Breaking News

राज्य

महाराष्ट्राचा चौफेर विकास करणार-फडणवीस

विश्वभारत ऑनलाईन : महाराष्ट्रातील नियोजित फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्यात आला. यामूळे महाराष्ट्रामधील मोठा रोजगार गेला, ही सरकारची खेळी आहे, यावरून राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे शुक्रवारी (दि.16) विरोधकांवर टीका केली. ते म्‍हणाले, महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षात राज्‍याला मागे टाकले आहे, आम्‍ही आता दोन वर्षांत पुढे नेवू,असे फडणवीस म्‍हणाले. आता रोजगार वाढणार पुढील काळात …

Read More »

मुंबई, ठाणेत पहाटेपासूनच मुसळधार!

विश्व भारत ऑनलाईन : मुंबई उपनगर,ठाणे, कल्याण, नवी मुंबई, डोंबिवलीबरोबरच अंबरनाथमध्ये मुसळधार आज शुक्रवारपासून पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेपासून मुंबईसहित अनेक भागांमध्ये पाऊस कोसळत असल्याने रेल्वेची वाहतूक संथ गतीने सुरु आहे. कमी दाबाचा पट्टा सध्या गुजरातवरुन महाराष्ट्राच्या दिशेने अर्थात दक्षिणेकडे मूळ जागेवर सरकत असल्याने मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याचं सांगितलं जात आहे. तर, विदर्भातही काही ठिकाणी ढगाळ वातावरण असेल.अरबी समुद्रातून …

Read More »

शेतकऱ्यांनो सावधान!बोगस सात-बारा ओळखा

विश्व भारत ऑनलाईन : 7/12 उतारा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विषय आहे. मात्र, अलीकडच्या काळात बोगस सातबारा वापरून कर्ज उचलून जमिनीचा व्यवहार केल्याची प्रकरणं अनेकदा समोर येतात. बोगस सातबारा वापरून कर्ज घेतलं आणि नंतर संबंधितांवर गुन्हा दाखल झाल्याची प्रकरणंही महाराष्ट्रात घडली आहेत.2 महिन्यांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात अशीच घटना समोर आली.श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे बुद्रुक गावातील 7 जणांनी संगनमतानं शेतीचे बनावट सातबारा …

Read More »

समृद्धी महामार्गांवर किती लागणार टोल… घ्या जाणून

विश्व भारत ऑनलाईन : मुंबई पुणे एक्प्रेस वे चा प्रवास महाग होणार आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे टोलमध्ये ङोणारी १८ टक्के वाढ. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे मार्गावरच्या टोलमध्ये लवकरच वाड होणार आहे. १ एप्रिल २०२३ पासून या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना जास्त टोल भरावा लागणार आहे. कारण १ एप्रिल २०२३ पासून या टोलमध्ये १८ टक्के वाढ होणार आहे. दर …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबादेत, पैठणला सभा

विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोमवारी औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीनंतर आज दुपारी साडेबारा दरम्यान ते शहरात दाखल होतील. त्यानंतर ते मंत्री संदीपान भुमरे यांचे मतदारसंघ पैठणमध्ये सभा घेतील. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री दुसऱ्यांदा औरंगाबादच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे शिंदे गटाकडून त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. असा कार्यक्रम दुपारी 12 दरम्यान शिंदे हे …

Read More »

निवडणूक,अतिवृष्टीवर आज मंत्रिमंडळ बैठक

मुंबई : शिंदे- फडणवीस सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी 10 वाजता बैठक होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाची बैठक होऊ शकली नाही. आज सकाळच्या सत्रात ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्याच्या नवीन पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने हाहाकार माजवला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर, जमिनीला भेगा पडणे, …

Read More »

‘पीडब्लूडी’त बदल्या पारदर्शक करा, अन्यथा कोर्टात याचिका-मोहन कारेमोरे

नागपूर : शासकीय बदल्या म्हटलं की, आर्थिक व्यवहार आलाच. त्यातच सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्लूडी) बदल्यांचा विषय समोर आल्यास सर्वांच्या भूवया उंचावतात. यंदा बदल्यांमध्ये पारदर्शकता न ठेवल्यास न्यायालयात याचिका दाखल करणार, असा इशारा अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी दिला आहे. एकाच ठिकाणी ठाण मांडून ‘पीडब्लूडी’मध्ये बऱ्याच वर्षांपासून एक अधिकारी एकाच पदावर वर्षांनवर्षे कार्यरत आहेत. तर काही अधिकारी …

Read More »

जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी बेमुदत आंदोलनाच्या तयारीत

विश्व भारत ऑनलाईन : राज्य शासनाच्या सेवेत सन २००५ नंतर रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी 21 सप्टेंबरला राज्यव्यापी रॅलीचे आयोजन केले आहे. तसेच सरकारने वेळीच लक्ष न दिल्यास 17 लाख कर्मचारी बेमुदत आंदोलनाच्या तयारीत आहेत.राजस्थान आणि छत्तीसगढ सरकारने त्यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर महाविकास …

Read More »

राज्यात ‘मुख्यमंत्री किसान योजना’

विश्व भारत ऑनलाईन : राज्यात ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही योजना असेल. या योजनेअंतर्गंत प्रत्येक वर्षी राज्यातील शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. कृषी विभागाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. येत्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत …

Read More »

रेल्वेत नवरात्र, दिवाळीसाठी वेटिंग

विश्व भारत ऑनलाईन : श्रावणपासून उत्सवांची लगबग सुरु झालीय.गणपती, नवरात्र, दिवाळीपर्यंत रेल्वे प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ होते. त्यात यंदा पुणे, मुंबई मार्गावरील अनेक गाड्या रेल्वेच्या विविध कामासाठी रद्द करण्यात आल्या. यामुळे सध्या सुरु गाड्यांमध्ये पंधरा ते वीस दिवसांचे वेटिंग आहे. नवरात्र आणि दिवाळीसाठी प्रवाशांना महिनाभर तिकीट मिळत नसल्याचे दिसत आहे.प्रवाशांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागणार आहे. जादा गाड्यांची मागणी मध्य …

Read More »