तुम्ही शासकीय नोकरीवर आहात आणि तुम्हाला संगणक टायपिंग येत नसेल तर बातमी तुमच्या कामाची आहे. राज्यातील विविध विभागातील लिपिकांना टायपिंग येत नसल्याचे दिसून आले आहे. अशांची वेतनवाढ रोखण्यात येणार आहे.
मराठी आणि इंग्रजी टायपिंग येणे आवश्यक आहे. या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी निर्णय काढले आहेत.इंग्रजी टायपिंगचे प्रमाणपत्र असेल तर त्या लिपिकाला नियुक्ती दिनांकापासून 4 वर्षात मराठी टायपिंगचे किमान 30 शब्द प्रती मिनिट वेगाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे.