Breaking News

प्रादेशिक

वर्धा-देवळी मार्गावर अपघात : 12 गंभीर

  विश्व भारत ऑनलाईन : वर्धा जिल्ह्यातील देवळी मार्गावर भीषण अपघात झालाय. मजूरांना घेवून जाणाऱ्या एका वाहनाला भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. अपघातात मालवाहू वाहनातील चालकासह १० महिला जखमी झाल्या. तर कारमधील दोन जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जखमींना सावंगी रुग्णालयात दाखल केले. सालोड हिरापूर येथील विजय दाते शेतीच्या कामासाठी निघाले …

Read More »

गोंदिया : 120 विद्यार्थ्यांना जनावरासारखे कोंबले, 10 मुलांची प्रकृती बिघडली

विश्व भारत ऑनलाईन : गोंदिया जिल्ह्यात आदिवासी शाळेतील 120 मुला-मुलींना एकाच ट्रकमध्ये कोंबून प्रवास करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळा प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे जवळपास दहा विद्यार्थी-विद्यार्थींनीची प्रकृती बिघडली आहे. गाडीत श्वास घ्यायला जागा मिळत नसल्याने काही विद्यार्थी-विद्यार्थींनी बेशुद्ध झाल्या. अखेर गाडीत मोठा गोंधळ उडाल्यानंतर गाडी थेट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिशेला वळवण्यात आली. देवरीचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राचलवार …

Read More »

अमरावती : स्त्री रुग्णालयात आग, बालकांची प्रकृती गंभीर 

  विश्व भारत ऑनलाईन : अमरावती जिल्हा स्री रुग्णालयात बेबी केअर सेंटरला शॉर्टसर्किटमुळे आज रविवारी अचानक आग लागली. अग्निशमन दलाने दोन बंबाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली. बालकांना सुरक्षितपणे हलवण्यात आले. धुरामुळे काही बालकांची प्रकृती गंभीर बनली आहे. त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. दोन मुलांना डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी लहान बाळांची …

Read More »

नागपूर मार्गांवरील 18 रेल्वे रद्द : नेमके कारण काय?

विश्व भारत ऑनलाईन : चौथ्‍या रेल्‍वे लाईनचे काम सुरू असल्याने अनेक गाड्या रद्द होत आहेत. याच चौथ्‍या लाईनच्‍या कामामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या १८ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.रेल्‍वे प्रशासनाकडून पश्चिम बंगालमधील बिलासपूर विभागात सुरू असलेले चौथ्या रेल्वे मार्गाचे काम अद्याप सुरूच आहे. या कामासाठी मागील दोन महिन्यांत तीन वेळा गाड्या रद्द करण्यात आल्या. आता पुन्हा जळगाव रेल्वे मार्गाच्या कामासाठी …

Read More »

वीज कोसळली, विद्यार्थीनी जखमी

विश्व भारत ऑनलाईन : भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील सोनी या गावात शाळेच्या मैदानावर वीज कोसळून दोन विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाल्या. वैष्णवी अरविंद वावरे (वय 15, रा. मेंढा) आणि आचल तेजराम वाघधरे (वय 15 रा. इंदोरा) ता. लाखांदूर अशी जखमी विद्यार्थीनींची नावे जखमींवर लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Read More »

धक्कादायक : दोर तुटला आणि ‘ती’ बचावली.. वाचा कुठे घडली घटना

सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी विवाहितेला फासावर लटकवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथे हा प्रकार उघडकीस आला.नशीब बलवत्तर होते म्हणून फाशीचा दोर तुटल्याने विवाहिता बचावली.मागच्या दाराने पळ काढत तिने कसेबसे बसस्थानक गाठत आपला जीव वाचला. तिने बहिणीला आपबिती सांगितल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. यावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांनी सासू, सासरे व दीर वेगळे राहू …

Read More »

आठ हजार विद्यार्थ्यांचे गडकरींना पत्र, यवतमाळ-अमरावती रस्त्याची दैनावस्था

विश्व भारत ऑनलाईन : रस्ते म्हटलं की, नितीन गडकरी यांचे नाव ओठांवर येतेच. अनेक महामार्ग तयार करणारे गडकरी ‘रोडकरी’म्हणूनही ओळखले जातात. तरीही काही रस्त्यांची डागडुजी अजून झालेली नाही. यवतमाळ-अमरावती रस्त्यांवर खड्यांमुळे सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातामध्ये पुढील क्रमांक आपला तर नाही ना? अशी भीती येथील विद्यार्थ्यांना सतावत आहे. यासाठीच यवतमाळ-अमरावती जिल्ह्यातील तब्बल आठ हजार विद्यार्थ्यांनी थेट केंद्रीय परिवहन …

Read More »

अमरावती : पंचशील आश्रमशाळेतील 33 मुलींची प्रकृती बिघडली

विश्व भारत ऑनलाईन : बहिरम येथील पंचशील आश्रमशाळेतील ३३ मुलींना शुक्रवारी रात्री उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकारमुळे एकच खळबळ उडाली. एका मुलीला अमरावती येथे पुढील उपचारासाठी हलविले. तर ८ मुलींना घरी सोडण्यात आले आहे. इतर सर्व मुलींची प्रकृती स्थिर असून डॉक्टर मुलींच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. आश्रम शाळेतील ३ ते ४ मुलींना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. …

Read More »

राज ठाकरे रविवारपासून नागपूर, चंद्रपूर, अमरावती दौऱ्यावर

विश्व भारत ऑनलाईन : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे उद्या रविवार 18 सप्टेंबरपासून विदर्भाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आगमन होणार आहे. विदर्भ एक्सप्रेसने मुंबईहुन रवाना झाले असून, उद्या सकाळी 8.30 वाजता त्यांचे नागपुरातील मुख्य रेल्वेस्थानकावर आगमन होईल. त्यानंतर रविभवन येथे कार्यकर्त्यांच्या बैठका घेतील. 15 वर्षांनंतर विदर्भात ठाकरे हे सुमारे 15 वर्षांनंतर विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर 2005 मध्ये राज …

Read More »

शेतकऱ्यांनो सावधान!बोगस सात-बारा ओळखा

विश्व भारत ऑनलाईन : 7/12 उतारा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विषय आहे. मात्र, अलीकडच्या काळात बोगस सातबारा वापरून कर्ज उचलून जमिनीचा व्यवहार केल्याची प्रकरणं अनेकदा समोर येतात. बोगस सातबारा वापरून कर्ज घेतलं आणि नंतर संबंधितांवर गुन्हा दाखल झाल्याची प्रकरणंही महाराष्ट्रात घडली आहेत.2 महिन्यांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात अशीच घटना समोर आली.श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे बुद्रुक गावातील 7 जणांनी संगनमतानं शेतीचे बनावट सातबारा …

Read More »