Breaking News

प्रादेशिक

शेतकऱ्यांनो सावधान!बोगस सात-बारा ओळखा

विश्व भारत ऑनलाईन : 7/12 उतारा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विषय आहे. मात्र, अलीकडच्या काळात बोगस सातबारा वापरून कर्ज उचलून जमिनीचा व्यवहार केल्याची प्रकरणं अनेकदा समोर येतात. बोगस सातबारा वापरून कर्ज घेतलं आणि नंतर संबंधितांवर गुन्हा दाखल झाल्याची प्रकरणंही महाराष्ट्रात घडली आहेत.2 महिन्यांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात अशीच घटना समोर आली.श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे बुद्रुक गावातील 7 जणांनी संगनमतानं शेतीचे बनावट सातबारा …

Read More »

गडचिरोली : पर्लकोटा नदीला पूर, भामरागडचा संपर्क तुटला

विश्व भारत ऑनलाईन : अतिवृष्टीमुळे पर्लकोटा नदीला पूर आल्याने जिल्ह्याचे शेवटचे टोक भामरागड शहराचा जिल्हा मुख्यालयापासून संपर्क तुटला आहे. संपूर्ण जिल्ह्यात मागील 48 तासांपासून पूरस्थिती निर्माण झाली असून ८ मार्ग बंद झाले आहेत. बंद मार्ग गडचिरोली-गुरवाळा, माडेमुल-रनमुल,चांदाळा-कुंभी,धानोरा-सोडे,पेंढरी-पाखांजुर,साखरा-कारवाफा,लाहेरी-बिनागुंडा,आलापल्ली -ताडगांव-भामरागड. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यभर अतिवृष्टी होत असल्याने पूरस्थिती निर्माण होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही रविवारपासून सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गोदावरी, प्राणहिता …

Read More »

‘पीडब्लूडी’त बदल्या पारदर्शक करा, अन्यथा कोर्टात याचिका-मोहन कारेमोरे

नागपूर : शासकीय बदल्या म्हटलं की, आर्थिक व्यवहार आलाच. त्यातच सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्लूडी) बदल्यांचा विषय समोर आल्यास सर्वांच्या भूवया उंचावतात. यंदा बदल्यांमध्ये पारदर्शकता न ठेवल्यास न्यायालयात याचिका दाखल करणार, असा इशारा अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी दिला आहे. एकाच ठिकाणी ठाण मांडून ‘पीडब्लूडी’मध्ये बऱ्याच वर्षांपासून एक अधिकारी एकाच पदावर वर्षांनवर्षे कार्यरत आहेत. तर काही अधिकारी …

Read More »

गडचिरोलीत वाघाचा हल्ला, एक ठार

गडचिरोली : गडचिरोलीपासून १५ किलोमीटर अंतरावरील कळमटोला येथे आज शुक्रवार दुपारी अडीच वाजताच्या सुमारास कृष्णा महागु ढोणे (वय ६५) यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. कृष्णा महागु ढोणे शेळ्या चारण्यासाठी कक्ष क्र 415/p येथे गेले असता वाघाने अचानक हल्ला केला. त्यांना काही अंतरावर ओढत नेऊन ठार केले. परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले असून वाघाचा बंदोबस्त करुन ठार झालेल्या ढोणे कुटुंबाला तात्काळ …

Read More »

गणपती विसर्जन,तिघांचा मृत्यू

वर्धा : गणेश विसर्जनासाठी डोहावर गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज वर्धेलगतच्या मांडवा गावात घडली. कार्तिक तुळशीराम बलवीर (९), अथर्व सचिन वंजारी (१४) व संदीप ज्ञानेश्वर चव्हाण (३५), अशी मृतांची नावे आहेत. धुमधडाक्यात मिरवणुका निघाल्या. गावोगावी हीच स्थिती आहे. मांडवा गावातून काही जण विसर्जनासाठी निघाले. कालवा खोलीकरणासाठी झालेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्याचे ठरले. अल्पवयीन …

Read More »

गोंदियाऐवजी नागपुरातून सुटेल विदर्भ, महाराष्ट्र एक्सप्रेस

नागपूर : छत्तीसगडमधील राजनांदगाव ते कळमना रेल्वेमार्गाचे काम सुरू असल्याने काही दिवस नागपूरमार्गे अनेक गाड्या रद्द असणार आहेत. तर,विदर्भ एक्स्प्रेस सोमवारी नागपूरहून सुटेल आणि महाराष्ट्र एक्सप्रेस नागपूरपर्यंतच धावणार आहे.30 ऑगस्टपासून रेल्वेमार्गाचे काम सुरू असल्याने हावडा मार्गावरील अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. गोंदिया-सीएसएमटी विदर्भ एक्सप्रेस सोमवारी आणि गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस मंगळवारी गोंदिया ऐवजी नागपूरहून सुटेल. रद्द केलेल्या रेल्वे शालीमार-एलटीटी ज्ञानेश्वरी एक्सप्रेस, …

Read More »

शेतकऱ्यांसमोर ‘ई-पीक’ची डोकेदुखी 

नागपूर : शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली ई-पीक पेरा योजना शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. महसूल, कृषी विभागाची जबाबदारी असताना या योजनेची कामे शेतकऱ्यांनी करावी, असा आग्रह केला जातोय, असा दावा शेतकरी संघटना व विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे.अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तहसीलदारांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. गत वर्षीपासून ई -पीक पेरा नोंदणी योजना सुरु केली. योजनेला अल्प प्रतिसाद मिळत असला तरी …

Read More »

विदर्भ, मराठवाड्यात पाऊस सक्रिय

विश्व भारत ऑनलाईन : पुढील ३ दिवस राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात यलो अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र काल पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. राज्यात मुंबई, नागपूर, अमरावती,पुणे, अकोला, कोल्हापूर जिल्ह्यातील परिसरात पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने आज विदर्भात यलो अलर्ट दिला आहे. …

Read More »

माहेरवाशीण गौराईंचे आगमन

अमरावती : ‘आली आली गौराई, सोन्यारूनप्याच्या पावलानं, आली आली गौराई, धनधान्याच्या पावलानं,’ शनिवारी सोनपावलांनी माहेरवाशीण ज्येष्ठा गौरींचे आगमन होणार आहे.गौरींच्या स्वागतासाठी महिला मंडळी सज्ज झाल्याचे दिसतेय. मुहूर्त कोणता? गणपती मांगल्याचे, तर महालक्ष्मी समृद्धीचे प्रतिक आहे.तिच्या प्रतिष्ठापनेनंतर घराघरामध्ये मांगल्य, सुख, समृद्धी, आनंद टिकून राहतो, अशी भाविकांची भावना आहे. माहेरवाशीण असलेल्या गौराई अनेक ठिकाणी पिढ्यापिढ्या बसवल्या जातात, तर काही ठिकाणी हौस म्हणून, …

Read More »

अमरावती शहरात आढळले बिबट्याचे बछडे

अमरावती : शहरातील महादेव खोरी नजीकच्या जंगलात गुरुवारी दुपारी बिबट्याचे दोन बछडे दिसले. त्यानंतर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बछड्यांना वनविभागाच्या पथकाने सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. त्यांना वडाळी येथील वन उद्यानात ठेवण्यात आले आहे. महादेव खोरी परिसरात यापूर्वीही बिबट्याचा वावर दिसून आला आहे. जवळ असलेल्या पोहरा-मालखेडच्या जंगलाचा हा भाग असल्याचे कळते. तर, बछडे दिसल्यानंतर लोकांनी आरडाओरड केल्याने बिबट मादी पळून गेली. …

Read More »