Breaking News

एमआयटी – सरपंच संसद वर्धा जिल्हा यांच्या शेतकरी हितार्थ केलेल्या प्रयत्नांना यश

वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शाश्वत मदत मिळेपर्यंत प्रयत्न करणार – निखिल कडू वर्धा जिल्हा समन्वयक
वर्धा :- जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन पिकावर चक्रभुंगा, खोडमाशी या किडीच्या प्रादुर्भावामुळे व मोझॅक, विषाणूजन्य रोग यामुळे सोयाबीन पिकाच्या झालेले शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. तसेच संततधार पाऊस, रोगराई, पुर, धरणाचे बॅक वॉटर व कोविड चा प्रादुर्भाव या नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, तूर, संत्रा, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे तथा निम्म वर्धा धरनाच्या बॅक वॉटर मुळे अधिग्रहित न केलेल्या शेतजमीनीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी त्यांना
शासनाकडून भरपाई मिळावी यासाठी ‘एमआयटी – महाराष्ट्र सरपंच संसदे’च्या वर्धा जिल्हा शाखेच्यावतीने वर्धा जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्ह्याधिकारी व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिनांक ८ सप्टेंबर ला निवेदन ‘एमआयटी  – महाराष्ट्र सरपंच संसदे’चे वर्धा जिल्हा समन्वयक,सामाजिक कार्यकर्ते व  आर्वी तालुक्यातील सर्कसपूरचे उपसरपंच निखिल कडू यांच्या सह वर्धा जिल्ह्यातील ‘महाराष्ट्र सरपंच संसद – ग्राम’ चे सरपंच अर्चना नारनवरे (झुणका, ता.समुद्रपूर),अमोल बुरीले (लाडकी, ता.हिंगणघाट),सुरेखा नागोसे (जोलवाडी, ता.आष्टी),
प्रिया बोबडे ( बाभूळगाव, ता.देवळी), धनराज टूले (नेरी पुनर्वसन,ता.वर्धा), रमेश लोहकरे(नागझरी,ता.कारंजा घाडगे), रोशन दुधकोहळे (नानबर्डी (डोंगरगाव),ता.सेलू) यांनी दिले होते.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वर्धा यांनी दिलेल्या पत्रानुसार नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहे. तसेच ‘निम्म वर्धा प्रकल्प’ च्या बॅक वॉटरमुळे संपादित क्षेत्राव्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांच्या शेती जलमय झाल्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असुन पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आले आहे.
वर्धा संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कास्तकारीची अत्यावश्यक असणारी कामे करणे कठीण झाले आहे. जिल्ह्यातील संपूर्ण सोयाबीन  पिक शेतकऱ्यांच्या हातुन गेले आहे. संततधार पाऊसामुळे कापूस पिकात फुल व पाती गळ आणि बोंड सड झाली आहे. फुटलेल्या बोंडातच सरकी अंकूल्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादनातून देखील यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळणे अशक्य आहे. सुरवातीला चांगले दिसणारे तुरीचे पिक संततधार पाऊसामुळे पिवळे पडले आहे. संत्रा व मोसंबी पिकांमध्ये संततधार पाऊसामुळे मृग बहारातील  संपूर्ण फळांची गळती झाली आहे, त्यामुळे मृग बहाराचे पिक संपूर्णपणे शेतकऱ्यांच्या हातुन  गेलेले आहेत. भाजीपाला पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे.
वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी नदी व नाल्यांना पुर आल्याने भाजीपालावर्गीय पिकांचे देखील प्रचंड नुकसान झाल्याने वर्धा जिल्ह्यातील  शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
वर्धा जिल्ह्यातील ‘निम्म वर्धा प्रकल्पा’त साठवण केलेल्या पाणीसाठ्यातील बॅक वॉटर मुळे संपादित केलेल्या क्षेत्राव्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांच्या शेतजमीन देखील जलमय झाल्याने शेतकरी खरीप हंगामात पेरणी केलेल्या पिकापासून होणाऱ्या आर्थिक लाभापासून वंचित झालेले आहेत. उपरोक्त विविध नैसर्गिक आपत्ती व कोरोना (कोविड – १९) च्या प्रादुर्भावामुळे वर्धा जिल्ह्यातील विविध पिके उत्पादित करणारा शेतकरी आर्थिक अभूतपूर्व संकटात सापडला आहे.
त्यामुळे आता शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याची गरज असुन येणाऱ्या रब्बी हंगामासाठी शेती पुन्हा उभी करण्यासाठी चांगल्या प्रतीचे बी बियाणांचा पुरवठा करने गरजेचे असुन एमआयटी सरपंच संसद वर्धा जिल्हा शेतकऱ्यांना शाश्वत मदत मिळेपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे एमआयटी – सरपंच संसद वर्धाचे समन्वयक निखिल कडू यांनी सांगितले.

About Vishwbharat

Check Also

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा

वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *