Breaking News

प्रादेशिक

लोणारकडे दुर्लक्ष : विभागीय आयुक्त हाजीर हो…!-हायकोर्ट

बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या जतन, संवर्धन व विकासाबाबत कर्तव्य बजावण्यात उदासिनता दाखवल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अमरावतीच्या विभागीय आयुक्तांना २१ डिसेंबरला न्यायालयात समक्ष हजर राहण्याचा समन्स बजावला आहे. रामसर पाणथळ स्थळाचा दर्जा मिळालेल्या लोणार सरोवरात वैज्ञानिकदृष्ट्या संशोधनाला भरपूर वाव असून जगभरातून संशोधक व पर्यटक येथे मोठ्या संख्येने भेट देतात. या सरोवराच्या जतन, संवर्धन व विकासाबाबत दिरंगाई होत असल्याविषयीची …

Read More »

चंद्रपूर : ताडोबात एक वाघिण,दोन वाघांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्याच्या बफरझोनमधील शिवनी व मोहरली वनपरिक्षेत्रात एक वाघ व एका बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. बुधवारी एका वाघीणचा मृत्यू झाला होता. वनविभागाचे अधिकारी , कर्मचारी गस्त घालत असताना मृतावस्थेत वाघ व बछडा आढळून आले. ताडोबाच्या बफर झोनमधील शिवनी वनपरिक्षेत्रांतर्गत वाघाचा मृतदेह आढळून आला. त्याचा मृत्यू सुमारे २०-२५ दिवसापूर्वी झाला असावा, असा अंदाज आहे. मृतावस्थेतील वाघ खूप …

Read More »

शिव भोजन थाळीचे बील काढण्यासाठी 80 हजाराची लाच : लाचलूचपतच्या पोलीस निरीक्षकही जाळ्यात

✳️पहिली घटना शिवभोजन थाळीचे थकीत देयक काढण्यासाठी 80 हजाराची लाच घेताना वाशिम येथील पुरवठा निरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. निलेश विठ्ठल राठोड असे पुरवठा निरीक्षकाचे नाव आहे. ही कारवाई अमरावती लाचलूचपत विभागाने केली. ✳️दुसरी घटना नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या मीना बकाल आणि त्यांचे पती कुलभूषण बावस्कर या दोघांना 60 हजारांची लाच घेताना अटक करण्यात …

Read More »

गडचिरोली : भूकंपाचे धक्के

विश्व भारत ऑनलाईन : गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात शुक्रवारी मध्यरात्री १२.४५ वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू सिरोंचा तालुक्यातील उमानूर ते झिंगानूर परिसरात असून तीव्रता ३.८ रिश्टर स्केल इतकी होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू उमानूर आणि झींगानूरमधील टेकडी परिसरात असल्याचा अंदाज आहे. हा परिसर तेलंगणा राज्याला लागून असल्याने तेथेही काही ठिकाणी सौम्य धक्के जाणवले …

Read More »

817 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, 260 मदतीपासून दूर

विश्व भारत ऑनलाईन : जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत झालेल्या ८१७ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये ३७९ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत, तर २६० प्रकरणे ही अपात्र ठरविण्यात आली आहेत. १७८ प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे. याच कालावधीत सर्वाधिक २३२ शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत. त्याखालोखाल यवतमाळ जिल्ह्यात २१८, बुलढाणा जिल्ह्यात १८५, अकोल्यात १०१ तर वाशीम जिल्ह्यात ८१ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली …

Read More »

शिंदे गटाचा आमदार भाजपच्या कार्यक्रमात, फडणवीस यांची स्तुती

विश्व भारत ऑनलाईन : शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. पण, आता शिंदे गटातीलच आमदाराने भाजपचे दिग्गज नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार भाजपमध्ये दाखल होणार का, अशी चर्चा रंगली आहे. भंडाऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचा कार्यकर्ता मेळावा होत आहे. या मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे …

Read More »

भंडारा : धान घोटाळा करणाऱ्यावर कारवाई-फडणवीस

विश्व भारत ऑनलाईन : भंडारा जिल्ह्यात धान खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. जे पैसे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होते, ते काही धनदांडग्यांनी मिळून लाटले. असे प्रकार खपवून घेतले जाणार नसून दोषीवर कडक कारवाई करू, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता ते बोलत होते. जिल्ह्यात धान घोटाळा झाला आहे. बोगस माल एफसीआयला देण्यात आला. शेतकऱ्यांचीही फसवणूक …

Read More »

अतिक्रमण – वनविभागाचा दबाव ? : शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

विश्व भारत ऑनलाईन : गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील 60 वर्षीय शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेतकरी गंभीर आहे.गोजोली येथील गणपती सोनूने हे वनविभागाच्या जागेवर १९८४ पासून शेती करित आहेत. सोनूने यांच्यासोबत अनेकांनी वनजमिनीचे पटटे मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला आहे. सोनूने कुटुंबियांच्या सांगण्यावरून शनिवारी (ता. १) वनअधिकारी व …

Read More »

भंडारा : वाघाने घेतला दुसरा बळी

  विश्व भारत ऑनलाईन : आठवड्याभरापूर्वी मासेमारी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला वाघाने ठार केल्याच्या घटना ताजी असतानाच पुन्हा त्याच वाघाने पिकांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर हल्ला करुन ठार केले आहे. लाखांदूर तालुक्यातील कन्हाळगाव शिवारात घडलेल्या या घटनेमुळे मानव-वन्यजीव संघर्षाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. तेजराम बकाराम कार ( वय ४५, रा. कन्हाळगाव, ता. लाखांदूर) असे वाघाच्या हल्ल्यात मूत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव …

Read More »

गडचिरोली : नागरिकांनी जाळले तब्ब्ल १० ट्रक… कारण काय?

  विश्व भारत ऑनलाईन : सुरजागड डोंगरावरुन लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी रस्त्याने जाणाऱ्या जवळपास ८ ते १० टिप्पर आणि ट्रकना आग लावली. ही घटना मंगळवारी (दि.२७) संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास आष्टी-आलापल्ली मार्गावरील शांतीग्राम गावाजवळ घडली. मुलचेरा तालुक्यातील कांचनपूर येथील सुभाष जयदार हे मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास पत्नीसह मोटारसायकलने गावाकडे जात …

Read More »