नागपुरात गेल्या 24 तासात दोघांची हत्या झाली होती. तर यानंतर आता नागपुर ग्रामीणमध्ये तिसरी हत्येची घटना बुटीबोरी येथे घडली आहे. नागपूरच्या इमामवाडा भागात दोन मजुरांनी संगनमत करून मित्राची हत्या केली. त्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून दिला होता. पाचपावली भागात तिघांनी मिळून एकाची हत्या केली. तिसरी घटना जिल्ह्यातील बुटीबोरी येथे झाली आहे. पोलीस खबऱ्या असल्यावरून दोघांनी सुनील भजे नावाच्या व्यक्तीची हत्या केली. …
Read More »‘पीडब्ल्यूडी’च्या कामात 25 लाखांची फसवणूक
सार्वजनिक बांधकाम विभागाची (पीडब्ल्यूडी) कामे मिळवून देण्याच्या बहाण्याने 25 लाख रुपयांची फसवणूक केली. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात सचिन साळुंके,रा. आंबेगाव, कात्रज याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. समीर शशिकांत रहाटे (वय 46, रा. मुलुंड) यांनी फिर्याद दिली. समीर यांची एस. आर. ग्लोबल एंटरप्रायझेस नावाने कंपनी आहे. त्यांनी या कंपनीच्याच नावाने पीडब्ल्यूडीचे काम करण्याचे लायसन्स काढले आहे. लायसन्स काढल्यानंतर कामे मिळविण्यासाठी …
Read More »‘तिने’ दिलाय धोका! 80 वर्षांच्या आजोबांचे सतरा लाख बुडाले
एका बँकेतील गलेलठ्ठ पगाराच्या पदावरून निवृत्त झालेल्या 80 वर्षांच्या आजोबांनी डेटिंग साईटवरील ललनेच्या जाळ्यात अडकून एक नव्हे… दोन नव्हे… तर तब्बल 17 लाख 10 हजार रुपये गमावले आहेत. आजोबांनी दिलेल्या फिर्यादीवरून, श्रेया नावाच्या महिलेवर पुण्यातील वारजे-माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी आजोबा हे वारजे-माळवाडी परिसरात राहतात. त्यांचा पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते बँकेतून अधिकारीपदावरून निवृत्त झाले. …
Read More »तहसीलदार दोन लाख, तर अमरावतीच्या मुख्याधिकारी २० हजार घेताना अटकेत
तब्ब्ल दोन लाखांची लाच घेतल्याने अलिबागच्या तहसिलदारास आणि त्याच्या एजंटला एसीबीने अटक केली. मिनल कृष्णा दळवी असे अटक केलेल्या तहसीलदाराचे नाव आहे. तर त्याचा एजंट राकेश रमाकांत चव्हाण यालाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नवी मुंबई एसीबीची डीवायएसपी ज्योती देशमुख यांनी केली. एसीबीच्या या कारवाईनंतर महसूल विभागात खळबळ उडाली आहे. दुसरी घटना अमरावती जिल्ह्यातील भातकुली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी करिष्मा वैद्य …
Read More »मन सुन्न : मुलींवर विनयभंग, अत्याचार
विनयभंग आणि अत्याचाराच्या तीन घटना घडल्या. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात खळबळ उडाली आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पहिली घटना- हिरापूर येथील ५० वर्षीय धनराज पतरु गोहणे या नराधमाने एका ६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार पीडितेच्या पालकांनी केली. त्याच्याविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. दुसरी घटना – व्याहाड खुर्द येथील अतुल रामनाथ मानकर …
Read More »अमरावतीत विवाहितेची विष घेऊन आत्महत्या
अमरावतीमधील विलासनगर परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेने विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी समोर आली. विवाहितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी विवाहितेच्या पती व सासूविरुद्ध कौंटूबिक छळ तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. विलास विजय रामटेके असे गुन्हा दाखल झालेल्या मृत विवाहितेच्या पतीचे नाव आहे. विलासने तक्रारदार महिलेच्या मुलीसोबत प्रेमविवाह केला होता. त्यानंतर विलास हा सतत मुलीला मारहाण …
Read More »शिकारीसाठी शेतात लावलेल्या वीज तारांना स्पर्श ; दोन तरुणांचा मृत्यू
शिकारीसाठी शेतामध्ये लावलेल्या वीज प्रवाहित लोखंडी तारांना स्पर्श झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात ही घटना घडली. देवरी शहरालगतच्या मोठा परसटोला परिसरात या घडलेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. आशिष कोसरे (२६), अनमोल गायकवाड (२२, दोघेही रा. परसटोला (देवरी)असे मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
Read More »धक्कादायक : खून करुन मुंडक्याचा केला फुटबाॅल
चंद्रपूर शहराजवळील दुर्गापूर येथेल महेश मेश्राम यांचा खून केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. दुर्गापूर मुख्य मार्गावर हा खून झाला. मेश्राम हा तो नुकताच कारागृहातून पॅरोलवर बाहेर आला होता. पाेलिसांनी दाेघांना अटक केली आहे. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापुरात येथे रात्री साडे नऊ ते साडे दहा वाजेच्या सुमारास घडली. मेश्राम यांना आधी टाेळक्याने मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याचे मुंडक धडावेगळे …
Read More »मोबाईल : 6 वर्षीय मुलाने आईच्या बँक खात्यातून उडविले 1 लाख 78 हजार
पालकांचे मोबाइल वापरत त्यावर दिवसभर ऑनलाईन गेम मुले खेळतात. ऑनलाईन गेमचा फटका आता लहान मुलांसह त्यांच्या पालकांनाही सहन करावा लागतोय. एका अवघ्या ६ वर्षीय मुलाने ऑनलाईन गेम खेळण्याच्या नादात त्याच्या आईच्या बँक खात्यातून १ लाख ७८ हजार रुपये उडविले. बँक खात्यातून पैसे कमी झाल्याचे लक्षात येताच पालकांनी सायबर सेलकडे धाव घेतले. पोलिसांनी मोबाइल तपासला असता मुलाने गेमच्या नादात आई वडिलांचे …
Read More »भारत जोडोत जात असताना काँग्रेस नेते नसीम खान यांच्या गाडीचा अपघात
काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक माजी मंत्री नसीम खान यांच्या गाडीचा नांदेडमध्ये अपघात झालाय. नांदेडच्या भिलोली टोलनाक्यावर शनिवारी हा अपघात झाला. यावेळी नसीम खान प्रवास करत असलेल्या कारला एका दुसऱ्या कारने समोरून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही कारच्या बोनेटचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे. सुदैवाने या अपघातात नसीम खान यांना फारशी दुखापत झालेली नाही. केवळ …
Read More »