Breaking News

सात जणांना जन्मठेपेची शिक्षा : तुमसरातील (भंडारा) सोनी हत्याकांड

Advertisements

राज्याला हादरवून सोडणार्‍या भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील सोनी हत्याकांडात दोषी सर्व सात आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने आज ( दि. ११) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या हत्याकांडाच्या नऊ वर्षांनतर हा निकाल देण्यात आला आहे. शहानवाज उर्फ बाबू शेख, महेश आगाशे, सलीम पठाण, राहुल पडोळे, सोहेल शेख, रफिक शेख, केसरी ढोले अशी शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत.

Advertisements

खून करून साडेतीन कोटी लंपास

Advertisements

२६ फेब्रुवारी २०१४ च्या मध्यरात्री तुमसर येथील प्रतिष्ठित सोनेचांदीचे व्यापारी संजय रानपुरा (सोनी), त्यांची पत्नी पूनम आणि मुलगा द्रुमिल यांचा गळा आवळून निर्घृण खून करण्यात आला होता. आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी तिघांच्याही मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्या घरातून ८ किलो ३०० ग्रॅम किलो सोने, ३४५ ग्रॅम चांदी आणि रोख ३९ लाख रुपये असा एकंदरीत साडेतीन कोटींचा ऐवज पळवून नेला होता.

घटना उघडकीस आल्याच्या २४ तासात सर्व सात आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. या घटनेमुळे जनक्षोभ मोठ्या प्रमाणात वाढला होता. शासनाने या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांची नेमणूक केली होती. सोमवारी (ता.१०) जिल्हा न्यायालयाने सात आरोपींवर आरोप निश्चित केले. आज मंगळवारी दुपारी तीन वाजता भंडारा जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश अस्मर यांनी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील भाजप आमदार कृष्णा खोपडेंची फसवणूक

भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांची एका ठकबाजाने आर्थिक फसवणूक केली. आरोपीने दिलेल्या खोट्या माहितीवर विश्वास …

नागपुरात वकील महिलेने मागितली लाखांची खंडणी

कार्यालयात देहव्यापाराचा अड्डा सुरू केल्याप्रकरणी ‘लॉकअप’मध्ये बंद असलेल्या आरोपीच्या पत्नीकडून तोतया महिला वकिलाने वरिष्ठ पोलीस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *