पतीच्या निधनाला 18 वर्ष झाली. पण यानंतर मलाही संघर्ष करावा लागला, असे माजी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, यावेळी त्यांच्यासोबत घडलेल्या एका प्रसंगाबाबतची माहितीही त्यांनी दिली. ‘घरासाठीचे प्रॉपर्टी राईट्स आपण किती दिवसांपासून आणले आहेत. आपण नियम बनवले आहेत. 7/12 वर महिलांची नावं चढतात का? माझं उत्तर आहे नाही. मी दुसऱ्यांचं उदाहरण देणार नाही, मी माझं स्वत:चं उदाहरण तुम्हाला …
Read More »आयएएस अधिकाऱ्याने केली होती बच्चू कडूविरोधात पोलिसात तक्रार : शिक्षा
माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 2017 सालच्या एका आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांनी सरकारी कामांत अडथळा आणला होता. त्यावेळी नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती. आज अखेर न्यायालयाने बच्चू कडू यांनी दोन वर्षांची शिक्षा सुनावली …
Read More »नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार भरघोस मदत : अधिवेशनात घोषणा!
जळगाव,धुळे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांना मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपले.अवकाळी पावसात कांदा, गहू, मूग आणि हरभरासह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्याची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आल्याचेही गिरीश महाजन यांनी सांगितले.अवकाळी पावसामुळे नुकसानीचा तात्काळ पंचनामे करून नागरिकांना लवकरात लवकर मदत देण्याचे अश्वासनही …
Read More »गडकरींच्या संकल्पनेला ‘काँग्रेस’ची मान्यता ; महामार्गावरील बांबू बॅरिअरचा पहिला प्रयोग विदर्भात
200 मीटर लांबीचे हे बॅरिअर सध्या वणी ते वरोरा महामार्गावर लावण्यात आले आहे. या बॅरिअरचे नाव ‘बाहुबली’ ठेवण्यात आले असून, राष्ट्रीय वाहन चाचणी ट्रॅकसह पिथमपूर, इंदूर आणि इतर काही ठिकाणी याच्या चाचण्या घेण्यात आल्या. रूरकीच्या केंद्रीय इमारत संशोधन संस्थेत याची अग्निरोधक चाचणी घेण्यात आली. या चाचण्यांनंतर भारतीय रोड काँग्रेसने याला मान्यता दिली आहे. अपघात होऊ नये म्हणून महामार्गाच्या कडेला लावण्यात …
Read More »उपमुख्यमंत्र्यांच्या शहरात हजारा हून अधिक झाडांची कत्तल : नागपूर मनपा अनभिज्ञ
नागपूर शहरातील नारा परिसरात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली आहे. एका बांधकाम व्यावसायिकाने (बिल्डर) इमारत बांधण्यासाठी एक हजार हून अधिक झाडे कापली आहेत. विशेष म्हणजे नागपूर महापालिकेला याची माहितीही नव्हती. एका पर्यावरणप्रेमीच्या तक्रारीनंतर ही गंभीर बाब समोर आली आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात ही घटना घडली आहे. कोण आहे बिल्डर? जेरी प्रॉफिट ग्रुप नावाच्या बिल्डर कंपनीची …
Read More »‘ई-स्पोर्ट्स’ नको ; खेळातून प्रशासकीय कामकाजात होतेय सुधारणा : जिल्हाधिकारी डॉ. विपीन
“ई-चावडी, ई-फेरफार, ई-पंचनामा नागरिकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी होत आहे. मात्र, ई-स्पोर्ट्स होऊ नये. खेळ प्रत्यक्षात मैदानातच खेळावे. कामाच्या व्यापातून खेळामार्फत मानसिक आणि शारीरिक विरंगुळा मिळावा,”असे प्रतिपादन नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या समारोपीय भाषणात मानकापूर येथे डॉ. विपीन बोलत होते. अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त प्रसन्ना बिरारी उपस्थित होत्या. या प्रसंगी गोंदिया जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, …
Read More »78 शिक्षक निलंबित,गुन्हे दाखल होण्याची शक्यता : अजित पवार यांची कारवाई
बदलीसाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दाखल करणाऱ्या बीड जिल्हा परिषदेतील 78 शिक्षकांवर सीईओ अजित पवार यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. याच 78 शिक्षकांवर गुन्हा दाखल करावा असा आदेश विभागीय आयुक्त कार्यालयाच्या उपायुक्तांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात संबंधित शिक्षकांवर गुन्हा दाखल हाेण्याची शक्यता बळावली आहे. दिव्यांग कर्मचारी संघटनेने याबाबत तक्रार केल्यानंतर विभागीय आयुक्तालयाकडून गंभीर दखल घेतली असून, त्यामुळं आता जिल्हा परिषद …
Read More »चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची अटक टळणार
आदिवासी बांधवांच्या जमिनीवर अवैध ताबाप्रकरणी सुनावणीस अनुपस्थित राहिल्याने अनुसूचित जनजाती आयोगाने थेट राज्याच्या पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांना पत्र पाठविले होते. पत्रानुसार चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करून आयोगापुढे हजर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता ही अटक टळणार असून प्रशासकीय कार्यवाही केली जात आहे. गौडा आयोगा समक्ष उपस्थित राहू शकतात, अशी माहिती आहे. काय आहे प्रकरण? जिवती तालुक्यातील …
Read More »‘पीडब्लूडी’ सचिव नवघरे यांच्यावर नागपुरात अंत्यसंस्कार : सर्वत्र हळहळ
सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्लूडी) सचिव प्रशांत नवघरे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने बुधवार, रात्री 7 वाजताच्या सुमारास मुंबईत निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांनी पीडब्लूडीच्या विविध विभागात महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. त्यांच्या निधनाने प्रशासकीय वर्तुळात शोक पसरला आहे. सर्वत्र हळहळ मुख्य अभियंता नागपूर दशपुत्रे, दक्षता विभागच्या सुषमा बोन्द्रे, जनार्धन भानुसे, चंद्रशेखर गिरी, मिलिंद बांधवकर, कुच्चेवार, उपाध्याय, बालपांडे,अरुण जॉज, उपाध्यय मॅडम, …
Read More »‘पीडब्लूडी’चे सचिव प्रशांत नवघरे यांचे निधन
सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्लूडी) सचिव प्रशांत नवघरे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने बुधवार, रात्री 7 वाजताच्या सुमारास मुबंईत निधन झाले. त्यांनी पीडब्लूडीच्या विविध विभागात महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. त्यांच्या निधनाने प्रशासकीय वर्तुळात शोक पसरला आहे. त्यांच्या पार्थिवावर नागपुरातील मोक्षधाम घाटावर गुरुवार, दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.
Read More »
विश्वभारत News Website