Breaking News

ऑरेंजसिटी

कोसंबी येथे ६ जून ला रक्तदान शिबीराचे आयोजन, शिवराज्य दिनानिमित्त ग्रामपंचायत व युवकांचा पुढाकार

कोसंबी येथे ६ जून ला रक्तदान शिबीराचे आयोजन शिवराज्य दिनानिमित्त ग्रामपंचायत व युवकांचा पुढाकार चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाने नव्याने यंदापासून रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस संपुर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थात गुढी उभारुन अभिवादन करुन साजरा करण्याचे आदेश दिले आहे. महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीताने हा सोहळा संपन्न व्हावा असा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुल तालुक्यातील ग्रामपंचायत …

Read More »

राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन

राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन मुंबई दि ३: कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात  काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली …

Read More »

प्रशासनाने व्यापार्‍यांचा सन्मान करावा : आ. मुनगंटीवार – समस्येवर तोडगा काढण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकार्‍यांसोबत बैठक

प्रशासनाने व्यापार्‍यांचा सन्मान करावा : आ. मुनगंटीवार – समस्येवर तोडगा काढण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकार्‍यांसोबत बैठक चंद्रपूर- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे महानगरातील व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने व्यापार्‍यांकडून दंड वसूल करणे बंद करावे आणि त्यांना सन्मानजनक वागूणक द्यावी, असे सांगत व्यापार्‍यांच्या समस्या सोडवण्यासाठी शनिवारी व्यापारी व जिल्हाधिकारी यांची बैठक लावण्याच्या सूचना माजी राज्यमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मनपा पदाधिकार्‍यांना …

Read More »

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे आक्रोश आंदोलन

चंद्रपूर, या आधी जेव्हा भाजपा-शिवसेना सरकार होते. तेव्हा ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले होते. त्यामुळे ओबीसी समाजाबद्दल भाजपाला नेहमीच आस्था राहिली आहे. नुकतेच न्यायालयाने ओबीसी समाजाकरिता असलेले राजकीय आरक्षण रद्द केले. ही अतिशय दुःखद बाब आहे. महाविकास आघाडी सरकारने न्यायालयामध्ये ओबीसी समाजाची बाजू योग्य पध्दतीने न मांडल्यामुळे हे आरक्षण रद्द झाले. या आधी मराठा आरक्षण व आता ओबीसी आरक्षण रद्द …

Read More »

जिल्हाधिका-यांनी घेतला रामाळा तलाव खोलीकरण व सौंदर्यीकरणाचा आढावा

जिल्हाधिका-यांनी घेतला रामाळा तलाव खोलीकरण व सौंदर्यीकरणाचा आढावा  चंद्रपूर,दि.3 जून : शहरातील रामाळा तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरणाचा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आढावा घेतला. यावेळी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी घाटगे, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. जांभुळे, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. काळे, ईको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे, स्टेशन मास्टर …

Read More »

मोदी सरकारच्या सप्तवर्षपूर्तीनिमित्त कोरोना योद्ध्यांचा सत्कार

चंद्रपूर : भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील मोदी सरकारला यशस्वीरीत्या ७ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. याच उपक्रमांत गेल्या वर्षभरात कोरोना मृत्यू पावलेल्यांचा अंतिमसंस्कार महानगरपालिकेमार्फत करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार भेटवस्तू देऊन गुरुवार दि. ३ जून रोजी करण्यात आला. या कार्मक्रमाला महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. …

Read More »

विविध प्रतिष्ठानाविरुद्ध कारवाई करून २४ हजार ५०० रुपयांचा दंड

विविध प्रतिष्ठानाविरुद्ध कारवाई करून २४ हजार ५०० रुपयांचा दंड चंद्रपूर, ता. ३ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठ बंद ठेवण्याचे निर्देश होते. तरी सुद्धा शहरातील काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु ठेवून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली. गुरुवारी (ता. ३) विविध प्रतिष्ठानाविरुद्ध कारवाई करून २४ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात …

Read More »

शेतकऱ्यांनी 80 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये , कृषी विभागाचे आवाहन

शेतकऱ्यांनी 80 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये Ø कृषी विभागाचे आवाहन चंद्रपूर दि. 3 जून : 2  ते 4 जून 2021 या कालावधीमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर दि. 5 जून 2021 रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खाते, कृषी हवामान …

Read More »

पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन Ø बेरोजगार युवक-युवतींनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा चंद्रपूर दि. 3 जून: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर कार्यालयाच्या वतीने बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दि.4 ते 9 जून 2021 रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा …

Read More »

गत 24 तासात 342 कोरोनामुक्त,177 पॉझिटिव्ह तर 5मृत्यू

गत 24 तासात 342 कोरोनामुक्त,177 पॉझिटिव्ह तर 5मृत्यू चंद्रपूर, दि.3 जून : गत 24 तासात जिल्ह्यात 342 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 177 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 5बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. आज (दि.3) एकूण 2723 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 177 पॉझिटिव्ह तर 2546 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. बाधित आलेल्या 177 रुग्णांमध्ये …

Read More »