Breaking News

शैक्षणिक

कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार? शिक्षण मंत्री केसरकरांचे मोठे वक्तव्य

विश्व भारत ऑनलाईन : पटसंख्या कमी असलेल्या 14 हजार मराठी शाळा बंद करण्याचा राज्य सरकारचा कोणताही विचार नाही, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. कमी पटसंख्येच्या शाळा या दुर्गम, अतिदुर्गम, ग्रामीण भाग, आदिवासी पाडे या भागात आहेत.जिल्हा परिषदांच्या शाळांमधून शेतकरी, कष्टकरी, गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेत असतात. गाव-खेड्यातील या शाळा बंद केल्या तर …

Read More »

नागपूर, औरंगाबाद, कोकणमध्ये शिक्षक ; तर नाशिक, अमरावतीत पदवीधर निवडणुकीची घोषणा

विश्व भारत ऑनलाईन : नाशिक, अमरावती विभागात पदवीधर तसेच औरंगाबाद, नागपूर आणि कोकण मतदारसंघांतील शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीचा बिगुल सोमवारी वाजला. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रपरिषदेत यासंदर्भात माहिती दिली. येत्या १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान अर्ज करता येईल, प्रारूप यादी २३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल. अर्ज उपलब्ध निवडणुकांसाठी पात्र शिक्षक तसेच पदवीधरांनी प्रत्येक वेळी नव्याने नोंदणी करणे आवश्यक असते. …

Read More »

5G चे युग : 10 सेकंदांत करा 2-GB चित्रपट डाउनलोड

विश्व भारत ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 1 ऑक्टोबरला देशात 5G सेवेचा श्रीगणेशा करतील. सरकारच्या राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनने एका ट्विटद्वारे ही माहिती दिली. ‘भारताचे डिजिटल परिवर्तन व कनेक्टिव्हिटीला एका नव्या उंचीवर घेऊन जात, पीएम मोदी 1 ऑक्टोबर रोजी इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये 5G सेवेचा शुभारंभ करतील.’ एअरटेल व जिओत चढाओढ दूरसंचार क्षेत्रताील एअरटेल व जिओ या 2 दिग्गज कंपन्या आपली …

Read More »

मराठवाड्यात गाव विक्रीला : वाचा… कारण आणि कुठे?

विश्व भारत ऑनलाईन : परभणीच्या पूर्णा तालुक्यातील माहेर गावात मूलभूत सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांनी संपूर्ण गावच विक्रीला काढले आहे. हे गाव ताडकळस ते पालम राज्य रस्त्यावर पश्चिमेस साडेतीन कि.मी अंतरावर आहे. मात्र या गावाला इतर गावाशी, मुख्यालयाशी तालुका आणि जिल्हा जोडणारा दळणवळणासाठीचा पक्का रस्ता नाही. १६ वर्षापूर्वी म्हणजेच २००५ मध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने या रस्त्याचे खोदकाम व मातीकाम करण्यात आले …

Read More »

पंतप्रधान पीक विमा योजनेत नियमबाह्य नियुक्ती? : शेतकऱ्यांची चौकशीची मागणी

विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्ह्यातील सावनेर आणि नरखेड तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीने योग्य शिक्षण नसलेल्या तरुणांची निवड केल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीने केलेल्या बोगस भरतीची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून काही शेतकऱ्यांनी केली आहे. सन 2022-23 साठी पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी तालुका प्रतिनिधी नेमताना मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यात पदवीधारक असणे आवश्यक आहे. मात्र, …

Read More »

लिपिकांची पदे भरणार ‘एमपीएससी’

विश्व भारत ऑनलाईन : राज्यातील सर्व विभागांतील वर्ग-तीन मधील लिपिकांची रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी)भरण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. विविध विभागाच्या भरती प्रक्रियेत संबंधित विभागाकडून लिपिकाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते. मात्र, आता आयोगामार्फत लिपिक भरती होणार. सध्या राज्यातील अ आणि ब गटातील अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही आयोगामार्फत केली जाते. आयोगाच्या कार्यक्षमतेचा विचार करून मुंबई प्रमाणेच …

Read More »

गड्डीगोदाम परिसरात गडरचे पाणी-नागरिक, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

विश्व भारत ऑनलाईन: नागपुरातील कामठी मार्गावरील गड्डीगोदाम भागात असलेल्या सेंट जॉन शाळेच्या समोर महानगरपालिकेने गडरलाईनचे नवे काम सुरु केले होते. मात्र, हे काम महानगरपालिकेने अर्धवट सोडले. त्यामुळे गडरचे दुर्गंधयुक्त पाणी रस्त्यावर पसरत आहे. परिणामी, शाळेतील हजारो विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे. यातून डेंगूचे डास तयार होत आहे.मागील महिनाभरापासून ही समस्या जैसे-थे आहे. याकडे महानगपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. गडरचे …

Read More »

बिबट्याच्या भीतीने शाळेला दुपारनंतर सुटी.. वाचा

विश्व भारत ऑनलाईन : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील वारुळवाडी शिवारात लागोपाठ दोन दिवस बिबट्याचे दर्शन झाले. सोमवारी (दि. १९) सकाळी वारुळवाडी येथे बिबट्याला जेरबंद करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी (दि. २०) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नारायणगाव येथील रा. प. सबनीस शाळेच्या आवारामध्ये मुलींच्या वसतिगृहासमोर बिबट्या ठाण मांडून बसल्याचे आढळल्याने शालेय विद्यार्थी, तसेच नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. वनविभाग व रेस्क्यू …

Read More »

वैष्णवी बालपांडेचे ‘एमबीबीएस’परीक्षेसाठी यश

नागपूर : वैद्यकीय अर्थात एमबीबीएस (MBBS) प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट (NEET) परीक्षेत नरखेड तालुक्यातील मोहगाव(भदाडे) येथील रहिवासी असलेल्या वैष्णवी विठ्ठल बालपांडे हिने यश मिळविले. तिला 720 पैकी 681 गुण मिळाले. देश पातळीवर 657 व्या क्रमांकावर आपले स्थान निर्धारित केले. वैष्णवीने आपल्या यशाचे श्रेय आई,वडील, शिक्षकांना दिले आहे.

Read More »

आमदार बंबविरोधात उद्या शिक्षकांचा मोर्चा

औरंगाबाद : खुलताबादचे भाजप आमदार प्रशांत बंब आणि शिक्षकांमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्यालयी उपस्थित राहत नाही, या शिक्षकांवरील आरोपानंतर बंब यांच्याविरोधात शिक्षकांसह पदवीधर, शिक्षक आमदार आक्रमक झालेत.औरंगाबादमधील आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालायपर्यंत रविवारी (दि. ११) सकाळी 11 वाजता भव्य मोर्चा काढणार आहेत. काय म्हणाले होते बंब मुख्यालयी न राहता बहुतांश शिक्षक खोटी कागदपत्रे सादर करून घरभाडे घेतात. शासनाची …

Read More »