Breaking News

प्रशासन

लग्नाचे शूटिंग केले जिल्हाधिकारी कार्यालयात : चौकशीचे आदेश

भावी संसाराची स्वप्ने रंगविणाऱ्या जोडप्याने चक्क विनापरवानगी प्री-वेडिंग (लग्नापूर्व) शूटिंग केले. हेरिटेज वास्तू असलेल्या नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मंगळवारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत या जोडप्याचे शूटिंग केले.मात्र,त्यांना कोणीही न हटकल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जातेय. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी या प्रकाराची दखल घेत चाैकशीचे आदेश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तहसीलदार, प्रांत तसेच विवाह नोंदणी अधिकारी कार्यालये आहेत. याच विवाह नोंदणी कार्यालयात …

Read More »

शिवसेना नेत्याने वन कर्मचाऱ्याकडून घेतले बदलीसाठी दोन लाख

उद्धव ठाकरे सरकारच्या काळात बदली करुन देण्यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे पुत्र ऋषीकेश खैरे यांनी पैसे घेतले. यासंदर्भात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये समोरची व्यक्ती काम न झाल्याने ऋषीकेश खैरे यांना बदलीसाठी दिलेले 2 लाख रुपये परत मागत आहे. ऋषीकेश खैरे यांनीही हा व्यवहार झाल्याचे मान्य केले. तर संबंधिताचे पैसे परत देण्यात येतील असे म्हटले आहे. वन …

Read More »

नागपुरातील भूमी अभिलेख विभाग भ्रष्टाचाराचा अड्डा : शेतकऱ्यांना अधिकारी देतात त्रास

नागपुरातील भूमी अभिलेख विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. या कार्यालयाने एका सत्तर वर्षीय वृद्धाला जिवंत असताना मृत्यू दाखल्याची मागणी केल्याचे प्रकरण ‘विश्व भारत’ने लावून धरले होते. या विभागाकडे शेतकरी मोठ्या आशेने बघतोय. शेत मोजणी करण्यासाठी अनेक अर्ज कार्यालयात येतात. पण, नागरिकांना नाहक त्रास देऊन प्राप्त अर्ज निकाली न काढण्याची किमया या विभागातील अधिकारी-कर्मचारी करतात. अशा भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर …

Read More »

गडचिरोली-छत्तीसगड सीमेवर गायींची अवैध विक्री : शिंदे लक्ष देणार काय?विखे पाटील ‘महसूल’मध्ये रमले

✍️मोहन कारेमोरे : संपादक✍️ गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथील पेंढरी रस्ता आणि छत्तीसगडच्या सीमेवरील बठेहार या गावातून गायींची बेकायदेशीर खरेदी-विक्री केली जात आहे. याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील लक्ष देतील काय, असा प्रश्न आहे. विखे पाटील यांच्याकडे महसूल खात्याचा पदभार आहे. तर, पशुसंवर्धन खात्याचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे आहे. मात्र, महसूल कडे अधिक लक्ष तर पशुसंवर्धनकडे दुर्लक्ष …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांची बदली : कर्मचाऱ्यांना मागितले पैसे

कर्मचाऱ्यांकडून 1 हजार रुपयांची वर्गणी जमा करण्याचा वादग्रस्त आदेश देणाऱ्या दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आश्विन चंद्रू ए. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून 1 हजार रुपये देण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. गोवा सरकारमधील अव्वर सचिव एहांत सावंत यांनी राज्यपालांच्यावतीने हा आदेश जारी केला आहे. ज्योती कुमारी …

Read More »

नागपुरच्या भूमी अभिलेख कार्यालयाचा पैशासाठी सामान्यांना त्रास : पवार, प्रयागीला निलंबित करा

नागपुरच्या भूमी अभिलेख कार्यालयाने एका सत्तर वर्षीय वृद्धाला जिवंत असताना मृत्यू दाखल्याची मागणी केलीय. प्रकरण असे की, उत्तमराव खराबे नागपुरातील ऑर्डनन्स फॅक्टरीत कार्यरत होते. त्यांना त्यांच्या जमिनीविषयी मोजमाप करून घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी नागपूर तहसील कार्यालय आणि भूमी अभिलेख कार्यालय गाठले. यासाठी भूमी अभिलेख अधिकारी पवार व प्रयागी यांनी त्यांना मृत्यू दाखला घेऊन येण्याचे सांगितले. काही काळ आपल्यासोबत काय होत …

Read More »

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना तहसिलदारांचा दणका

भाजपचे नेहमी चर्चेत असलेले आमदार गोपीचंद पडळकर आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांना मिरज तहसीलदार दगडू कुंभार यांनी चांगलाच दणका दिला आहे. मिरजमधील वादग्रस्त जागेवर संबंधित मिळकतदारांचा हक्क देण्याचा आदेश तहसिलदारांनी मान्य केला आहे. तसेच ब्रम्हानंद पडळकर यांना या निकालाबाबत न्यायालयामध्ये दाद मागण्याचीही मुभा दिली आहे. प्रकरण काय? 7 जानेवारीला मध्यरात्री मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील …

Read More »

‘पीडब्लूडी’च्या कार्यकारी अभियंत्यांचे गडचिरोलीतील रस्त्यांकडे दुर्लक्ष : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील नागरिक त्रस्त

✍️मोहन कारेमोरे सार्वजनिक बाधकाम विभागाचा (पीडब्लूडी) गलथानपणा पुन्हा उघडकीस आला आहे. गडचिरोलीसारख्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिल्ह्यातील रस्ते निकृष्ट बांधकाम करून पीडब्लूडीने नवा चुकीचा पायंडा घालून दिला आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या गढचिरोली जिल्ह्यातील रस्ते पीडब्लूडीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते कामांना स्थगिती उठवून तातडीने मंजुरी द्यावी. जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास कमी होईल. हिवाळी अधिवेशनात …

Read More »

नागपूर आरटीओ रवींद्र भूयारांनी महिला अधिकाऱ्याचा केला लैंगिक छळ : चौकशी सुरु

नागपूर शहर प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्यावर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याने गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी परिवहन आयुक्तांनी महिला तक्रार निवारण समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. रवींद्र भुयारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. तक्रारदार महिलेचे आरोप बिनबुडाचे आहेत. चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीला सामोरे जाणार असून, तिथे बाजू मांडणार …

Read More »

तस्कर दहशतीत : रेती चौकीची जिल्हाधिकाऱ्यांकडून अचानक पाहणी

✍️मोहन कारेमोरे नागपूर जिल्ह्यात अवैध रेती उत्खननाला सध्यातरी बऱ्यापैकी ब्रेक लागला आहे. याचे कारण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विविध भागात सीसीटीव्हीयुक्त 42 रेती तपासणी चौक्या उभारण्यात आल्या आहेत. यामुळे रेती तस्करी करणाऱ्यावर काही प्रमाणात अंकुश लागला आहे. नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी अचानक काही रेती तपासणी चौकीला पहाटे-पहाटे भेटी दिल्याची माहिती आहे. यात मुख्यत्वे नागपूरच्या आसपासचा परिसर आहे. कामठी, मौदा …

Read More »