Breaking News

नागपूर

नागपूर : समृद्धी महामार्गावर दोन कारचा अपघात

रस्त्यांच्या देखभाल – दुरुस्तीसाठी नवे पायाभूत सुविधा विकास महामंडळ; आणखी एका महामंडळाची भर, रस्त्यांवरील खड्डे जाणार का ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे रविवारी लोकार्पण झाले. या महामार्गावरून वाहतूक सुरू झाली. मात्र, वाहनांच्या सुसाट वेगामुळे अपघाताची घटना घडली आहे. नागपूर -शिर्डी हे अंतर कमी झाले असले, तरी सुसाट वाहनांमुळे महामार्ग पोलिसांची चिंता वाढलीय. समृद्धी महामार्गावर पहिला अपघात सोमवारी झाला. वायफळ टोल नाक्यावर वेगाने येणाऱ्या मर्सिडीज कारने पुढच्या स्विफ्ट कारला जोरदार धडक दिली. …

Read More »

गडकरींना डावलण्याची मोदींची खेळी!

✍️मोहन कारेमोरे नागपुरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समृद्धी महामार्ग,मेट्रोसह विविध विकासकामांचे उदघाटन केले. समृद्धी महामार्ग बांधकामात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची महत्वाची भूमिका आहे. तितकीच नितीन गडकरी यांचीही. मात्र, नरेंद्र मोदी यांनी शिंदे आणि फडणवीस यांचे कौतुक केले. त्यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधान दिसले. मात्र, गडकरी यांच्याकडे कानाडोळा केल्याचे दिसते. त्यामुळे येत्या काळात शिंदे आणि फडणवीस यांचे वजन वाढणार आहे. …

Read More »

नागपुरात रुग्णवाहिकेत सिलिंडरचा स्फोट

नागपुरातील मानेवाडा बेसा परिसरातील रेवतीनगरमध्ये शुक्रवार दुपारी एका उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेतील २ ऑक्सिजन सिलिंडरचा एकाचवेळी स्फोट झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन बंबासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कशी घडली घटना? रेवतीनगर येथे आज दुपारी साडेतीनच्या सुमारास रुग्णवाहिकेतील २ ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर बॉम्बसारखा आवाज ऐकू आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. लोक घराबाहेर …

Read More »

चंद्रपूर : ताडोबात एक वाघिण,दोन वाघांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्याच्या बफरझोनमधील शिवनी व मोहरली वनपरिक्षेत्रात एक वाघ व एका बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. बुधवारी एका वाघीणचा मृत्यू झाला होता. वनविभागाचे अधिकारी , कर्मचारी गस्त घालत असताना मृतावस्थेत वाघ व बछडा आढळून आले. ताडोबाच्या बफर झोनमधील शिवनी वनपरिक्षेत्रांतर्गत वाघाचा मृतदेह आढळून आला. त्याचा मृत्यू सुमारे २०-२५ दिवसापूर्वी झाला असावा, असा अंदाज आहे. मृतावस्थेतील वाघ खूप …

Read More »

शिंदे सरकारला पडला विसर : बुद्धिस्ट पर्यटन सर्किटमध्ये वेरूळ, अजिंठा लेण्यांचा समावेशच नाही

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित स्थळे व बुद्धिस्ट स्थळांचा समावेश असलेल्या पर्यटन सर्किटचा शुभारंभ शनिवारी झाला. मात्र औरंगाबाद शहरातील बौद्ध लेणी व जागतिक वारसास्थळाचा दर्जा प्राप्त असलेले वेरूळ, अजिंठा येथील बौद्ध लेण्यांचा या सर्किटमध्ये समावेश करण्याचा पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांना विसर पडला आहे. तर नागपुरातील दीक्षाभूमीचा यात समावेश करण्यात आलाय. औरंगाबादेतील मिलिंद कॉलेज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा …

Read More »

नागपुरातील कळमना बाजारात आग

नागपुरातील प्रसिद्ध कळमना बाजारमधील मिरची बाजारातील एका यार्डला आज बुधवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास आग लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यात प्रामुख्याने 7 ते 10 अडतीया व व्यापाऱ्यांचा माल होता. या आगीत 5 कोटींच्या जवळपास नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Read More »

नागपूर विद्यापीठात खळबळ! लैंगिक छळ आणि १६ लाख

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात एक खळबळजनक व धक्कादायक प्रकार समोर आले आहे. नागपूर विद्यापीठाचे प्रभारी जनसंपर्क अधिकारी आणि जनसंवाद विभागाचे प्राध्यापक धर्मेश धवनकर यांनी विभागातील सात प्राध्यापकांना त्यांच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार आली असल्याचे बोलून ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे. लैंगिक शोषणाच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी 16 लाख रुपये घेतल्याची तक्रार सातही प्राध्यापकांनी कुलगुरू, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे केली. काय आहे …

Read More »

लक्ष द्या ! बेशिस्तपणे वाहने पार्क करताय… वाचा

विश्व भारत ऑनलाईन : सध्या नागपूर ट्रॉफिक पोलिसांविरोधात नागरिक सोशल मीडियावर रोष व्यक्त करीत आहेत. रोषच नव्हे तर तक्रारीही करीत आहेत. अलीकडेच शहरातील सक्करदरा भागातील तिरंगा चौकातील एका हॉटेलसमोर दुचाकी पार्क केली होती. वाहतूक पोलिसांनी कंत्राट दिलेल्या टोइंग व्हैनने दुचाकी उचलत असताना हॉटेलच्या सुरक्षा रक्षकाने त्याला विरोध केला होता. यावरुन झालेल्या वादानंतर पोलिसाने त्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. तिथे उपस्थित …

Read More »

हृदय श्वसनक्रिया बंद पडल्याने 4 वर्षीय वाघिणीचा मृत्यू

विश्व भारत ऑनलाईन : हृदयक्रिया बंद पडल्यानेच वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना हिंगणा परिक्षेत्रात घडल्याची माहिती समोर आली आहे.वाघांच्या वाढत्या मृत्यूमुळे वन विभाग चिंतेत असतानाच परत एका वाघिणीचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे नागपूर जिल्ह्यात वाघांची शिकार वा मृत्यूच्या घटना नव्या नाहीत. यापूर्वी २३ मार्च २०२१ रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागवाडी परिक्षेत्राच्या शेजारील एफडीसीएमच्या रिसाला परिक्षेत्रात एक वाघ कुजलेल्या स्थितीत आढळून …

Read More »

नागपूरजवळ वाघाचा मृत्यू

विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्ह्यातील हिंगण्याजवळ सातनवरी भागात वाघाचे शव मिळाले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. माहिती मिळताच हिंगणा वनविभागाची टीम घटनास्थळी पोचली. नैसर्गिक मृत्यू असल्याची माहिती आहे. ही घटना महसूलच्या जागेत असल्याचे कळते. याबाबत वनविभागाने तपास सुरु केलाय. मात्र, संशयास्पद काहीही आढळून आलेले नाही.

Read More »