Breaking News

आरोग्य

जरा थांबा!चहासोबत टोस्ट खाताय,’हार्ट अटॅक’चा धोका

चहासोबत टोस्ट खात असाल तर सावधान… कारण अपचनाचा त्रास होऊ शकतो.टोस्टमध्ये मैदा, तेल आणि साखर यासारख्या गोष्टी हृदयासाठी हानिकारक असतात. या गोष्टी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत टोस्ट हार्ट अटॅकचे कारण बनू शकतो. हृदयरोग्यांनी अशा गोष्टी खाणे टाळावे. चहासोबत टोस्ट खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढतो. त्यात भरपूर साखर असते. टोस्ट आणि चहा एकत्र खाल्ल्याने साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी …

Read More »

तरुणाच्या फुप्फुसात अडकली सुई आणि…

जालना जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना आहे. शेतकरी कुटुंबातील ३३ वर्षीय तरुणाच्या फुप्फुसात चार वर्षांपासून अडकलेली सुई शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात डॉक्टरांना अखेर यश आले. शहरातील एका खासगी रुग्णालयात एक तास चाललेल्या या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमुळे तरुणाला जीवदान मिळाले. जालना जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील हा तरुण असून चार वर्षांपूर्वी त्याने शिलाई मशिनची सुई तोंडात धरली असताना अचानक खोकला आला. त्यामुळे तोंडातील सुई थेट गिळली …

Read More »

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन

राज्यातील समुदाय आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुमारे 10 हजार आरोग्य अधिकाऱ्यांनी एकदिवसीय कामबंद आंदोलन केले. विविध जिल्ह्यातही आरोग्य अधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत कामबंदचा इशारा संघटनेने दिलाय. सोबतच बंधपात्रित अधिपरिचारिका यांनीही मागण्याकडे लक्ष वेधले होते. आंदोलन का? गेल्या सहा वर्षांपासून सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राज्यभरातील समुदाय आरोग्य अधिकारी उत्तमरित्या सेवा प्रदान करीत आहेत. …

Read More »

आमदार बच्चू कडूसंदर्भात मोठी बातमी : नागपुराला उपचारासाठी हलविणार

माजी राज्यमंत्री आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा मोठा अपघात अमरावती येथे झाला आहे. त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात येत आहे. अमरावती येथे रस्ता क्रॉस करताना हा अपघात झाला आहे. त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. बच्चू कडू यांना एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. यात ते जखमी झाले असून त्यांना तात्काळ अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात …

Read More »

व्यायाम करताना डॉक्टरचा ‘हार्ट अटॅक’ने मृत्यू

व्यायाम करताना एका 41 वर्षीय डॉक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय. ही घटना उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील आहे. संजीव पाल असे डॉक्टरचे नाव आहे. व्यायाम करीत असताना ते अचानक कोसळले. रुग्णालयात त्यांना घेऊन गेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Read More »

तुळस, मसाला चहाने पळवा थंडी…!

थंडीच्या दिवसात गरमागरम चहा मिळाल्यास उबदारपणा वाढतो. घरच्या घरी आयुर्वेदिक चहा कसा बनवायचा याबाबत येथे सांगणार आहो. इतकेच नव्हे तर त्याचे अनेक फायदेही सांगितले आहेत. यात आयुर्वेदिक काढ्याचा समावेश होतो. खरतरं चहा मुळे आम्लपित्त, भूक मंदावणे अशा एक ना अनेक समस्या उद्भवतात. मात्र चहाचे काही प्रकार असे आहेत की जे तुमची रोग प्रतिकारशक्तीही वाढवू शकतात. तुळस अश्वगंधा, मसाला चहा आणि …

Read More »

धक्कादायक : खराब हवामानामुळे महाराष्ट्रात १९४ जणांचा मृत्यू

देशात खराब हवामानामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.बिहारपाठोपाठ आसाम, उत्तर प्रदेशसह आणि महाराष्ट्र असा क्रमांक आहे. २०२२ मध्ये हवामानाच्या आक्राळ-विक्राळ रुपात सापडल्याने देशातील २ हजार २२७ लोकांचा मृत्यू झाला. केंद्राने यासंदर्भात राज्यनिहाय आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनूसार, बिहारमध्ये खराब हवामानामुळे सर्वाधिक मृत्यूची नोंद घेण्यात आली. बिहारपाठोपाठ महाराष्ट्र आणि ओडिशात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आली.गतवर्षी वादळ-वारे तसेच …

Read More »

उंचीनुसार मुलींचे वजन किती पाहिजे…!

सध्याच्या घडीला फीट आणि निरोगी राहणं हे एक मोठं आव्हान आहे. आजकालच्या जीवनशैलीमुळे सर्वांचा एकच प्रश्न असतो, तो म्हणजे वजनात होणारी वाढ,अयोग्य आहार आणि बदलती जीवनशैली यामुळे लठ्ठपणाची समस्या काही आपली पाठ सोडत नाही. अनेकदा पुरुषांच्या तुलनेत महिलांना वजनाची समस्या अधिक भेडसावते. वजन कमी करण्यासाठी महिला अनेक टिप्सचाही वापर करतात. महिलांची कंबर, हिप्स आणि पोटाची चरबी वाढली की त्यांना ते …

Read More »

शरीराची थंडी कमी करण्यासाठी काय कराल? वाचा…

थंडी वाढत आहे. थंडीला नियंत्रणात ठेवण्यासाठी काही खास गोष्टी तुम्हाला करता येतील. काही पेये शरीर उबदार ठेवण्यासाठी मदत करतील. ✳️हिवाळ्यात बदामाचे दूध पिणेही फायदेशीर असते. बदामाचा प्रभाव उष्ण असतो. हे तुमचे शरीर गरम करेल. बदाम बारीक करून त्यात दूध घालून प्या. त्यामुळे जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरताही पूर्ण होईल. ✳️लिंबू घालून गरम पाणी प्यायल्यास शरीर उबदार राहते. गरम लिंबू पाणी प्यायल्याने …

Read More »

नेत्याच्या मुलाच्या लग्नात 900 जणांना विषबाधा

औरंगाबाद शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या मुलाच्या लग्नात अंदाजे 900 जणांना विषबाधा झाल्याची माहिती आहे. लग्न समारंभाच्या जेवणातून विषबाधा झाल्याने 900 जणांची प्रकृती बिघडली आहे. या सर्वांनी औरंगाबादमधील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घ्यायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांचे पुत्र सय्यद जुबेरचा लग्नसोहळा बुधवारी 4 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी …

Read More »