Breaking News

ऑरेंजसिटी

निर्जन्तुकीरणासाठी आवश्यकतेनुसार फॉगिंग मशीन खरेदी करा-रवी आसवानी

– सभापती रवी आसवानी यांचे निर्देश   – महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा चंद्रपूर, ता. ३१ : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी आणि निर्जन्तुकीरण करण्यासाठी आवश्यकतेनुसार फॉगिंग मशीन खरेदी करण्यात याव्यात, असे निर्देश सभापती रवी आसवानी यांनी दिलेत. कुंदननगर भागात नियमांचे उल्लघंन करून रस्स्त्यावर मटण आणि चिकण दुकाने थाटणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. चंद्रपूर शहर महानगरपालिकेची ऑनलाईन स्थायी समिती सभा सोमवार दिनांक …

Read More »

लेखा परीक्षण अहवाल प्रकरणी न्यायालयीन चौकशी करून दोषी असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करा : महापौर

लेखा परीक्षण अहवाल प्रकरणी न्यायालयीन चौकशी करून दोषी असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करा : महापौर केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी पप्पू देशमुखकडून महापौरांची बदनामी चंद्रपूर : उपसंचालक महानगरपालिका लेखा परीक्षण विभाग यांचा लेखा परीक्षण अहवाल आज सभागृहामध्ये ठेवण्यात आला होता. विरोधी पक्षनेते डॉ. सुरेश महाकुलकर यांनी निवेदन दिल्यानंतर न्यायालयीन चौकशी करून दोषी असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले. …

Read More »

पाणी टंचाई विरोधात यंग चांदा ब्रिगेडचे आंदोलन – मुबलक पाणी देण्याची मागणी

पाणी टंचाई विरोधात यंग चांदा ब्रिगेडचे आंदोलन – मुबलक पाणी देण्याची मागणी चंद्रपूर, दरवर्षी प्रमाणे यंदाही शहरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या हक्काचे पाणी मुबलक प्रमाणात देण्यात यावे, या मागणीकरिता सोमवार, 31 मे रोजी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करीत मनपासमोर निदर्शने करण्यात आली. चंद्रपूर महानगर पालिकेच्या ढिसाळ नियोजनामूळे दरवर्षीच्या उन्हाळ्यात चंद्रपूरकरांना भीषण पाणी टंचाईचा सामना …

Read More »

आमदार धोटेंच्या उपस्थितीत अल्ट्राटेकला निवेदन. 

आमदार धोटेंच्या उपस्थितीत अल्ट्राटेकला निवेदन.  (नांदा-बिबीच्या मध्य भागातील नाला खोलीकरण व साफसफाईची मागणी.) कोरपना(ता.प्र.)   कोरपना तालुक्यातील नांदा गाव येथील शांती कॉलनी व बिबी येथील रामनगर कॉलनी यादोन्ही गावांच्या वस्तीमधील नाल्यात घाण साचून असल्याने पाणीचा प्रवाह अक्षरशः बंद झाला आहे.पोकलेनद्वारे या नाल्यांचे खोलीकरण व साफसफाई करून देण्यात यावी या मागणीचे निवेदन राजूरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत अल्ट्राटेक कंपनी …

Read More »

माजी आमदार अँड.चटप यांचा खंदा समर्थक “प्रभाकरराव दिवे” अनंतात विलिन.

माजी आमदार अँड.चटप यांचा खंदा समर्थक “प्रभाकरराव दिवे” अनंतात विलिन. कोरपना(ता.प्र.)           शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते,बळीराज्य विदर्भाचे प्रदेश उपाध्यक्ष,विदर्भ राज्य आंदोलन समिती कोर कमिटीचे सदस्य तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी मानद सचिव प्रभाकरराव दिवे यांचा ३१ मे रोजी नागपूर येथे उपचारा दरम्यान दुःखद निधन झाला.काही दिवसांपूर्वी अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे ते नागपूर येथे उपचार घेत …

Read More »

संकटग्रस्तांचे प्रेरणास्थान : अहिल्यादेवी होळकर

#संकटग्रस्तांचेप्रेरणास्थान : अहिल्यादेवीहोळकर* अहिल्या हे नाव ऐकलं की आपल्या समोर येतात त्या पुराणातील अहिल्या. जी एका ऋषीची बायको होती. ऋषीने स्वतःच्या पत्नी अहिल्येला दगड बनण्याचा शाप दिला आणि ती दगड बनली. नंतर त्या दगडाला रामाच्या पायाचा स्पर्श झाला आणि अहिल्या दगडातून स्त्रीच्या रूपात आल्या. परंतु मी या ठिकाणी ज्या अहिल्या विषयी सांगणार आहे, त्या अहिल्येच्या स्पर्शाने रामासहित सर्व देवांचा उद्धार …

Read More »

नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी अजूनही प्रोत्साहन च्या प्रतिक्षेत,शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या ठाकरे सरकारविरोधात शेतकऱ्यांचा संताप.

शेतकऱ्यांना शासनाकडून नेहमीच नागवल जातं पण शेतकरी शासनाच्या धोरणाचा क्वचितच विरोध करतात,अशातच शासनाने जी कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली होती त्यात नियमित कर्जफेड करणाऱ्या बळीराजाला रूपये ५०००० हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याची घोषणा ठाकरे सरकारने केली पण आजतागायत प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना न मिळाल्याने शासनाप्रती शेतकऱ्यांत तिव्र संताप व्यक्त होत आहेत. महाविकास आघाडी सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण कर्जमाफी घोषणा केली होती, आणि …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे यांची घोषणा…राज्यात 15 जूनपर्यंत निर्बंध कायम

– प्रादुर्भाव कमी असलेल्या जिल्ह्यांना दिलासा मिळणार – कोरोनामुक्त गाव अभियान आजपासून मुंबई, राज्यभरात लागू असलेले कठोर निर्बंध आणखी 15 दिवस कायम ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रविवारी केली. राज्यातील प्रादुर्भाव जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध आणखी कडक करण्यात येणार असून, प्रादुर्भाव कमी झालेल्या जिल्ह्यांत परिस्थितीनुसार निर्बंध शिथिल केली जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्यात निर्बंध लागू …

Read More »

पत्रकारांनी केली महसुल विभागाला मदत- चोरट्या वाळूचा पकडला ट्रक

पत्रकारांनी केली महसुल विभागाला मदत     – चोरट्या वाळूचा पकडला ट्रक आर्वी- पत्रकार मोबाईलवर चित्रफित काढून वाळू माफीयापर्यंत पोहचेल अशी व्यवस्था असा आरोप पत्रकारांवर लावण्यात येतो. येथील पत्रकारांनी तो आरोप जीव्हारी लागल्यागत चोरट्या वाळूचा ट्रक पकडून महसुल विभागाला मदत केली. आर्वीत वाळू तस्करीवर चर्चा सुरू असताना वाद निर्माण होऊन पत्रकारांवर आरोप करण्यात आले. येथील पत्रकारांनी हा आरोप खोडुन काढण्याकरिता …

Read More »

वर्ध्यात वादळ, समुद्रपूर-पुलगावात पाऊस

वर्धा, जिल्ह्यात आज रविवारी दिवसभर कडाक्याचे उन्ह तापले. सायंकाळच्या सुमारास सर्वत्र ढग दाटून आले असले तरी काही भागात फक्त वादळ, काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी तर समुद्रपूर व पुलगाव येथे जोरदार पाऊस झाला. वर्ध्यात 4 वाजताच्या सुमारास सरी आल्या तर रात्रीपर्यंत फक्त वादळ होते. समुद्रपूर : परिसरात सायंकाळी 4.30 च्या दरम्यान जोराच्या वार्‍यासह रोहिणी नक्षत्राच्या पहिल्या पाऊस झाला. त्यामुळे वातावरणातील …

Read More »