Breaking News

नागपूर

खळबळ : तहसील कार्यालयात जप्त वाळूचे ट्रॅक्टर चोरीला

पैठण गोदावरी नदीतून वाळू तस्करी करताना जप्त केलेले ट्रॅक्टर तहसील कार्यालयातून अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. महसूल विभागाकडून बुधवारी रात्री उशिरा चोरीला गेलेल्या ट्रॅक्टरची तक्रार पैठण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यामुळे महसूल विभागाच्या कामकाजाचे पितळ उघडे पडले आहे. प्रकरण काय? पैठण गोदावरी नदीतून अवैधरित्या वाळू तस्करी करताना महसूल विभागाच्या औरंगाबाद पथकाने 12 जानेवारी रोजी रजनीकांत हिरालाल कटारिया (रा. …

Read More »

मध्य नागपुर मोमिनपुरा से गुजर रहा फ्लाईओवर विवादों के घेरे में!

संविधान देश के नागरिकों को मूलभूत अधिकार देता है!जिसमें अभिव्यक्ति की आज़ादी भी दी गई है!लेकिन मध्य नागपूर में अतिक्रमण आज भी दिखाई देता है! अतिक्रमण हटाने में नागपूर महानगरपालिका असफल है!तो सवाल यह उठता है कि क्या मध्य नागपुर मोमिनपुरा से गुजर रहे फ्लाईओवर की आवश्यकता थी? लोगों के पुनर्वास के बगैर क्या उन्हें बेघर किया जा सकता है? …

Read More »

नागपूरमध्ये पाच टक्केच अवैध बांधकामांवर कारवाई; उच्च न्यायालयात माहिती सादर

नागपूर शहरातील अवैध बांधकामांवर कारवाई करावी,अशी मागणी गेल्या बऱ्याच काळापासून सुरु आहे. त्यासाठी न्यायालयसुद्धा पाठपुरावा घेत आहे. ही बांधकामे हटवा, असे आदेश यापूर्वी देण्यात आलेत. मात्र, आत्तापर्यंत शहरातील केवळ पाचच टक्के अवैध बांधकामे हटविण्यात आली आहेत, अशी धक्कादायक माहिती उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर करण्यात आली. शहरात अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या अवैध बांधकामांबाबत न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करवून घेतली …

Read More »

पवार,अनिल देशमुख यांची गडकरींसोबत नागपुरात भेट

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात नागपुरात भेट झाली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यावेळी उपस्थित होते, हे विशेष. पवार विदर्भाच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, गडकरी यांची भेट घेण्याचे कोणतेही नियोजन पवारांच्या कार्यक्रमात नव्हते. शनिवारीच देशमुख यांना कोर्टाने नागपूरला जाण्याची परवानगी दिली होती. त्यांचे शनिवारी नागपुरात जंगी स्वागतही झाले. आज पवार यांच्यासोबत गडकरी यांची नागपूर …

Read More »

खवले मांजराची विक्री, आरोपी अटकेत : नागपूर-भंडारा वनविभागाची कारवाई

नागपूर व भंडारा वनविभागाच्या संयुक्त पथकाने खवले मांजर या अत्यंत दुर्मिळ वन्यप्राण्याची विक्री करताना दोघांना अटक केली. रामेश्वर माणिक मेश्राम (रा. तिड्डी, जि. भंडारा, वय 32), सचिन श्रावण उके (रा. खमारी (भोसा), जि. भंडारा, वय २९) अशी आरोपीची नावे आहेत. आरोपींकडून 19.915 कि.ग्रॅ. वजनाचे जिवंत नर खवले मांजर जप्त करण्यात आले. खवल्या मांजराची विक्री केली जात आहे, अशी माहिती पथकाला …

Read More »

नागपुरात प्रॉपर्टीवरून मित्राचा खून

प्रॉपर्टी डीलिंगच्या व्यवसायात असलेल्या दोन मित्रांमध्ये कमिशनच्या पैशावरून एकाचा खून करण्यात आला.ही घटना नागपूर येथील अग्रसेन चौकात घडली. परवेज शेख उर्फ पापा मिया शेख (वय ३०, रा. खरबी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संशयीत आरोपी प्रॉपर्टी डीलर परवेज याकुब खान (वय २८, रा. पारडी) याच्यासह त्याच्या चार सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परवेज खान व परवेज शेख या दोघांची …

Read More »

‘जलयुक्त शिवार’ची कामे तातडीने सुरू करा-जिल्हाधिकारी पांडेय

जलयुक्त शिवार अभियानाबाबत तालुकानिहाय समिती स्थापन करावी. याबाबतची कामे सात दिवसांत सुरू करावे, अशा सूचना औरंगाबाद जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिल्या. समन्वयाने शिवार फेरीच्या माध्यमातून गावाचा जलआराखडा तयार करून जलयुक्त शिवार अभियानाचा दुसऱ्या टप्प्याची कामे सुरू करा, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जलयुक्त शिवार अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. …

Read More »

शेतकरी वाऱ्यावर : न्यायाधिशाविना नागपूर महसूल न्यायाधिकरण

महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणात न्यायाधीस नसल्याने शेतकऱ्यांच्या प्रकरणावर परिणाम होत आहे. नागपूर येथील महसूल न्यायाधिकरणात दोन न्यायाधीस पाहिजेत. मात्र, एक न्यायाधीस एक पद रिक्त आहे. मागील एक वर्षांपासून एका देवस्थानचे प्रकरण थंडबसत्यात अडकून पडले आहे, असा दावा नागपूर हायकोर्टातील वकील मनोज मिश्रा यांनी केला आहे. तसेच कर्मचारी निव्वळ मोबाईलवर असतात. कामाचा ढिगारा असतानाही न्यायाधिकरणात कर्मचारी मनोरंजन करीत असतात. विदर्भातील बऱ्याच शेतकऱ्यांचे …

Read More »

नागपुरात हरविला विराट कोहलीचा मोबाईल

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीसाठी भारतीय क्रिकेट संघ नागपुरात आहे. या दोन्ही संघाची नागपुरात जोरदार तयारी सुरु असताना माजी कर्णधार विराट कोहलीच्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या या ट्वीटवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. आपला नवा कोरा फोन हरवला असून तो कोणाला सापडला का, असा प्रश्न कोहलीने ट्विटच्या माध्यमातून केला आहे. अर्थातच नागपुरात खळबळ माजली असली तरी हा फोन …

Read More »

नागपूर हायकोर्टातील चंदनाचे झाड पळविण्याचा प्रयत्न : दोघांना अटक

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ (हायकोर्ट)परिसरातील चंदनाचे झाड तोडून ते पळविण्याचा प्रयत्न दोन चोरट्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. चोरटे या प्रयत्नात अयशस्वी ठरले अन् पोलिसांनी त्यांना गजाआड केले. ही घटना शुक्रवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ परिसरात घडली. न्यायमूर्ती व वकिलांची वाहने या परिसरात पार्क करण्यात येतात. त्यामुळे नागपूर खंडपीठाचा परिसर बराच मोठा …

Read More »