Breaking News

प्रशासन

राज्यात मंगळवारपासून एसटी बसचा संप? कारण वाचा

आर्थिक मागण्यांसाठी एसटी कर्मचारी उपोषणाच्या तयारीत आहेत. राज्यभरातील एसटी कर्मचारी १३ फेब्रुवारीपासून विभागीय पातळीवर उपोषण सुरू करणार आहेत. तसेच उपोषणानंतरही मागण्या मान्य न झाल्यास आगारपातळीवर ‘काम बंद’ आंदोलन सुरू करून एसटी सेवा बंद केली जाईल, असा इशारा महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेकडून देण्यात आला आहे.   महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ यांची थकबाकी देण्याबाबत १५ दिवसात मान्यताप्राप्त कामगार …

Read More »

दिव्या कशी झाली 22 व्या वर्षी IPS अधिकारी? वाचा

सरकारी शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या दिव्याला लहानपणापासूनच अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या आहेत. लहान असतानाच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. गरिबी आणि बिकट परिस्थिती असतानाही दिव्याचे मोठी, प्रतिष्ठित नोकरी मिळवण्याचे ध्येय असून तिने ते साध्य केले. तिने केलेल्या या खडतर आणि प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेऊ… तिचा संघर्ष पाहून, एखादी गोष्ट करण्याचे मनाशी घट्ट ठरवल्यानंतर तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही हे दिसून येते. …

Read More »

सोयगाव तहसीलदार मोहनलाल हरणे यांची बदली : मनीषा मेने नव्या तहसीलदार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तहसीलदार मोहनलाल हरणे यांची बदली बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे झाली आहे. येत्या लोकसभा निवडणूकी च्या अनुषंगाने या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. आता सोयगावला मनीषा मेने या तहसीलदार म्हणून पदस्थापना देण्यात आलेली आहे. मनीषा मेने धाराशिव जिल्ह्यातील कळब येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या. तर गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयातील अधीक्षक मोहन टिकले यांची बदली भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे …

Read More »

पत्रकारांसोबत बिनसले आणि जिल्हाधिकाऱ्यांची बदली : मुख्यमंत्र्यांवरही आली होती आफत

बऱ्या आणि चुकीच्या अशा दोन्ही घटनांमुळे सतत चर्चेत असणारे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची बुधवारी बदली झाली.अमोल येडगे हे कोल्हापूरचे नवीन जिल्हाधिकारी असणार आहेत. अमोल येडगे हे २०१४ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. कळमनुरी (जि. हिंगोली) येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांची बदली नाशिक येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली. तसेच आयटीडीपीचे प्रकल्प संचालक म्हणूनही काम केले आहे. जिल्हाधिकारी …

Read More »

सुट्टीपासून शासकीय कर्मचारी वंचित : मराठा आरक्षणासाठी नागपूर विभागात 29 हजार कर्मचारी नियुक्त

राज्य मागासवर्ग आयोगामार्फतच्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणासाठी विभागात 29 हजार 42 प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या 23 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या सर्वेक्षणासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणासंदर्भात उच्चस्तरीय आढावा घेतली. दि. 31 जानेवारी पर्यंत सर्वेक्षणाचे काम युध्दपातळीवर पूर्ण करण्यात येणार आहे. विभागातील 64 तालुक्यातील …

Read More »

अधिकाऱ्याचा शाही वाढदिवस चर्चेत : तीन कर्मचाऱ्यांना नोटीस

आदिवासी विकास विभागातील उपायुक्त सुदर्शन नगरे यांचा वाढदिवस बुधवारी कार्यालयात शाही थाटात साजरा करण्यात आला. साहेबांचे आगमन झाल्यानंतर कोल्ड फायरच्या आतषबाजीने कार्यालय उजळून निघाले. ‘बॉस’ उल्लेख असणारा केक कापला गेला. हा दिवस संस्मरणीय करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी कंबर कसली होती. या घटनेची गंभीर दखल घेत आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांनी तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आदिवासी विकास विभागाचा कारभार वेगवेगळ्या कारणांनी …

Read More »

नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना निवडणूक आयोगाचा पुरस्कार

✍️मोहन कारेमोरे भारत निवडणूक आयोगाकडून आज निवडणुकीच्या सुधारणासंदर्भात जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातून नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना ‘बेस्ट इलेक्ट्रॉल प्रॅक्टिस अवार्ड 2023 ‘ घोषित करण्यात आला आहे. निवडणुकांमध्ये मतदार संख्या वाढविण्यासाठी डॉ. विपिन इटनकर यांनी ‘मिशन युवा ‘ अभियान राबविले होते. या अभियानातर्गत त्यांनी 15 जुलै 2023 ते जानेवारी 2024 या काळामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला लक्षात घेऊन …

Read More »

तलाठी भरतीविरोधात असंतोष : छत्रपती संभाजीनगर, बीडमध्ये लाखो परीक्षार्थी रस्त्यावर

तलाठी भरती परीक्षेतील कथित गैरप्रकार, गुणवत्ता यादीत आलेले ‘टीसीएस’मधील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक आणि सर्व प्रकरांकडे होणारे दुर्लक्ष या विरोधात परीक्षार्थीनी छत्रपती संभाजी नगर आणि बीड शहरात मंगळवारी रस्त्यावर उतरून असंतोष व्यक्त केला. भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत का राबवली जात नाही? लोकसेवा आयोगामार्फत केवळ २९६ रुपये शुल्क आकारले जाते, मग खासगी कंपन्या अतिरिक्त शुल्क का घेतात? परीक्षेतील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी सरकार विशेष …

Read More »

नागपूर जिल्ह्यात महसूल कर्मचाऱ्यांनी का केले लेखणी बंद आंदोलन सुरु? वाचा

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील तृतीय श्रेणी कर्मचारी सध्या लेखणीबंद आंदोलन करीत आहे. कळमेश्वर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या स्थानिक नागरिकांवर कारवाई करा ही त्यांची मागणी आहे. मंगळवारी त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस होता. कळमेश्वरतहसील कार्यालयात प्रितम शेंडे महसूल सहायक पदावर कार्यरत आहेत. ते कार्यालयात काम करीत असताना त्यांना स्थानिक दोन नागरिकांनी त्रयस्तांच्या कामाबाबत विचारणा केली आणि “ कामकाज जमत नसेल तर राजीनामा …

Read More »

पोलीस अधिकाऱ्याची तक्रारदारास मारहाण?

न्याय प्रविष्ट एका कौटुंबिक प्रकरणातील तक्रारदार जितेंद्र आग्रोया यांना तुमसर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात बोलावून उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव यांनी शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याचा आरोप आग्रोया यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. १० जानेवारी रोजी हा प्रकार घडल्याचे सांगत या महिला पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्या बँक खात्यातून बळजबरी पैसे काढल्याचा गंभीर आरोपही जितेंद्र आग्रोया यांनी यावेळी केला. संबधित उपविभागीय पोलीस …

Read More »