चंद्रपूर मूल मार्गावर भीषण अपघात दोन इसम जागीच ठार दारू बंदी उठल्यानंतर अपघातांची मालिका सुरू चंद्रपूर मूल मार्गावर असलेल्या डोनी फाट्याजवळ भीषण अपघात झाला असून यामध्ये दोन इसम जागीच ठार झाले. ही घटना आज सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली. दुचाकीस्वार दारुच्या नशेत मुल वरून चंद्रपूर कडे जात होते तर चारचाकी वाहन बोलेरो पिकप ही चंद्रपूर वरून मुलकडे येत असल्याचे कळते. …
Read More »युवासेनेची आढावा बैठक
युवासेनेची आढावा बैठक वरोरा:— युवसेना सचिव वरुण सरदेसाई साहेब ,युवसेना कार्यकारणी सदस्य, रुपेश दादा कदम, जिल्हा विस्तारक, नित्यानंद त्रिपाठी साहेब यांच्या मार्गदर्शनात तसेच युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षल शिंदे यांच्या नेतृत्वात वरोरा येथील युवा सेना ची आढावा बैठक , नवीन युवा कार्यकर्ते यांचा प्रवेश त्याच बरोबर गाव तिथे युवा सेना ची शाखा या मोहिमेला सुरवात करण्यात यात सर्व युवा सैनिक सोबत …
Read More »ओबीसींच्या न्यायासाठी लढणाऱ्या त्या 12 आमदारांचे निलंबन त्वरीत मागे घ्यावे – हंसराज अहीर
ओबीसींच्या न्यायासाठी लढणाऱ्या त्या 12 आमदारांचे निलंबन त्वरीत मागे घ्यावे – हंसराज अहीर मुल उपविभागीय अधिकाऱ्यां र्फंत राज्यपालांना निवेदन सादर चंद्रपूरः- राज्यातील ओबीसी बांधवांचे राजकीय आरक्षण संपविण्याचे पाप महाविकास आघाडी सराकरच्या नाकर्तेपणामुळे घडले. हे सरकार ओबीसी समाजाच्या मुळावर उठले आहे. विधानसभेत या विरोधात जाब विचारणाऱ्या व चर्चेची मागणी करणाऱ्या भाजपा आमदारांवर खोटारडे आरोप करुन निलंबनाची कारवाई करुन मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न …
Read More »आमदार सुभाष धोटे यांना तैलचित्राची भेट.
आमदार सुभाष धोटे यांना तैलचित्राची भेट. कोरपना (ता.प्र.):- कोरपना तालुक्यातील जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथील महात्मा गांधी विद्यालयाची माजी विद्यार्थिनी स्नेहा राजेंद्र काकडे हिने नुकतेच आमदार सुभाष धोटे यांना तैलचित्र बनवून भेट दिले.आमदार सुभाष धोटे यांनी नुकतीच बिबी येथे भेट दिली असता त्यांना एका छोट्या कार्यक्रमात या तैलचित्राची भेट देण्यात आली. यावेळी कलावंत स्नेहा काकडे हिच्यासोबत तिचे …
Read More »लसीकरण जनजागृती मोहिमेचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते शुभारंभ , हिरवी झेंडी दाखवून चित्ररथ रवाना
लसीकरण जनजागृती मोहिमेचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते शुभारंभ Ø हिरवी झेंडी दाखवून चित्ररथ रवाना चंद्रपूर,दि. 7 जुलै : कोरोनाविरुध्दच्या लढाईत ‘कोव्हीड – 19 प्रतिबंधात्मक लस’ हे एक प्रभावी शस्त्र आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याला जिल्हा प्रशासनाने प्राधान्य दिले असून लसीकरणासंदर्भात नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात …
Read More »बुधवारी एकही मृत्यु नाही, 12 कोरोनामुक्त 18 पॉझिटिव्ह , ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 175
बुधवारी एकही मृत्यु नाही, 12 कोरोनामुक्त 18 पॉझिटिव्ह Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 175 चंद्रपूर,दि.7 जुलै : गत 24 तासात जिल्ह्यात 12 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 18 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात बुधवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बाधित आलेल्या 18 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 4, चंद्रपूर तालुका 1, …
Read More »लाईव्ह संजीवनी ऑर्थोपेडीक रुग्णालयात मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
लाईव्ह संजीवनी ऑर्थोपेडीक रुग्णालयात मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर, दि. 7 जुलै : राज्यामध्ये कोविड-19 या साथीच्या आजारावरील रुग्णावर उपचार करण्यासाठी पॅरामेडीकल क्षेत्रातील प्रशिक्षित मानव संसाधणाची आवश्यकता आहे. यासाठी कौशल्य प्रशिक्षणाशी निगडीत पॅरामेडीकल क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम उदघाटन समारंभ दि. 8 जुलै रोजी दुपारी 3 वाजता ऑनलाईन स्वरुपात तुकूम येथील …
Read More »परिवार जोडो संपर्क अभियान
*परिवार जोडो संपर्क अभियान* चंद्रपूर:-समाजात कौटुंबिक कलहाचे प्रकार फार वाढत आहे.पत्नी कायद्याचा गैरवापर करून,कायद्याचा धाक दाखवून पती व सासरच्या मंडळींना वेठीस धरीत आहे.त्यामुळे अनेक परिवार पीडित आहे.परिवार बचाव संघटना चंद्रपूर कडून आपला परिवार कसा वाचविता येईल या करिता परिवार जोडो अभियान राबविण्यात येत आहे. या कार्यात संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ नंदकिशोर मैंदळकर,सचिव सुदर्शन नैताम,ऍड सारिका संदूरकर,ऍड धीरज ठवसे, सचिन बरबतकर,नितीन चांदेकर,गंगाधर …
Read More »सेंट मायकेल शाळेच्या मनमानी कारभाराविरुद्ध पालकांचा एल्गार
सेंट मायकेल शाळेच्या मनमानी कारभाराविरुद्ध पालकांचा एल्गार चंद्रपूर- रामनगर, चंद्रपूर येथील सेंट मायकेल इंग्लिश स्कूल (सी.बी.एस.ई.) मध्ये शाळा प्रशासनाने दिनांक ०२ जून रोजी २.३० मिनिटांनी पालक-शिक्षक संघाच्या सदस्याची स्वतःच्या मर्जीने निवड करून त्यांची नावे जाहीर केली. परंतु, याविषयी कोणतीही पूर्वकल्पना पालकांना देण्यात आली नसल्याने, पालकांनी याविषयी शाळा प्रशासनाकडे विरोध नोंदवून अश्या प्रकारे पालक प्रतिनिधींची निवड करणे म्हणजे *महाराष्ट्र शैक्षणिक शुल्क …
Read More »जटपूरा गेट वाहतूक कोंडी व परकोटमुळे विकासावर विपरीत परीणाम संबंधी केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांची भेट घेतली
जटपूरा गेट वाहतूक कोंडी व परकोटमुळे विकासावर विपरीत परीणाम संबंधी केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांची भेट घेतली केंद्रीय मंत्र्यांनी चंद्रपूरला भेट देण्याचे केले मान्य चंद्रपूरः- चंद्रपूर महानगराला गोंडराज्यकालीन परकोटने वेढलेले आहे. त्यामुळे 300 फूटाच्या बांधकामास परवानगी मिळत नाही तसेच परकोटामुळे जटपूरा गेट परीसरात वाहतूक कोंडी निर्माण होते. या विषयाला घेवून पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केंद्रीय पर्यटन व …
Read More »