणि तज्ज्ञांच्या खांद्याला-खांदा लावून काम करीत आहेत. या योगदानाचे कौतुक करावे तितके कमी आहे. अनेकांनी लॉकडाऊन एन्जॉय केलं. पण, परिचारिकांना सण-उत्सवातील सुट्यांचे दिवसदेखील कुटुंबियांसोबत घालविता आले नाहीत. त्यांच्या या कार्यासाठी आठवडाभरात सुट्यांचे वेतन दिले जाईल, असे आश्वासन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले.
‘तुमच्या त्याग, समर्पणाला मानाचा मुजरा. तुमचे हे योगदान कदापिही विसरणार नाही,’ अशा शब्दांत स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांनी रुग्णसेवेत अथक परिश्रम घेणाऱ्या परिचारिकाविषयी कौतुकोद्गार काढले. उपायुक्त विशाल वाघ यांनी कोविडच्या या संकटात घर, कुटुंबाचे बंधन बाजूला ठेवून, जीवाची पर्वा न करता रुग्णसेवेसाठी झटणाऱ्या परिचारिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी परिचारिकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कोव्हिडमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते डॉ. जयश्री वाडे, डॉ. नयना उत्तरवार, डॉ. अश्विनी भारत यांच्यासह परिचारिका आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. जनबंधू यांनी केले तर, संचालन शरद नागोसे यांनी केले.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

कमलिनी जड़ की सब्जी का मटन से अच्छा लजीज स्वाद : चखकर मनपसंद लडका रिश्ता पक्का करेगा!

कमलिनी जड़ की सब्जी का मटन से अच्छा लजीज स्वाद : चखकर मनपसंद लडका रिश्ता …

उन्हाळ्यात थंडगार बर्फाचे पाणी पित असाल तर..!

शरीरातील पाण्याची पातळी राखणे हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे तज्ज्ञ रोज १० ते १२ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *