Breaking News

ऑरेंजसिटी

जिल्हधिकारी अजय गुल्हाणे यांची विविध कोविड केअर सेंटरला भेट,ऑक्सीजन बेड वाढविण्याचे दिले निर्देश

जिल्हधिकारी अजय गुल्हाणे यांची विविध कोविड केअर सेंटरला भेट बल्लारपूर, भिवकुंड, जिल्हा स्री रूग्णालय, आसरा व वन अकादमी मध्ये केली पाहणी Ø  ऑक्सीजन बेड वाढविण्याचे दिले निर्देश  चंद्रपूर दि.5 मे: जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी यांनी आज चंद्रपूर शहरातील जिल्हा स्री रूग्णालय, महानगरपालीकेच्या आसरा व वन अकादमी येथे तसेच काल बल्लारपूर, विसारपूर व कळमना येथील येथील कोविड केअर सेंटरला व …

Read More »

गत 24 तासात 1462 कोरोनामुक्त, 1393 पॉझिटिव्ह तर 23 मृत्यू

गत 24 तासात 1462 कोरोनामुक्त, 1393 पॉझिटिव्ह तर 23 मृत्यू Ø  आतापर्यंत 48,679 जणांची कोरोनावर मात Ø   ॲक्टीव पॉझिटिव्ह 16,731  चंद्रपूर, दि. 5 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1462 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1393 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 23 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 66 हजार 431 …

Read More »

कोरोना लढवय्यांचा सत्कारही महत्त्वाचा- नगराध्यक्ष तराळे

कोरोना लढवय्यांचा सत्कारही महत्त्वाचा- नगराध्यक्ष तराळे वर्धा- गेल्या एक वर्षांपासून प्रत्येक जण आपआपल्यापरिने कोरोनासोबत झगडत आहेत. त्याचे परिणामही दिसत आहेत. दरम्यान, कोरोना काळात अनेकांनी मदतीचा हात दिला. त्यांच्याही पुढे जाऊन काहींनी सेवा दिली. त्या सेवेकरांचा सत्कारही तेवढाच महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी केले. कामगार दिनाचे औचित्य साधून वर्धा नपच्या वतीने कोरोना काळात सातत्याने कार्यरत स्थानिक डॉक्टर, शिक्षक, नप …

Read More »

सिएसटीपीएसच्या ‘कन्व्हेअर बेल्ट’ला आग – संच क्रमांक 8 व 9 मधील घटना

सिएसटीपीएसच्या ‘कन्व्हेअर बेल्ट’ला आग – संच क्रमांक 8 व 9 मधील घटना चंद्रपूर- चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या संच क्रमांक 8 आणि 9 दरम्यान कोळसा वाहून नेणार्‍या ‘कन्व्हेअर बेल्ट’ला रविवार, 2 मे रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास आग लागली. मात्र, तेथील कर्मचार्‍यांनी प्रसंगावधानाने उर्वरित ‘बेल्ट’ कापले गेले आणि त्यामुळे आग पसरली नाही. अन्यथा, आगीने अवघा परिसर आपल्या कवेत घेतला असता. ही …

Read More »

मूलमध्ये भल्या पहाटे नागरिकांना अस्वलचे दर्शन

– बेशुध्द करून केले जेरबंद – केळझरच्या जंगलात निसर्गमुक्त मूल- शहरातील शिक्षक वसाहत परिसरात सोमवार, 3 मे रोजी भल्या पहाटे नागरिकांना अस्वलचे दर्शन घडले. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केली. दरम्यान, अस्वलने या परिसरात थरार माजविला. वॉर्डातील गल्लीबोळात या अस्वलने फेरफटका मारला. त्यामुळे नागरिकांत दहशत पसरली. अखेर वनविभागाच्या चमुने बेशुद्धीचे इंजेक्शन देवून तिला सुरक्षितपणे पकडले. त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्‍वास घेतला. …

Read More »

पंतप्रधान घेणार मोठा निर्णय…देशव्यापी लॉकडाऊनचे संकेत   – ‘टास्क फोर्स’ची बैठक महत्त्वाची

पंतप्रधान घेणार मोठा निर्णय…देशव्यापी लॉकडाऊनचे संकेत   – ‘टास्क फोर्स’ची बैठक महत्त्वाची  नवी दिल्ली, कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे भारतात पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन होण्याचे संकेत मिळत आहेत. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन करणार नाही, असे सांगितले होते. मात्र, अनेक तज्ज्ञ, टास्क फोर्स आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर पंतप्रधान मोदीआपल्या निर्णयाचा फेरविचार करु शकतात, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे. सर्वोच्च न्यायालयानेही गरज …

Read More »

ममता बॅनर्जी ५ मे रोजी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, सर्व आमदारांचा शपथविधी ६ मे रोजी होणार

पश्चिम बंगाल- अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत अखेर तृणमूल काँग्रेसने बाजी मारली. संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरून प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भाजपाचा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँगेसने अक्षरशा धुव्वा उडवला. अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत तृणमूलने भाजपाला दोन आकड्यांतच रोखून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. त्यानंतर आता ५ मे रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर, सर्व आमदारांची शपथविधी …

Read More »

इको-प्रोचे नितीन बुरडकर यांचे निधन

इको-प्रोचे नितीन बुरडकर यांचे निधन चंद्रपूर : इको प्रो पर्यावरणप्रेमी संस्थेचे वन्यजीव विभाग प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते नितीन बुरडकर यांचे आजाराने निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. बालाजी वार्ङ निवासी नितीन बुरडकर यांनी तरुणवयात सामाजिक कार्याला सुरवात केली. इको-प्रोच्या स्थापनेपासून ते सेवाकार्यात जुळले होते. अदाणी गो बैक आंदोलनात सक्रिय सहभाग, मालधक्का प्रदूषण विरोधी आंदोलन, चंद्रपूर किल्ला सफाई अभियानात पूर्णवेळ सक्रिय राहून महाराष्ट्र …

Read More »

१८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना तारखेनुसार मिळणार लस, वेगवेगळया रंगाचे टोकन देणार

१८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना तारखेनुसार मिळणार लस वेगवेगळया रंगाचे टोकन देणार चंद्रपूर, ता. ३ : सद्यस्थितीत चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रात १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांकरीता पंजाबी सेवा समिती, तुकूम तसेच रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळा, रामनगर या २ केंद्रांवर लसीकरण सुरु करण्यात आले आहे. या लसीकरण केद्रांत लाभार्थ्यांना मिळालेल्या तारखेनुसार तसेच स्लॉटनुसार कोव्हीन ऍप किंवा आरोग्य  सेतू  ऍपमधील नोंदी प्रमाणे लसिकरण …

Read More »

भद्रावती पोलीसांनी दारू सह १० लाखांचा मूद्देमाल केला जप्त.

बरांज तांडा येथील तब्बल ४२ लाखांच्या कारवाई नंतर आठवड्यातून ही दुसरी मोठी करवाई. भद्रावती पोलीसांनी अवैध दारू विक्री व वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे धाडसत्र सुरू केले असून दिनांक २६ ते २८ दरम्यान बरांज तांडा परिसरात विशेष मोहीम राबवून तब्बल ४१,९०,००० रुपयाचा गूळ दारू गूळ सडवा व गूळ दारू काढण्याचे साहित्य असे मिळून मुद्देमाल जप्त केला होता आणि आज दिनांक …

Read More »