विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोमवारी औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीनंतर आज दुपारी साडेबारा दरम्यान ते शहरात दाखल होतील. त्यानंतर ते मंत्री संदीपान भुमरे यांचे मतदारसंघ पैठणमध्ये सभा घेतील. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री दुसऱ्यांदा औरंगाबादच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे शिंदे गटाकडून त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. असा कार्यक्रम दुपारी 12 दरम्यान शिंदे हे …
Read More »आमदार बंबविरोधात उद्या शिक्षकांचा मोर्चा
औरंगाबाद : खुलताबादचे भाजप आमदार प्रशांत बंब आणि शिक्षकांमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्यालयी उपस्थित राहत नाही, या शिक्षकांवरील आरोपानंतर बंब यांच्याविरोधात शिक्षकांसह पदवीधर, शिक्षक आमदार आक्रमक झालेत.औरंगाबादमधील आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालायपर्यंत रविवारी (दि. ११) सकाळी 11 वाजता भव्य मोर्चा काढणार आहेत. काय म्हणाले होते बंब मुख्यालयी न राहता बहुतांश शिक्षक खोटी कागदपत्रे सादर करून घरभाडे घेतात. शासनाची …
Read More »नागपूर जिल्ह्यात आधार जोडणी अभियान
नागपूर : मतदार नोंदणीला आधार क्रमांक जोडण्यासाठी मतदारांच्या सुविधेसाठी विशेष शिबिर रविवारी, 11 सप्टेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर आयोजित केले आहे. तरी जिल्ह्यातील मतदारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. प्रक्रिया सुयोग्य मतदान ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम १ ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे. विद्यमान मतदारांकडून त्यांची ओळख प्रस्थापित करण्यासाठी मतदार यादीतील …
Read More »नागपुरातील सक्करदरा उड्डाण पुलावर भीषण अपघात, दोन चिमुरड्यासह चौघे ठार
नागपूर : शहरातील सक्करदरा परिसरात शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरून जाणारे चौघे जण सुमारे 70 ते 80 फूट उंच फ्लायओवरवरून खाली फेकले गेल्याने चौघांचा मृत्यू झाला. माहितीनुसार, मृतांमध्ये 2 चिमुरड्यांचाही समावेश आहे. सक्करदरा परिसरात रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास फ्लायओवरवर गर्दीतून जाताना अनियंत्रित चारचाकी कारने दोन दुचाकींना जोरात धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील चौघे …
Read More »नागपुरातील विद्यार्थ्यांना दिलासा, मेट्रो सुटेल ‘या’ वेळेत
नागपूर : शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन महामेट्रोने सोमवार, १२ सप्टेंबरपासून सकाळी ६.१५ मेट्रोसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. शेवटची मेट्रो रात्री १० वाजता सुटेल. मेट्रोच्या वर्धा मार्गासाठी कस्तुरचंद पार्क आणि खापरी तर हिंगणा मार्गासाठी बर्डी व लोकमान्य नगर अशा चारही स्थानकांवरून सोमवारपासून सकाळी ६.१५ पासून मेट्रोसेवेला सुरुवात होईल. रात्री १० पर्यंत मेट्रो धावेल. या दोन्ही मार्गांवर मेट्रोच्या फेऱ्यांमध्येही वाढ …
Read More »एक चिखलात फसून, दुसरा अपघातात बिबट ठार
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील देवलापार वनपरिक्षेत्र आणि रामटेक वनपरिक्षेत्रात दोन वेगवेगळ्या घटनांत दोन बिबट्यांचे मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या. पहिल्या घटनेत गुरुवारी संध्याकाळी पटगोवरी गावानजीक सर्वे क्रमांक ३३९ येथे चिखलात फसून बिबट्याचा मृत्यू झाला. बिबट चिखलात फसलेला असताना नागपूर येथील रेस्क्यु पथकाला पाचारण केले.त्यांनी बिबट्याला वाचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. परंतु तोपर्यंत नाका तोंडात पाणी गेल्याने बिबट्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत …
Read More »रस्त्याच्या प्रकरणात सोयगाव तहसीलमध्ये विष घेण्याचा प्रयत्न
औरंगाबाद : कोणतीही सूचना व सुनावणीची नोटीस न देताच शेतातून बेकायदेशीर रस्ता दिल्याचा निकाल ऐकून ४५ वर्षीय महिलेने सोयगाव तहसील कार्यालयात कीटकनाशक प्राशन करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस पोहचले.गंभीर महिलेला तातडीने उपचारासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.चंद्रकालाबाई पांडुरंग शिंदे (४५, रा. पळाशी, ता. सोयगाव)असे हृदयविकाराच्या झटका येऊन बेशुद्ध महिलेचे नाव आहे. प्रकरण असे… पळाशी शिवारात …
Read More »रेल्वेत सराफा व्यापाऱ्यास लुटले
नागपूर : अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसमधून तब्बल 52 लाखांच्या सोन्यावर चोरट्यानी हात साफ केले. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. लखविंदरसिंग (वय 49 ) यांचा अमृतसर येथे दागिन्यांचा मोठा व्यवसाय आहे.त्याचे 52 लाख 78 हजार रुपयांचे दागिने धावत्या रेल्वेतून चोरी झाले. हा व्यापारी नागपुरात उतरल्यावर बॅग तपासली असता त्याला धक्का बसला. ही घटना अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसमध्ये सोमवारी पहाटे उघडकीस आली. अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसच्या …
Read More »गोंदियाऐवजी नागपुरातून सुटेल विदर्भ, महाराष्ट्र एक्सप्रेस
नागपूर : छत्तीसगडमधील राजनांदगाव ते कळमना रेल्वेमार्गाचे काम सुरू असल्याने काही दिवस नागपूरमार्गे अनेक गाड्या रद्द असणार आहेत. तर,विदर्भ एक्स्प्रेस सोमवारी नागपूरहून सुटेल आणि महाराष्ट्र एक्सप्रेस नागपूरपर्यंतच धावणार आहे.30 ऑगस्टपासून रेल्वेमार्गाचे काम सुरू असल्याने हावडा मार्गावरील अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. गोंदिया-सीएसएमटी विदर्भ एक्सप्रेस सोमवारी आणि गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस मंगळवारी गोंदिया ऐवजी नागपूरहून सुटेल. रद्द केलेल्या रेल्वे शालीमार-एलटीटी ज्ञानेश्वरी एक्सप्रेस, …
Read More »‘पीडब्लूडी’त पदोन्नती कागदावरच
नागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्लूडी) काही उपविभागीय अभियंत्यांची पदोन्नती हॊऊनही रुजू न झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मागील तीन महिन्यापासून आपल्या आवडीच्या ठिकाणी पदस्थापना मिळावी, यासाठी या अभियंत्यांचा खटाटोप सुरु आहे. मागील जून मध्ये जवळपास संपूर्ण राज्यातून 15 उपविभागीय अभियंत्यांना कार्यकारी अभियंता पदावर महाविकास आघाडी सरकारच्या काळात पदोन्नती देण्यात आली होती. त्यापैकी 6 अभियंते नागपूर विभागातील आहेत. मात्र, आतापर्यंत कोणतेही …
Read More »