गत 24 तासात 1642 कोरोनामुक्त, 1449 पॉझिटिव्ह तर 23 मृत्यू Ø आतापर्यंत 52,447 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 15,882 चंद्रपूर, दि. 7 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1642 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1449 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 23 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 69 हजार 388 …
Read More »कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या वरोरासह भद्रावती, राजुरा व बल्लारपूरला पालकमंत्र्यांनी दिली भेट
कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या वरोरासह भद्रावती, राजुरा व बल्लारपूरला पालकमंत्र्यांनी दिली भेट Ø कोविड केअर सेंटर येथे केली पाहणी. Ø रुग्णांना आवश्यक सुविधा पुरविण्याचे निर्देश. Ø सुरक्षित अंतर राखत रुग्णांशी साधला संवाद. Ø बल्लारपूर मध्ये तातडीने 20 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देण्याचे निर्देश. चंद्रपूर दि. 7 मे : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी आज चंद्रपूर जिल्ह्यात …
Read More »अवैध कोविड रुग्णालयावर जिल्हा प्रशासनाची कारवाई अवैधरित्या कोविड रुग्णांवर सुरू होते उपचार
अवैध कोविड रुग्णालयावर जिल्हा प्रशासनाची कारवाई अवैधरित्या कोविड रुग्णांवर सुरू होते उपचार चंद्रपूर दि. 7 मे : कोरोना रुग्णांच्या असहाय्यतेचा फायदा घेत कोणतीही परवानगी न घेता अवैधपणे कोविड रुग्णालय चालविणाऱ्या चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयावर जिल्हा प्रशासनाने कारवाई केली आहे. अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत कोविड रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली …
Read More »अखेर ‘गजराज’जेरबंद
अखेर ‘गजराज’ला जेरबंद करण्यात यश – रात्रभर 50 वनाधिकारी व कर्मर्यांची हत्तीवर नजर चंद्रपूर- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गजराज नावाच्या हत्तीने गुरूवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आक्रमक होऊन धुम ठोकली आणि दरम्यान, मुख्य लेखाधिकारी प्रमोद गौरकार यांना ठार केले. त्यावर रात्रभर जवळपास 50 वनाधिकारी व कर्मचार्यांची नजर होती. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्यास जेरबंद करण्यात यश आले. बोटेझरी तलावात अख्खी रात्री या …
Read More »ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी रब्बी पिकाचे क्षेत्रात वाढ करावी -पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी रब्बी पिकाचे क्षेत्रात वाढ करावी -पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार Ø खरीप हंगाम आढावा बैठक Ø यावर्षी 4 लक्ष 30 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाचे नियोजन Ø पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे धडक सिंचन योजनेचे 10 कोटी प्राप्त वर्धा, दि 7 मे( जिमाका) :- ग्रामीण अर्थव्यवस्था ही कृषीवर आधारित असल्यामुळे ही अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी जिल्ह्यात रब्बी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासोबतच पिक पद्धतीत बदल करण्याचे प्रयत्न करावे. …
Read More »शिधापत्रिकाधारकांना दोन महिन्याचे धान्य मिळणार मोफत
शिधापत्रिकाधारकांना दोन महिन्याचे धान्य मिळणार मोफत Ø 2 लक्ष 62 हजार 882 लाभार्थ्याना मिळणार लाभ वर्धा,दि 7 (जिमाका):- कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव बघता शासनाने मजुर, शेतमजुर, शेतकरी अंत्योदय, आणि प्राधान्य गटातील नागरिकांच्या अन्नाधान्याची गरज लक्षात घेवून त्यांना आता मे व जुन या दोन महिन्याचे सुध्दा अन्न्धान्य मोफत देण्यात येणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील 2 लाख 62 हजार 882 शिधापत्रिका धारकांना मिळणार आहे. राज्यातील आपातकालिन परिस्थिती विचारात …
Read More »तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी आराखडा सादर करावा -पालकमंत्री सुनिल केदार
तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी आराखडा सादर करावा -पालकमंत्री सुनिल केदार वर्धा, (जिमाका):-कोरोनाची तीसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी वर्तविली आहे. या लाटेचा जास्त परिणाम लहान मुलांवर होणार असल्याचे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी आतापासुन बालकाच्या सुरक्षेबाबत काळजी घेण्यासाठी नियोजन करावे. तसेच तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने कोणत्या साधनांची आवश्यकता भासणार आहे याचा अभ्यास करून तसा आराखडा तात्काळ प्रस्तावित करावा, जेणेकरून वेळेच्या आत त्यासाठीची …
Read More »गडचांदूर व कोरपणा येथे ऑक्सिजन बेड तात्काळ वाढवावे – शेतकरी संघटना
कोरोनाचा वाढता प्रकोप व मृत्यूची संख्या गडचांदूर व कोरपणा येथे ऑक्सिजन बेड तात्काळ वाढवावे – शेतकरी संघटना चंद्रपूर, 7 मे – चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना व गडचांदूर या भागात कोरोना महामारीमुळे ऑक्सिजन बेड अत्यंत कमी पडत असून या दोन्ही ठिकाणी असलेल्या ग्रामीण रूग्णालयात ऑक्सिजन बेड वाढविण्याची मागणी कोरपना तालुका शेतकरी संघटनेने केली आहे. …
Read More »कोविड लसीकरणात घुग्घुस येथील स्थानिकांना प्राधान्य द्या-विवेक बोढे
कोविड लसीकरणात घुग्घुस येथील स्थानिकांना प्राधान्य द्या* *घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे यांची मागणी* घुग्घुस-प्रभाकर कुम्मरी- घुग्घुस येथील जिल्हापरिषद प्राथमिक कन्या शाळा येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सूचनेनुसार गुरुवार 6 मे पासून 18 ते 44 वर्षाच्या वयोगटातील नागरिकांसाठी कोविड लसीकरण सुरु करण्यात आले. परंतु ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरु असल्याने चंद्रपूर शहरातील नागरिकांनी तसेच इतर …
Read More »ACC, LLOYD’S, व WCL या तिन कंपनीचा डस्ट खात आहो यांच्या मोबदला म्हणून विज, पाणी मोफत पाहिजे-सुरेश मल्हारी
ACC, LLOYD’S, व WCL या तिन कंपनीचा डस्ट खात आहो यांच्या मोबदला म्हणून विज, पाणी मोफत पाहिजे* *सुरेश मल्हारी पाईकराव जिल्हा महासचिव BRSP यांनी केली मागणी* घुग्घुस- प्रभाकर कुम्मरी- बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चंद्रपूर शाखा घुग्घुस चा माध्यमातून मा. जिल्हाधिकारी साहेब व उप-प्रादेशिक अधिकारी साहेब महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना निवेदन देण्यात आले. घुग्घुस येथे ACC सिमेंट कंपनी, LLOYD’S MATEL …
Read More »
विश्वभारत News Website