मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री अर्थात बागेश्वर सरकार यांनी भक्तांसमोर नव्हे तर नागपुरातील पत्रकार भवनात आपले चमत्काराचे दावे सिद्ध करावे, असे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी दिले. बागेश्वर सरकार यांचे समर्थक, विहिप, बजरंग दल आणि इतर हिंदुत्ववादी संघटना नागपुरात शुक्रवारी रस्त्यावर उतरल्या. संविधान चौक येथे झालेल्या आंदोलनात अंनिसचे प्रा. श्याम मानव यांचा पुतळा …
Read More »जय महाकाल : नाशकातील त्र्यंबकेश्वर मंदिर आजपासून खुले
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरातील ज्योतिर्लिंगाचे संवर्धन व मंदिराच्या देखभालीसाठी 5 जानेवारीपासून बंद असलेले मंदिर भाविकांना दर्शनासाठी शुक्रवारी सकाळी ७ पासून खुले होणार आहे. संवर्धनाच्या कालावधीत त्रिकालपूजा, प्रदोष पुष्पपूजा आदी नित्य परिपाठ सुरू होते. मात्र, भाविकांना दर्शनासाठी प्रवेशबंद होता. या कालावधीत भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत शिवलिंगावर वज्रलेप करण्यात आला. औरंगाबाद येथील प्रसिद्ध उद्योजक शेखर देसर्डा यांनी त्र्यंबकेश्वर चरणी अर्पण केलेले चांदीचे दरवाजे गर्भगृहास …
Read More »सप्तशृंगी देवी मंदिर दर्शनासाठी राहणार चोवीस तास खुले
हजारो-लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवी मंदिर नविन वर्षानिमित्त भाविकांसाठी 24 तास खुले राहणार आहे. दरवर्षी लाखो भाविक नवीन वर्षाची सुरवात ही सप्तशृंगी देवीच्या दर्शनाने करत असतात. यावर्षी भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर शनिवार,आज (दि. 31) दिवसभर खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. यावर्षी सप्तशृंगीगडावर नववर्षाच्या स्वागतासाठी नेहमीपेक्षा जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी …
Read More »सप्तशृंगी देवी मंदिर दर्शनासाठी राहणार चोवीस तास खुले
हजारो-लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवी मंदिर नविन वर्षानिमित्त भाविकांसाठी 24 तास खुले राहणार आहे. दरवर्षी लाखो भाविक नवीन वर्षाची सुरवात ही सप्तशृंगी देवीच्या दर्शनाने करत असतात. यावर्षी भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर शनिवार,आज (दि. 31) दिवसभर खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. यावर्षी सप्तशृंगीगडावर नववर्षाच्या स्वागतासाठी नेहमीपेक्षा जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी …
Read More »महादेवाचे मंदिर बांधायला लागली तब्बल 100 वर्षे 👉कुठे आहे हे मंदिर?वाचा…
तुम्हाला अशा एका मंदिराविषयी आम्ही सांगणार आहोत, जे आश्चर्यापेक्षा कमी नाही. हे मंदिर बांधण्यासाठी 100 वर्षांहून अधिक काळ लागल्याचे सांगितले जाते. हे मंदिर महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यातील एलोरा अर्थात वेरूळच्या लेण्यांमध्ये आहे. वेरूळचे प्रसिद्ध कैलास मंदिर म्हणून हे ओळखले जाते. 276 फूट लांब आणि 154 फूट रुंद या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ एक खडक कापून हे मंदिर बांधण्यात आले आहे. जर …
Read More »मंदिरांमध्ये मोबाईलवर बंदी; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश!
मोबाईल आणि मानव यांचं अतूट नातं तयार झालं आहे. मोबाईलला जरासाही आपल्यापासून इकडे-तिकडे जाऊ द्यायचच नाही, असा आग्रह अनेकांचा असतो. पण, काही काळ का असेना आता मोबाईलपासून दूर व्हावे लागेल. यासंदर्भात काय आहे बातमी… वाचा अनेक मंदिरांमध्ये ‘मोबाईल बंद ठेवा’, ‘शांतता पाळा’, ‘फोटो काढण्यास मनाई’ अशा सूचना लिहिलेल्या पाहायला मिळतात. मंदिर प्रशासनाकडून या सूचना दिल्या जातात. पण, आता थेट …
Read More »सुख, शांतीसाठी तुळशीशेजारी कोणतं रोपटं ठेवाल…
ज्या घरामध्ये तुळशीचं रोप आहे, तिथे सदैव सुखसंपत्ती आणि भरभराट नांदते असं म्हटलं जातं. तुम्हाला माहितीये का? हे रोप असणं जितकं महत्त्वाचं त्याहूनही त्याची काळजी घेतली जाणं त्याहून महत्त्वाचं आहे. आपण, सहसा घरामध्ये खिडकीच्या भागात झाडं ठेवतो. तिथं तुळशीसोबत इतरही काही झाडं आपण ठेवतो. पण, या पवित्र रोपाशेजारी कोणतंही झाड किंवा रोप ठेवून चालत नाही. तुळशीशेजारी कोणतं रोप ठेवू नये? …
Read More »हनुमान चालिसा पठण करण्याचे नियम वाचा
हनुमानची मनोभावे पूजाविधी केला तर तुमची अनेक संकटे दूर होतात. मात्र, योग्य प्रकारे हनुमान चालिसा पठण केले तर त्याचे खूप फायदे आहेत. हिंदू धर्मात देवी-देवतांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. मंगळवार आणि शनिवार हे हनुमानजींची पूजा करण्याचे दिवस आहेत. या दिवशी हनुमानजींच्या पूजेबरोबरच हनुमान चालिसाचे पठण केल्यास हनुमानाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. हनुमान चालिसाचे नियमित पठण केल्याने तो लवकर प्रसन्न होतो …
Read More »तीन डोळे, तीन शिंगे असलेल्या नंदी बैलाचे निधन
नंदी बैलाला वैदिक धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. धार्मिक परंपरेनुसार नंदी बैल म्हणजे भगवान शंकराचे प्रमुख वाहन आहे. त्यामुळे लोकांच्या भावना देखील आणखी प्रकट होताना दिसतात. अशातच आता मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्हातील बुंदेलखंडमधील केदारनाथ धाम प्रसिद्ध आहे. जटाशंकर धाम येथील प्रसिद्ध नंदी बैलाचे निधन झाले आहे. तीन शिंगे, तीन डोळे प्रत्येक नंदी बैलाला दोन शिंगं असतात. मात्र, जटाशंकर धाम येथील प्रसिद्ध …
Read More »“आयुष्याची माती करायची नसेल तर आई-वडिलांना सांभाळा…”
“मुलांसाठी आई-वडिलांचे आशीर्वाद आयुष्याला समृद्ध करतात. आयुष्याची माती करायची नसेल तर आई-वडिलांना सांभाळा,”असे भावनिक आवाहन नाशिक, त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तिनाथ महाराज संस्थानच्या विश्वस्त कीर्तनकार कांचनताई जगताप यांनी केले. या वेळी विजय औताडे यांनी त्यांच्या आई कै.अनिताताई साईनाथ औताडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भगवानबाबा बालिकाश्रमातील २० मुलींना दत्तक घेतले. हर्सूलचे ग्रामदैवत हरसिद्धी माता यात्रोत्सवानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात जगताप बोलत होत्या. “जन्माला येणे …
Read More »