Breaking News

अभिनेत्री पूनम पांडेचं ‘सर्व्हीकल कॅन्सर’मुळे निधन! गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी डॉक्टर काय म्हणाले?

Advertisements

अभिनेत्री पूनम पांडेच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलने ३२ व्या वर्षी निधन झाल्याचे जाहीर केले. निवेदनात तिच्या मृत्यूचे कारण गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग असल्याचे नमूद केले आहे. याबाबत अद्याप पूनमच्या कुटुंबाकडून पुष्टी करण्यात आलेली नाही मात्र या पोस्टखाली अनेकांनी पूनमला श्रद्धांजली वाहिली आहे. काहींनी तिच्या जुन्या पोस्टचे दाखले देत ती तीन दिवसांपूर्वी मुंबईत दिसली होती, चार दिवसांआधी गोव्यात पार्टी करतानाचे फोटो व्हिडीओ शेअर केले होते त्यामुळे या निधनाच्या माहितीत कितपत तथ्य आहे असाही प्रश्न केला आहे.

Advertisements

पूनम पांडे हिच्या निधनाच्या पोस्टनंतर चर्चेत आलेला आजार म्हणजे सर्व्हीकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. मागील काही वर्षांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. भारतात या कर्करोगाची दरवर्षी सुमारे १.२५ लाख प्रकरणे आणि सुमारे ७५ हजार मृत्यूची नोंद होते. अंतरिम अर्थसंकल्प २०२४ मध्ये सुद्धा या मुद्द्यावरून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी उल्लेख केला असून, केंद्र सरकार यासाठी योजनात्मक पाऊले उचलण्याच्या तयारीत असल्याचे नमूद केले होते. केंद्र सरकारने याच रोगासाठी ९ ते १४ वर्षांच्या मुलींना लस देण्यासंदर्भात सुद्धा घोषणा केली होती. या व्यतिरिक्त आज आपण असे काही खबरदारीचे उपाय पाहणार आहोत जे वापरून आपण आपल्यासह आपल्या ओळखीतील महिलांना सुद्धा सुरक्षित राहण्यास मदत करू शकता.

Advertisements

डॉ प्रभा अग्रवाल, सल्लागार, प्रसूती आणि स्त्रीरोग, केअर हॉस्पिटल्स, हायटेक सिटी, हैदराबाद, यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीत गर्भाशय व गर्भाशयाच्या मुखाकडील भाग निरोगी राखण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत.

नियमित पॅप स्मीअर आणि HPV चाचण्या

पॅप स्मीअर्स (पॅप टेस्ट):

तुमच्या डॉक्टरांच्या शिफारशींनुसार पॅप स्मीअर्स करा, साधारणपणे २१ व्या वर्षांपासून महिलांनी पॅप टेस्ट करावी

पॅप स्मीअर्स गर्भाशयाच्या मुखाजवळील पेशींमध्ये कोणतेही असामान्य बदल लवकर ओळखू शकतात, ज्यामुळे वेळेत उपचार केला जाऊ शकतो. ३० व्या वर्षापासून महिलांनी दर पाच ते दहा वर्षांनी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी तपासणी केली पाहिजे.

एचपीव्ही चाचण्या:

अनेकदा पॅप स्मीअर्सच्या बरोबरच ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या संसर्गाचे निदान करण्यासाठी एचपीव्ही चाचण्या केल्या जातात.

HPV चा संसर्ग वेळीच ओळखणे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचा धोका कमी करण्यात मदत करते.

लसीकरण

आदर्शपणे पौगंडावस्थेमध्ये परंतु महिलांमध्ये वय २६ आणि पुरुषांमध्ये वय २१ पर्यंत HPV ची लस जाऊ शकते. लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्यापूर्वीच ही लस दिली जाणे आवश्यक आहे. यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (एफडीए) ने 26 वर्षांपर्यंत महिला आणि पुरुष दोघांनाही लसीकरण करण्याची शिफारस केली आहे मात्र आपण ४५ वर्षांपर्यंत लसीकरण करू शकता.

सुरक्षित सेक्सचा सराव करा

एचपीव्हीसह लैंगिक संक्रमित संसर्ग होण्याचा धोका कमी करण्यासाठी लैंगिक क्रियाकलाप दरम्यान कंडोमचा नेहमी आणि योग्य वापर करा.

लैंगिक भागीदार मर्यादित करा

लैंगिक संबंधांसाठी जोडीदाराची संख्या मर्यादित केल्याने एसटीआयच्या संपर्कात येण्याची शक्यता कमी होते, गर्भाशयाच्या मुखाचे विकार होण्याची शक्यता सुद्धा यामुळे आटोक्यात येते.

धूम्रपान सोडा

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी धूम्रपान हा एक ज्ञात जोखीम घटक आहे.

धूम्रपान सोडल्याने संपूर्ण आरोग्य सुधारते आणि गर्भाशयाच्या मुखाच्या विकारांचा धोका कमी होतो.

निरोगी आहार ठेवा

फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांनी युक्त संतुलित आहार घ्या.

योग्य पोषण हे मजबूत रोगप्रतिकारक शक्तीला समर्थन देते, संक्रमण रोखण्यासाठी मदत करते.

नियमित व्यायाम करा:

निरोगी वजन राखण्यासाठी नियमित व्यायाम करा.

शारीरिक हालचाली मजबूत रोगप्रतिकारक शक्तीमध्ये योगदान देतात.

तणाव व्यवस्थापित करा:

ध्यान, योग किंवा दीर्घ श्वासोच्छवासाच्या व्यायामासारख्या मार्गांनी तणाव कमीकरा

अधिक ताण रोगप्रतिकारक शक्तीवर नकारात्मक परिणाम करू शकतो.

नियमित तपासणी:

वेळोवेळी आरोग्य तज्ज्ञांचा प्रत्यक्ष सल्ला घ्या. संकोच बाळगून तपासणी टाळणे हे घातक ठरू शकते.

सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या आजाराकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

दरम्यान, वरील बदल अंगीकारून आपण सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न करू शकता. स्वतःसह इतर मैत्रिणींना सुद्धा सुरक्षित राहण्यासाठी प्रोत्साहन द्या. त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचवायला विसरू नका .

Advertisements

About विश्व भारत

Check Also

पौष्टिक तत्वों का खजाना है ये कलमी साग के सेवन से कब्ज, बवासीर, डायबिटीज जड से खत्म

पौष्टिक तत्वों का खजाना है ये कलमी साग के सेवन से कब्ज, बवासीर, डायबिटीज जड …

आंखों का धुंधलापन मिटाने के लिए इन 7 तरीकों से फायदेमंद हो सकती है फिटकरी? प्रयोग के लिए सावधानियां जरुरी

आंखों का धुंधलापन मिटाने के लिए इन 7 तरीकों से फायदेमंद हो सकती है फिटकरी? …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *