वर्धा. जिल्हा प्रतिनिधी:सचिन पोफळी:-
कोविड 19 या महामारीत रक्ताची कमतरता भासणार नाही, यासाठी संचारबंदीचे नियम पाळत गुरुवारी 27 मे रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जन्मदिवसानिमित्ताने भाजपा हिंगणघाट तालुका तथा भाजपा युवा मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने गजानन महाराज मंगल कार्यालय वडनेर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटक म्हणून वर्धा -चंद्रपूर- गडचिरोली विधानपरिषद क्षेत्राचे आमदार डॉ. रामदास आंबटकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार समीर कुणावार यांची उपस्थिती होती. तसेच हिंगणघाट पंचायत समितीच्या सभापती शारदाताई आंबटकर, वडनेर जि.प. सदस्या ज्योत्स्नाताई सरोदे, माजी शिक्षण व आरोग्य सभापती वसंतराव आंबटकर, प.स.सदस्य गंगाधरराव कोल्हे, तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे, सरचिटणीस तुषार आंबटकर, सरचिटणीस भाग्येश देशमुख, विनोद विटाळे, विनोद राऊत, नगरसेविका छायाताई सातपुते, भा.ज.यु.मो.अध्यक्ष विक्रमसिंह बेनिवार, ग्रा.पं. सदस्य बनराव आंबटकर,ग्रा.पं.सदस्य अनिल येळणे, सुनील सरोदे, संदीप भोरे, योगेश पोहाणे आदींची उपस्थिती होती. या शिबिरात मोठ्या प्रमाणात युवकांनी सहभाग घेऊन रक्तदान केले.
000000000
वडनेरसाठी चार हायमास्ट लाइट
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून मतदारसंघातील वडनेर गावासाठी डॉ. रामदास आंबटकर यांच्या स्थानिक विकास निधीतून चार हायमास्ट लाईट मंजूर करण्यात आले. त्यात क्रमशः बाजार चौक, बस स्टॉप, भवानी माता मंदिर व तुकडोजी महाराज चौकाचे उदघाटन केले. याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजन:वडनेरसाठी चार हायमास्ट लाइट
Advertisements
Advertisements
Advertisements