विश्व भारत ऑनलाईन : भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील सोनी या गावात शाळेच्या मैदानावर वीज कोसळून दोन विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाल्या. वैष्णवी अरविंद वावरे (वय 15, रा. मेंढा) आणि आचल तेजराम वाघधरे (वय 15 रा. इंदोरा) ता. लाखांदूर अशी जखमी विद्यार्थीनींची नावे जखमींवर लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू
Read More »धक्कादायक : दोर तुटला आणि ‘ती’ बचावली.. वाचा कुठे घडली घटना
सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी विवाहितेला फासावर लटकवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथे हा प्रकार उघडकीस आला.नशीब बलवत्तर होते म्हणून फाशीचा दोर तुटल्याने विवाहिता बचावली.मागच्या दाराने पळ काढत तिने कसेबसे बसस्थानक गाठत आपला जीव वाचला. तिने बहिणीला आपबिती सांगितल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. यावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांनी सासू, सासरे व दीर वेगळे राहू …
Read More »आठ हजार विद्यार्थ्यांचे गडकरींना पत्र, यवतमाळ-अमरावती रस्त्याची दैनावस्था
विश्व भारत ऑनलाईन : रस्ते म्हटलं की, नितीन गडकरी यांचे नाव ओठांवर येतेच. अनेक महामार्ग तयार करणारे गडकरी ‘रोडकरी’म्हणूनही ओळखले जातात. तरीही काही रस्त्यांची डागडुजी अजून झालेली नाही. यवतमाळ-अमरावती रस्त्यांवर खड्यांमुळे सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातामध्ये पुढील क्रमांक आपला तर नाही ना? अशी भीती येथील विद्यार्थ्यांना सतावत आहे. यासाठीच यवतमाळ-अमरावती जिल्ह्यातील तब्बल आठ हजार विद्यार्थ्यांनी थेट केंद्रीय परिवहन …
Read More »अमरावती : पंचशील आश्रमशाळेतील 33 मुलींची प्रकृती बिघडली
विश्व भारत ऑनलाईन : बहिरम येथील पंचशील आश्रमशाळेतील ३३ मुलींना शुक्रवारी रात्री उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकारमुळे एकच खळबळ उडाली. एका मुलीला अमरावती येथे पुढील उपचारासाठी हलविले. तर ८ मुलींना घरी सोडण्यात आले आहे. इतर सर्व मुलींची प्रकृती स्थिर असून डॉक्टर मुलींच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. आश्रम शाळेतील ३ ते ४ मुलींना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. …
Read More »राज ठाकरे रविवारपासून नागपूर, चंद्रपूर, अमरावती दौऱ्यावर
विश्व भारत ऑनलाईन : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे उद्या रविवार 18 सप्टेंबरपासून विदर्भाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आगमन होणार आहे. विदर्भ एक्सप्रेसने मुंबईहुन रवाना झाले असून, उद्या सकाळी 8.30 वाजता त्यांचे नागपुरातील मुख्य रेल्वेस्थानकावर आगमन होईल. त्यानंतर रविभवन येथे कार्यकर्त्यांच्या बैठका घेतील. 15 वर्षांनंतर विदर्भात ठाकरे हे सुमारे 15 वर्षांनंतर विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर 2005 मध्ये राज …
Read More »शेतकऱ्यांनो सावधान!बोगस सात-बारा ओळखा
विश्व भारत ऑनलाईन : 7/12 उतारा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विषय आहे. मात्र, अलीकडच्या काळात बोगस सातबारा वापरून कर्ज उचलून जमिनीचा व्यवहार केल्याची प्रकरणं अनेकदा समोर येतात. बोगस सातबारा वापरून कर्ज घेतलं आणि नंतर संबंधितांवर गुन्हा दाखल झाल्याची प्रकरणंही महाराष्ट्रात घडली आहेत.2 महिन्यांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात अशीच घटना समोर आली.श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे बुद्रुक गावातील 7 जणांनी संगनमतानं शेतीचे बनावट सातबारा …
Read More »गडचिरोली : पर्लकोटा नदीला पूर, भामरागडचा संपर्क तुटला
विश्व भारत ऑनलाईन : अतिवृष्टीमुळे पर्लकोटा नदीला पूर आल्याने जिल्ह्याचे शेवटचे टोक भामरागड शहराचा जिल्हा मुख्यालयापासून संपर्क तुटला आहे. संपूर्ण जिल्ह्यात मागील 48 तासांपासून पूरस्थिती निर्माण झाली असून ८ मार्ग बंद झाले आहेत. बंद मार्ग गडचिरोली-गुरवाळा, माडेमुल-रनमुल,चांदाळा-कुंभी,धानोरा-सोडे,पेंढरी-पाखांजुर,साखरा-कारवाफा,लाहेरी-बिनागुंडा,आलापल्ली -ताडगांव-भामरागड. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यभर अतिवृष्टी होत असल्याने पूरस्थिती निर्माण होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही रविवारपासून सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गोदावरी, प्राणहिता …
Read More »‘पीडब्लूडी’त बदल्या पारदर्शक करा, अन्यथा कोर्टात याचिका-मोहन कारेमोरे
नागपूर : शासकीय बदल्या म्हटलं की, आर्थिक व्यवहार आलाच. त्यातच सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्लूडी) बदल्यांचा विषय समोर आल्यास सर्वांच्या भूवया उंचावतात. यंदा बदल्यांमध्ये पारदर्शकता न ठेवल्यास न्यायालयात याचिका दाखल करणार, असा इशारा अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी दिला आहे. एकाच ठिकाणी ठाण मांडून ‘पीडब्लूडी’मध्ये बऱ्याच वर्षांपासून एक अधिकारी एकाच पदावर वर्षांनवर्षे कार्यरत आहेत. तर काही अधिकारी …
Read More »गडचिरोलीत वाघाचा हल्ला, एक ठार
गडचिरोली : गडचिरोलीपासून १५ किलोमीटर अंतरावरील कळमटोला येथे आज शुक्रवार दुपारी अडीच वाजताच्या सुमारास कृष्णा महागु ढोणे (वय ६५) यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. कृष्णा महागु ढोणे शेळ्या चारण्यासाठी कक्ष क्र 415/p येथे गेले असता वाघाने अचानक हल्ला केला. त्यांना काही अंतरावर ओढत नेऊन ठार केले. परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले असून वाघाचा बंदोबस्त करुन ठार झालेल्या ढोणे कुटुंबाला तात्काळ …
Read More »गणपती विसर्जन,तिघांचा मृत्यू
वर्धा : गणेश विसर्जनासाठी डोहावर गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज वर्धेलगतच्या मांडवा गावात घडली. कार्तिक तुळशीराम बलवीर (९), अथर्व सचिन वंजारी (१४) व संदीप ज्ञानेश्वर चव्हाण (३५), अशी मृतांची नावे आहेत. धुमधडाक्यात मिरवणुका निघाल्या. गावोगावी हीच स्थिती आहे. मांडवा गावातून काही जण विसर्जनासाठी निघाले. कालवा खोलीकरणासाठी झालेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्याचे ठरले. अल्पवयीन …
Read More »