वर्धा: शहर विकासाच्या दृष्टीकोणातून केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत शहरामध्ये गेल्या साडेतीन वर्षांपासून भूमिगत जलवाहिनी व मलवाहिनीचे काम सुरु आहे. कंत्राटदाराच्या सुरुवातीपासूनच नियोजनशुन्य कारभार मुळे शहरातील १ लाख ३ हजार वर्धेकरांना या खोदकामानमुळे वेठीस धरले आहे. या कामामुळे अनेक अपघात झाले असुन एका मुलाचा मृत्यु झालेला आहे, अमृत योजना मल्ल निस्सारच्या कामामुळे वर्धेकर नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. झालेले रस्ते नागरिकांना वाहतुक योग्य करणे कंत्राटदाराचे काम आहे, परंतु अनेक रस्ते तसेच ठेवून दुस-या ठिकाणी काम सुरु केले आहे, त्यामुळे ते रस्ते संपुर्ण दुरुस्ती करुनच नागरिकांना पूर्वसुचना देवून व झालेल्या सर्व कामांचे टेस्टींग करुन समोरचे काम करावे, तसेच भूमिगत जलवाहिनी व मलवाहिनीचे काम युध्दपातळीवर करुन डिसेंबर जानेवारी पुर्ण होण्याकरिता प्रयत्न करावे अश्या सुचना खासदार रामदास तडस यांनी आढावा बैठकीत उपस्थित अधिका-यांना दिल्या.
आज वर्धा येथे अमृत योजना मल्लनिस्सारन कामाचा आढावा घेण्यासाठी जनसंपर्क कार्यालय खासदार रामदास तडस यांनी बैठक घेतली यावेळी नगराध्यक्ष अतुल तराळे, मुख्याधिकारी विपीन पालीवाल, न.प. अभियंता निलेश नंदनवार, मजीप्रा शाखा अभियंता सुनिल बोरीकर, मजिप्रा उपअभियंता सी.बी.खासबागे उपस्थित होते.
यावेळी मुख्याधिकारी विपीन पालीवाल यांनी अमृत योजना मलनिस्सारन योजनेबाबतची माहिती सादर केली यामध्ये एसटीपी झोण मधील एकुण 85.53 कि.मी. मल्लनिस्सारण वाहीनी पैकी 40 कि.मी. मल्ल निस्सारण वाहीनी टाकण्यात आली असुन 29.20 कि.मी. रस्ते अस्तरीकरणाचे काम पुर्ण झाले आहे, यामधील अनेक कामे प्रगतीपथावर असुन काही कामे निवीदा प्रक्रियेत आहे, संबधीत कंत्राटदाराने काम वेळेत पुर्ण न केल्यामुळे महाराष्ट्र जिवन प्राधीकरण यांनी सुचविलेल्या प्रमाणे प्रती दिवस े दंड लावण्यात आला होता परंतु कंत्राटदाराने उच्च न्यायालयात दाद मागितल्याने मा. उच्च न्यायालय मुंबई यांचे आदेश अन्वये कंत्राटदाराला लावण्यास स्थगिती दिली आहे, तसेच संबधीत कंत्राटदाराला जानेवारी पंर्यत काम पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या असल्याचे यावेळी उपस्थित अधिका-यांनी सांगीतले.
येत्या काळात मोठे सण उत्सव येणार आहेत, खोदलेली कामे तातडीने पुर्ण करुन रस्ते सुव्यवस्थीत ठेवावे तसेच जनभावना लक्षात घेऊन अमृत योजनेचे काम तातडीने पुर्ण करण्याचे नियोजन करावे अश्या सुचना यावेळी खासदार रामदास तडस यांनी उपस्थित अधिका-यांना दिल्या.