नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रियकराने प्रेयसीवर अत्याचार करून तिची हत्या केली आहे. दीपक इंगळे असं या प्रियकराचं नाव आहे. वाठोडा पोलीस ठाण्यात महिलेची मिसिंगची तक्रार समोर आली होती. त्याचा तपास करताना ही माहिती समोर आली. दीपक इंगळेची कसून चौकशी केली असताना त्याने हत्येची कबुली दिली. सुषमा काळवंडे असं मृत महिलेचं नाव आहे. काय आहे प्रकरण? दीपक …
Read More »नागपूर जिल्ह्यात उद्यापासून दोन दिवस गारपीट : भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती मध्ये पाऊस
पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात विदर्भामध्ये २५ ते २७ मार्चदरम्यान हलक्या ते मध्यम पावसासह गारपीट होऊ शकते. तर कोकण, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. कोणत्या जिल्ह्यात पाऊस? रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मुंबईमध्ये दोन दिवस तर २६ मार्चपर्यंत नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, …
Read More »विदर्भात उद्यापर्यंत ढगाळ वातावरण : तीन दिवसांत तापमान वाढेल
राज्यात सोमवार, अर्थात 20 मार्चपासून विदर्भ वगळता उर्वरित भागात पावसाळी वातावरण कमी होणार आहे. विदर्भात मंगळवारपर्यंत ढगाळ वातावरण राहील. सोमवारपासून पुढील तीन दिवसाच्या कमाल तापमानात 4 अंश सेल्सियसने वाढ होण्याचा अंदाज आहे. राज्यात गारपिटीचा कालावधी 26 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत असतो. कधी मार्चअखेर किंवा एप्रिलमध्येही गारपीट होते. देशात सर्वात जास्त गारपीट महाराष्ट्रात होते. त्यातही उत्तर विदर्भात तिचा जोर अधिक असतो. …
Read More »‘पीडब्लूडी’सचिव दशपुत्रे यांनी स्वीकारला पदभार : मोहन कारेमोरे यांनी केले स्वागत
नागपूर विभागाचे मुख्य अभियंता दशपुत्रे यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्लूडी) सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक आणि सामाजिक कार्यकर्ते मोहन कारेमोरे यांनी अलीकडेच दशपुत्रे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्लूडी) सचिव प्रशांत नवघरे यांचे अलीकडेच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या जागेवर दशपुत्रे यांनी पदभार स्वीकारला आहे.
Read More »नागपुरात कोरोना वाढतोय : H3N2 चे रुग्ण जास्त,आरोग्ययंत्रणा सतर्क
कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. राज्यात 226 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात 926 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईतील दादर माहीम भागात रुग्ण वाढल्याचं महापालिकेने सांगितले. देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय. राज्यात पंचसूत्री राबवण्याच्या सूचना आता केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून सतर्क राहण्याचे केंद्रीय …
Read More »आजपासून नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत चार दिवस गारांसह अतिवृष्टीचा इशारा
नागपूर विभागात 16 ते 19 मार्चपर्यंत वादळी वारा, गारपीटीसह अतिवृष्टीची शक्यता आहे. 16 व 17 मार्च रोजी विदर्भातील नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांत अतिसतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. गारपीट व वादळी पावसामुळे मनुष्य आणि वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे. भारतीय हवामान विभागातर्फे नागपूर विभागातील सर्व …
Read More »नागपुरात संपामुळे 150 शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमूदत संप पुकारला आहे. आज संपाचा दुसरा दिवस आहे. तब्बल 18 लाख शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी कालपासून संपावर गेले आहेत. या संपाचा सर्वाधिक फटका रुग्णालयांना बसला असून संपामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. नागपूरात आरोग्य कर्मचारी संपावर असल्याने सर्वसामान्यांना फटका बसला आहे. नागपुरात संपामुळे 150 शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. मेयो, मेडिकलमधील तपासण्यांना ब्रेक देण्यात आला आहे.
Read More »‘पीडब्लूडी’च्या सचिव पदावर दशपुत्रे, तर मुख्य अभियंता म्हणून नंदनवार यांना पदोन्नती
सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्लूडी) सचिव प्रशांत नवघरे यांचे अलीकडेच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या जागेवर नागपूर विभागाचे मुख्य अभियंता दशपुत्रे यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच नागपूर विभागात मुख्य अभियंता म्हणून दिनेश नंदनवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दशपुत्रे यांना सचिव आणि नंदनवार यांना मुख्य अभियंता पदावर पदोन्नती मिळाल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे. कामाची पावती… सार्वजनिक बाधकाम विभागात …
Read More »संपामुळे होणार ‘काम ठप्प’; जुन्या पेन्शनसाठी नागपुरातील संघटना आक्रमक
महसूल कर्मचारी संघटना,महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका-नगरपरिषद कर्मचारी संघटना फेडरेशनच्या वतीने 14 मार्चपासून पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपाला नागपूर महापालिकेतील राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशन (इंटक) व महाराष्ट्र जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने पाठिंबा दर्शवला आहे. यांसदर्भात नागपूर मनपा प्रशासनाला संपाची नोटीस पाठवण्यात आली आहे. या संपात महापालिका व जिल्हा परिषदेतील सर्वच विभागातील कर्मचारी सहभागी होणार असल्याने दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची …
Read More »नागपूर-भंडारा रोडवर मसाला भरलेल्या ट्रकला आग : 38 लाखांचे नुकसान
नागपूर -भंडारा या राष्ट्रीय महामार्गावर शनिवार सायंकाळच्या सुमारास सुरुची मसाले कंपनीचा एक ट्रक जळून खाक झाला. या ट्रकमध्ये मसाल्यात वापरले जाणारे तेजपान होते. याआगीत सुमारे 38 लाख रुपयांचे तेजपान जळून खाक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. वायरिंगच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे बोलले जाते. आग लागलेल्या ट्रकचा क्रमांक एम एच 30,-4422 उमिया धाम नाका नंबर 5 परिसरात हा ट्रक उभा असताना …
Read More »
विश्वभारत News Website