Breaking News

ऑरेंजसिटी

शहरातील रुग्णसंख्येत मोठी घट, वर्षभरात २४ हजार १४४ रुग्णांनी केली कोरोनावर मात; 553 रुग्णावर उपचार सुरु

शहरातील रुग्णसंख्येत मोठी घट वर्षभरात २४ हजार १४४ रुग्णांनी केली कोरोनावर मात; 553 रुग्णावर उपचार सुरु चंद्रपूर, ता. २ : महानगर पालिका हद्दीत मागील वर्षभरात दोन लाख ३३ हजार २१० जणांनी कोव्हीड चाचणी केली. यातील २ लाख ८१०४ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. तर उर्वरित २५ हजार १०६ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात आले. आतापर्यंत २४ हजार १४४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात …

Read More »

पदोन्नतीमधील आरक्षण आणि महाराष्ट्र शासनाकडून अपेक्षा,

पदोन्नतीमधील आरक्षण आणि महाराष्ट्र शासनाकडून अपेक्षा,  राज्यातील जवळपास साडेपाच लाख मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांना सेवाकाळात मिळणारा पदोन्नतीचा लाभ महाराष्ट्र शासनाच्या दि.७ मे २०२१ च्या शासन निर्णयामूळे बंद झाला आहे. ७ मे २०२१ च्या शासन निर्णयामूळे एकिकडे मागासवर्गीयांची आरक्षित बिंदुनामावली नुसार येणारी ३३ टक्के पदे नष्ट करुन ती खुल्या प्रवर्गात वर्ग केल्याने आरक्षित प्रवर्गातून पदोन्नती मिळण्याचा मार्ग शासनाने बंद केला, …

Read More »

जिल्हा बार अधिवक्ता संघ तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन,शिबिरात ३० रक्तदात्यांनी केले रक्तदान

चंद्रपूर- दिनांक ०२ जून २०२१ ला सकाळी ०९ .३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत आय एम ए सभागृह, गंजवार्ड, चंद्रपुर येथे मानवता हि सेवा अधिवक्ता संघ आणि चंद्रपूर जिल्हा बार अधिवक्ता संघ तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कोरोना महामारीच्या काळात चंद्रपुर जिल्ह्याच्या सगळ्या शासकीय रुग्णालयात आणि खाजगी रुग्न्यालयात चंद्रपुर जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यातून रुग्णांना भर्ती केले जाते. त्या रुग्णांना …

Read More »

गडचांदूर भाजपतर्फे पत्रकार बांधवांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार.

गडचांदूर भाजपतर्फे पत्रकार बांधवांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार. कोरपना(ता.प्र.):-         कोरोनाने मागील दीड वर्षापासून थैमान घातले असून अशा महा संकट काळात डॉक्टर, नर्स,आशा वर्कर,पोलीस,रूग्णवाहीका चालक इत्यादींसह पत्रकारांची भुमिकाही कौतुकास्पद असून जीवाची पर्वा न करता सध्याच्या कोरोना महामारीत घडणार्‍या प्रत्येक घडामोडी पत्रकार बांधव आपल्या लेखणीतून जनतेपुढे मांडत आहे.यांचाही समावेश कोरोना योद्धांच्या श्रेणीत असून यांच्या कार्याची कुठेतरी प्रशंसा व्हावी,असे …

Read More »

गडचांदूर भाजपतर्फे सलग चार दिवस कोविड संबंधी जनहिताचे कार्यक्रम.

गडचांदूर भाजपतर्फे सलग चार दिवस कोविड संबंधी जनहिताचे कार्यक्रम. (मोदी सरकारच्या सप्त वर्षपूर्तीचे औचित्य.) कोरपना(ता.प्र.)          पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सात वर्षाचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण झाला.या सप्त वर्षपूर्तीच्या निमित्याने भाजपच्या वतीने कोविड संबंधी जनहिताचे  कार्यक्रम आयोजित केले जात आहे.कोरोना योध्दांचा सत्कार करून त्यांचे मनोबल वाढविण्याच्या हेतुने वित्त व नियोजन मंत्री तथा लोकलेखा समिती अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार,माजी केंद्रीयमंत्री हंराज …

Read More »

नाले सफाईची कामे आठवडाभरात पूर्ण करा,उपायुक्त विशाल वाघ यांच्या स्वच्छता विभागाला सूचना

नाले सफाईची कामे आठवडाभरात पूर्ण करा   उपायुक्त विशाल वाघ यांच्या स्वच्छता विभागाला सूचना चंद्रपूर, ता. १ : पावसाळा सुरू झाल्यानंतर मुसळधार पावसामुळे शहरातील नागरिक वसाहती व झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरून नागरिक जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असते. त्यावर उपाययोजना करण्यासाठी नाले सफाईची कामे आठवडाभरात पूर्ण करा, अशा सूचना उपायुक्त विशाल वाघ यांनी दिल्या. चंद्रपूर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील आयुक्त कक्षात मंगळवारी (ता. …

Read More »

गोवंशाची तस्करी करणारे तीन ट्रक ताब्यात, 82 जनावरांची सुटका , 7 जण अटकेत

  गोवंशाची तस्करी करणारे तीन ट्रक ताब्यात– 82 जनावरांची सुटका,– 7 जण अटकेत मूल, नागभीड-मूल-गोंडपिपरीमार्गे तेलंगणा राज्यात जनावरांची तस्करी करणारे तीन ट्रक पाठलाग करून पकडण्यात पोलिस विभागाला यश आले आहे. तब्बल 82 जनावरांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी 50 लाखांच्या तीन वाहनांसह 8 लाख 20 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला गेला. तर 7 जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी …

Read More »

जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या 374 ने जास्त

जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या 374 ने जास्त Ø गत 24 तासात  553 कोरोनामुक्त, 179 पॉझिटिव्ह तर 06 मृत्यू चंद्रपूर, दि.31 मे : जिल्ह्यात गत 24 तासात 553 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 179 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या 374 ने जास्त आहे. तसेच जिल्हयात  6 बाधितांचा मृत्यू झाला आहे. …

Read More »

म्युकरमायकोसीस हा संसर्गजन्य आजार नाही

म्युकरमायकोसीस हा संसर्गजन्य आजार नाही Ø कोव्हीड पश्चात 16796 जणांना कॉल तर 21193 जणांना एसएमएस Ø  लक्षणे आढळताच उपचार घेण्याचे आवाहन चंद्रपूर दि. 31 मे : कोविडचा प्रादुर्भाव हा एकमेकांच्या संपर्कात आल्याने होत असला तरी कोविड पश्चात होणारा म्युकरमायकोसीस हा आजार संसर्गजन्य नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता लक्षणे आढळताच त्वरीत वैद्यकीय उपचार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. …

Read More »

लसीकरणाचे गावनिहाय नियोजन करा – जिल्हाधिकारी गुल्हाने

लसीकरणाचे गावनिहाय नियोजन करा – जिल्हाधिकारी गुल्हाने Ø काँटॅक्ट ट्रेसिंग व टेस्टिंग वाढविण्याचे निर्देश चंद्रपूर, दि.31 मे : कोविड प्रतिबंधात्मक लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. शासकीय यंत्रणेसोबतच सामाजिक संघटना, प्रतिष्ठित नागरिक यांच्यामार्फत लसीकरणाचा संदेश गेला पाहिजे. तसेच जिल्ह्यात जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाने गावनिहाय नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले. जिल्हाधिकारी …

Read More »