वर्धा

कोरोना नियमांचे पालन करूनच नागरिकांनी व्यवहार सुरू ठेवावेत –  पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

Ø  कोविड परिस्थितीचा घेतला आढावा Ø  नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे Ø  लसच आपल्याला तिसऱ्या लाटेपासून वाचवेल.       वर्धा, दि 6 जून (जिमाका):- आपला जिल्हा शासनाने ठरवून दिलेल्या निकषातील तिसऱ्या टप्प्यात येत असल्यामुळे जिल्ह्यात  सर्वच बाबतीत शिथिलता देण्यात आली असली तरी नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून व्यवसाय आणि व्यवहार करणे आवश्यक आहे. अति उत्साहामुळे आपल्या कुटुंबाला आणि जिल्ह्याला आपण पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत घेऊन …

Read More »

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभारली शिवशक राजदंड गुढी , शिवस्वराज्य दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभारली शिवशक राजदंड गुढी शिवस्वराज्य दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा        वर्धा, दि 6 जून (जिमाका):-  महाराष्ट्राच्या जनतेला एका चैत्यन्य सूत्रात बांधून महाराष्ट्राचे सत्व आणि स्वत्व जोपासणाऱ्या राजकीय इतिहासाची पायाभरणी  छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. दीर्घकाळ परकीयांची राजवट आणि अनागोंदी अनुभवणाऱ्या महाराष्ट्राच्या रयतेला स्वातंत्र्य आणि सुबत्ता मिळवून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी …

Read More »

सलग दुसर्‍या दिवशी बाजारपेठेत प्रचंड गर्दी

सलग दुसर्‍या दिवशी बाजारपेठेत प्रचंड गर्दी देवळी, कोरोना निर्बंध पूर्णपणे शिथिल केले असल्याचा गैरसमज होऊन दुसर्‍याही दिवशी देवळीकरांनी बाजारपेठेत प्रचंड गर्दी करीत आपल्या गैर जबाबदारीचे प्रदर्शन केले. नागरिकांसह दुकानदारांनीही कोरोनासंदर्भातील सर्व नियम ढाब्यावर बसवले असून घरातील सर्व साहित्य संपल्यागत बाजारपेठेत गर्दी केली. जिल्हा प्रशासनाने संचारबंदीमध्ये किंचित सवलत दिली. त्याचा गैरफायदा करीत देवळीतील नागरिकांनी सलग दुसर्‍या दिवशीही प्रचंड गर्दी केल्याने प्रशासनाच्या …

Read More »

शाळांनी साहित्य विक्रिचा गोरखधंदा बंद करावा – विदर्भ पालक संघटनेची मागणी

शाळांनी साहित्य विक्रिचा गोरखधंदा बंद करावा   – विदर्भ पालक संघटनेची मागणी नागपूर, शाळांनी विद्यार्थ्यांना पुस्तक, वही आणि इतर शालेय साहित्य विकण्याचा जो गोरखधंदा सुरू केला आहे तो तत्काळ बंद करावा अशी मागणी विदर्भ पालक संघटनेचे अध्यक्ष संदीप अग्रवाल यांनी केली आहे. एका प्रसिद्धी पत्रकात अग्रवाल म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून खाजगी शाळांद्वारे शालेय पुस्तके आणि साहित्यांच्या नावावर पालकांकडून कोट्यवधी …

Read More »

वर्धा:जिल्ह्यात काही प्रमाणात निर्बंध शिथिल जिल्हाधिकारी यांचे नवीन आदेश जारी Ø 1 जून ते 15 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लागू Ø वर्धा, हिंगणघाट व पुलगाव नगरपालिका आणि लगतच्या ग्रामपंचायत मध्ये इतर दुकाने ठरलेल्या दिवशी Ø जिल्ह्यातील इतर ग्रामीण भागात अत्यावश्यक व इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत Ø शनिवार, रविवार औषधी दुकाने वगळता सर्व दुकाने राहणार बंद

वर्धा, दि 31 मे (जिमाका):-  संपुर्ण वर्धा जिल्हयात कोरोना विषाणुचा सकारात्मक दर 10टक्के पेक्षा कमी असल्याने आणि उपलब्ध ऑक्सिजन बेड 40टक्के पेक्षा कमी भरलेले असल्याने जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात काही प्रमाणात  निर्बंध शिथील करण्याचे आदेश दिले आहेत. सदर आदेश 1 जून सकाळी 7  वाजता पासुन 15 जून सकाळी 7 पर्यंत लागू राहतील.           वर्धा नगर पालीका व लगतच्या 11 …

Read More »

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजन:वडनेरसाठी चार हायमास्ट लाइट

वर्धा. जिल्हा प्रतिनिधी:सचिन पोफळी:- कोविड 19 या महामारीत रक्ताची कमतरता भासणार नाही, यासाठी संचारबंदीचे नियम पाळत गुरुवारी 27 मे रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जन्मदिवसानिमित्ताने भाजपा हिंगणघाट तालुका तथा भाजपा युवा मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने गजानन महाराज मंगल कार्यालय वडनेर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटक म्हणून वर्धा -चंद्रपूर- गडचिरोली विधानपरिषद क्षेत्राचे आमदार डॉ. रामदास आंबटकर …

Read More »

पत्रकारांनी केली महसुल विभागाला मदत- चोरट्या वाळूचा पकडला ट्रक

पत्रकारांनी केली महसुल विभागाला मदत     – चोरट्या वाळूचा पकडला ट्रक आर्वी- पत्रकार मोबाईलवर चित्रफित काढून वाळू माफीयापर्यंत पोहचेल अशी व्यवस्था असा आरोप पत्रकारांवर लावण्यात येतो. येथील पत्रकारांनी तो आरोप जीव्हारी लागल्यागत चोरट्या वाळूचा ट्रक पकडून महसुल विभागाला मदत केली. आर्वीत वाळू तस्करीवर चर्चा सुरू असताना वाद निर्माण होऊन पत्रकारांवर आरोप करण्यात आले. येथील पत्रकारांनी हा आरोप खोडुन काढण्याकरिता …

Read More »

वर्ध्यात वादळ, समुद्रपूर-पुलगावात पाऊस

वर्धा, जिल्ह्यात आज रविवारी दिवसभर कडाक्याचे उन्ह तापले. सायंकाळच्या सुमारास सर्वत्र ढग दाटून आले असले तरी काही भागात फक्त वादळ, काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी तर समुद्रपूर व पुलगाव येथे जोरदार पाऊस झाला. वर्ध्यात 4 वाजताच्या सुमारास सरी आल्या तर रात्रीपर्यंत फक्त वादळ होते. समुद्रपूर : परिसरात सायंकाळी 4.30 च्या दरम्यान जोराच्या वार्‍यासह रोहिणी नक्षत्राच्या पहिल्या पाऊस झाला. त्यामुळे वातावरणातील …

Read More »

नागरिकांना करता येणार अवैध रेती, गौण खनिज उत्खनन व साठयाची ऑनलाईन तक्रार

नागरिकांना करता येणार अवैध रेती, गौण खनिज उत्खनन व साठयाची ऑनलाईन तक्रार Ø तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.  वर्धा,  (जिमाका):-    जिल्हयातील रेती घाटामधुन अवैधरित्या रेतीचे व इतर गौण खनिजाचे उत्खनन, वाहतुक व साठा करवून ठेवल्याच्या तक्रारी वृत्तपत्रातून तसेच  नागरिकांकडून दूरध्वनी व्दारे प्राप्त होत आहे. सदर तक्रारी पुराव्यानिशी सादर करण्यासाठी  जिल्हा प्रशासनाच्या वतीन लिंक तयार करण्यात आली असून नागरिकांना https://forms.gle/5zMnmk73XxStm3Td8 या लिंक वर …

Read More »

जिल्हाधिकारी यांनी केली आर्वी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी तिसऱ्या लाटेच्या नियोजनसंदर्भात दिल्या सूचना वर्धा, दि 29 (जिमाका):- कोविड 19 संदर्भात तिसऱ्या लाटेच्या नियोजनासाठी अधिक खाटांची गरज लक्षात घेता आर्वी उपजिल्हा रुग्णालयातील जुनी लेबर रुम व स्वयंपाक खोली इतरत्र हलवून त्या ठिकाणी ऑक्सिजन बेड वाढविण्यात यावे,अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या पाहणी दरम्यान केल्यात. केंद्रीभूत प्राणवायू प्रणालीची पाहणी करुन वार्डात पुरविण्यात येत असलेल्या ऑक्सिजनची त्यांनी माहिती घेतली तसेच ऑक्सिजन प्रकल्पाच्या नियोजीत जागेची पहाणी करुन प्रकल्प लवकर उभारणीबाबत निर्देश दिलेत. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सचिन तडस, उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, आर्वीचे तहसीलदार विद्याधर चव्हाण, आर्वी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ एम बी सुटे उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी प्रथम रुग्णालयीन कामकाज व कोव्हीड १९ बाबतचा आढावा घेऊन संपूर्ण रुग्णालयाची पहाणी केली. कोरोणाच्या तिस-या लाटेसबंधीत नियोजन करुन अमंलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी रुग्णालयाच्या मागील परिसराची पहाणी करतांना त्यांनी रुग्णालयीन परिसरातील नालीची संपूर्ण कामे तात्काळ प्रभावाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात. तसेच प्रयोग शाळा लहान असून त्याचे विस्तारीकरण करण्याच्या सूचनाही दिल्यात. यावेळी त्यांनी रुग्णालयातील कोव्हीड वार्ड व इतर वार्डाची पहाणी करून रुग्णाशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली.

जिल्हाधिकारी यांनी केली आर्वी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी तिसऱ्या लाटेच्या नियोजनसंदर्भात दिल्या सूचना      वर्धा, दि 29 (जिमाका):-  कोविड 19 संदर्भात तिसऱ्या लाटेच्या नियोजनासाठी अधिक खाटांची गरज लक्षात घेता आर्वी उपजिल्हा रुग्णालयातील जुनी लेबर रुम व स्वयंपाक खोली  इतरत्र हलवून त्या ठिकाणी ऑक्सिजन बेड वाढविण्यात यावे,अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या पाहणी दरम्यान केल्यात. केंद्रीभूत प्राणवायू प्रणालीची पाहणी करुन वार्डात …

Read More »