Breaking News

नागपूर

नागपुरात प्रेम प्रकरणातून तरुणावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला; “ती माझीच आहे, लांब रहा…”

“ती माझीच आहे”, असे म्हणत दोन तरुणांनी एका तरुणावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मोहम्मद सोहेल मोहम्मद शकील (वय 24) असं जखमी तरुणाचं नाव आहे. तो सजावटीचं काम करतो. या प्रकरणी पोलिसांनी वनदेवी नगर येथील सय्यद इर्शाद (वय 23) आणि शोएब अन्सारी (वय २23) या दोघांना अटक केली …

Read More »

नागपुरात समृद्धी महामार्गावर द्राक्षाचा ट्रक उलटला

बंगलोर येथून द्राक्षे भरून नागपूरला येणारा ट्रक समृद्धी महामार्गावर बुधवारी सकाळी उलटला. या आठवड्यात समृद्धी प्रवेश व्दारावर घडलेला हा तिसरा अपघात आहे. या घटनेत ट्रक चालक अभिजीत मंडल जखमी झाला.बंगलोर येथून द्राक्षे भरून ट्रक क्र डब्ल्यू बी ६७ सी १३४४ ने समृद्धी महामार्गाने नागपूरला येत असताना अनियंत्रित होऊन उलटला. ट्रकमधील द्राक्षाचे बॉक्स रस्त्यावर पडले होते. पोलीस घटनास्थळी दाखल झाले.जखमी चालक …

Read More »

नागपूर झेडपी सभापतीने शासकीय फर्निचर दिले आंदणात : राजकीय चर्चा

नागपूर जिल्हा परिषदेतील विषय समिती सभापतींच्या सरकारी निवासस्थानांवरील फर्निचर गायब झाल्याची जोरदार चर्चा झाली. हा मुद्दा अलीकडे चांगलाच गाजला. यामुळे सत्तापक्ष अडचणीतही आला होता. सुरुवातीला हा मुद्दा लावून धरणाऱ्या विरोधीपक्षाला सर्वसाधारण सभेदरम्यान मात्र या मुद्दाचा विसर पडला. विरोधकांनी रागाच्या भरात सभात्याग केला आणि माजी सभापतींचा जीव भांड्यात पडला. परंतु, यामुळे काहीजण दुखावल्याची चर्चा आहे. फर्निचर कोणी नेले? जिल्हा परिषद अध्यक्ष, …

Read More »

शिंदे-फडणवीसविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट : नागपुरात तरुणावर गुन्हा, भाजप आमदाराची तक्रार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्यावरून नागपूर पोलिसांनी मुंबईतील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी कसबा पोटनिवडणूक संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदाराची तक्रार नागपुरातील लकडगंज पोलिस स्टेशनमध्ये सार्थक कपाडी या तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. तो मुंबईतील …

Read More »

चंद्रपुरातील 30 वाघांचे संभाजीनगर,गोंदिया, कोल्हापूर, अमरावती जिल्ह्यात स्थलांतरण

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तसेच अलीकडील घटना लक्षात घेता मानव-वन्यजीव संघर्ष वाढत आहे.जिल्ह्यात २०३ वाघ आहेत. लवकरच जिल्ह्यातील ५ वाघ नवेगाव-नागझिराच्या जंगलात स्थलांतरित केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात सह्याद्री, मेळघाट, संभाजीनगर येथे २५ वाघ स्थलांतरित केले जाणार आहे, अशी माहिती राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सावली तालुक्यातील पेंढारी मक्ता …

Read More »

नागपुरात यू-ट्यूब बघून अल्पवयीन मुलीने स्वत:चीच केली प्रसूती

गर्भवती असल्याची माहिती दडवून ठेवणाऱ्या अल्पवयीन मुलीने यू-ट्यूब पाहून स्वत:च प्रसूती करून बाळाला जन्म दिल्याची घटना नागपुरातून समोर आली. हे बाळ रडल्यास साऱ्यांना माहिती होईल, आपले बिंग फुटणार या भीतीतून नंतर पट्ट्याने गळा आवळून त्याचा जीव घेतला. हृदयाचा थरकाप उडविणारी ही घटना शुक्रवारी मध्यरात्री शहरातील अंबाझरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली. मुलीची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर शासकीय इस्पितळात उपचार सुरू …

Read More »

नागपूर-बिलासपूर ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला प्रवासी मिळेना

दहा वंदे भारत एक्सप्रेस देशातील वेगवेगळ्या शहरादरम्यान धावत आहेत.या गाड्यांची लोकप्रियताही कमालीची वाढली आहे. वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांनी त्यांच्या मतदारसंघात वंदे भारत एक्सप्रेस सुरू व्हावी, अशी मागणी रेल्वेमंत्र्याकडे केली आहे. नेमकी उलट स्थिती नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसबाबत आहे. मध्य भारतात या गाडीकडे प्रवाशांनी पाठ फिरविली आहे. 55 टक्के प्रवासी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर-बिलासपूर वंंदे एक्सप्रेसला 11 डिसेंबर 2022 …

Read More »

प्रथम संस्था और नागपुर महानगरपालिका की स्कूलों ने मनाया विज्ञान दिवस!

विज्ञान दिवस के अवसर पर प्रथम शिक्षा संस्था तथा नागपुर महानगरपालिका उत्तर नागपुर पीली नदी की स्कूलों ने मिलकर एक विज्ञान प्रदर्शनी का आयोजन कि आरसीया, टीपू सुल्तान चौक साईं कृपा मंगल कार्यालय के सामने एक प्रदर्शनी का आयोजन किया इसमें लगभग 150 बच्चों ने हिस्सा लिया और विज्ञान के 25 प्रोजेक्ट्स रखे, जिसको अभिभावकों ने देखा, लोगों से बातचीत …

Read More »

नागपुरची सफर 100 रुपयांत : मेट्रोची प्रवाशांना भेट

मेट्रो सेवेचा नागपूरकरांना चांगला फायदा झाला आहे.अनेकांचा प्रवास सुखकर झाला आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महामेट्रोकडून चांगली सेवा देण्यासह विविध सुविधा दिल्या जात आहेत. आता अशीच एक घोषणा मेट्रो प्रशासनाने केली आहे. यामध्ये केवळ 100 रुपयांत नागपूरकरांना एक दिवस मेट्रोने शहरात कुठेही फिरता येईल. या दैनिक पास योजनेमुळे प्रवासी आणि पर्यटकांना 100 रुपयांत नागपूरदर्शन होणार आहे. विद्यार्थ्यांना 30 टक्के सवलत नागपूर …

Read More »

नागपुरची सफर 100 रुपयांत : मेट्रोची प्रवाशांना भेट

मेट्रो सेवेचा नागपूरकरांना चांगला फायदा झाला आहे.अनेकांचा प्रवास सुखकर झाला आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महामेट्रोकडून चांगली सेवा देण्यासह विविध सुविधा दिल्या जात आहेत. आता अशीच एक घोषणा मेट्रो प्रशासनाने केली आहे. यामध्ये केवळ 100 रुपयांत नागपूरकरांना एक दिवस मेट्रोने शहरात कुठेही फिरता येईल. या दैनिक पास योजनेमुळे प्रवासी आणि पर्यटकांना 100 रुपयांत नागपूर दर्शन होणार आहे. विद्यार्थ्यांना 30 टक्के सवलत …

Read More »